Maharashtra

Ahmednagar

CC/18/150

Popat Laxman Auti - Complainant(s)

Versus

M/s. Atmiya Manufacturing - Opp.Party(s)

Kolhe

04 Apr 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/18/150
( Date of Filing : 08 May 2018 )
 
1. Popat Laxman Auti
R/O. Vishal Sanala Mill, Supa M.I.D.C, Plot No.D-66, Tal- Parner, Ahmenagare
Ahmadnager
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Atmiya Manufacturing
307,Gaganagar Society, Near Suvidha Row House, Simda Gam, Nana Varaccha, Surat, Gujrat
Surat
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Kolhe , Advocate
For the Opp. Party:
Dated : 04 Apr 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने स्‍वतःचे उपजिवीकेकरीता मे.विशाल थर्माकोल प्‍लेटचा व्‍यवसाय करतात. सदर व्‍यवसाया व्‍यतिरीक्‍त उपजिवीकेकरीता त्‍यांचेकडे कोणतेही साधन नाही. तक्रारकर्ता यांनी सामनेवाला यांना नेट व्‍दारे संपर्क साधला. मशीन विक्री करण्‍याचे थर्माकोल प्‍लेट मशीन खरेदी करण्‍याकरीता संपर्क केला. सदर मशीनची किंमत रक्‍कम रु.6,17,500/- अशी दर्शविण्‍यात आली आहे. सदर मशीन तक्रारकर्ता यांनी दिनांक 17.04.2017 रोजी आर.टी.जी.एस. व्‍दारे रुपये 65,000/- मशीन खरेदी करण्‍याकरीता अग्रीम रक्‍कम दिली. सदरहू रक्‍कम मिळाल्‍यानंतर सामनेवालाने तक्रारकर्ता यांना वॉटसअप व्‍दारे त्‍यांना रिसीट पाठविली. मे.2017 मध्‍ये तक्रारकर्ताने परत सामनेवालाना आरटीजीस व्‍दारे उर्वरीत मशीनची रक्‍कम रुपये 6,17,500/- सामनेवालाकडे पाठविली. सामनेवालाने दिनांक 20.05.2017 रोजी सदर मशीनचे बिल तक्रारकर्ताला पाठविले. सामनेवालाने दिनांक 03.06.2017 रोजी सदर मशीन तक्रारकर्ताला पाठविले. ती मशीन तक्रारकर्ताला दिनांक 05.06.2017 रोजी प्राप्‍त झाली. सदर मशीन मिळाल्‍यानंतर सदर मशीन बसविण्‍याकरीता तक्रारकर्ताने वारंवार सामनेवालाशी संपर्क केला. परंतू सामनेवालातर्फे असे सांगितले की, सदर मशीन बसविण्‍याकरीता 10 दिवसाचे आत मेकॅनिक येईल. परंतू तो आला नाही. त्‍यानंतर 6 महिन्‍यानंतर सामनेवालातर्फे एक मेकॅनिक पाठविण्‍यात आला व तो 10 दिवस थांबून सदरहू मशीन बसविण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यात मशीनचे पार्टस व्‍यवस्थित नव्‍हते. म्‍हणून सदर मशीन बसविण्‍यात आले नव्‍हते. परत तक्रारकर्ताने सामनेवालाकडे संपर्क साधला. सदर नादुरुस्‍त मशीनचे पार्ट 10 दिवसाचे आत बसविण्‍यात येतील असे सांगितले. परंतु सामनेवालाने तेही पाठविले नाही. फक्‍त एक मॅकेनिक पाठविला. व त्‍या मेकॅनिकने असे सांगितले की, सदर मशीनमध्‍ये निर्मीती दोष आहे व ती मशीन बसवता येत नाही. म्‍हणून तक्रारकर्ताला त्‍यांचे व्‍यवसायामध्‍ये दरमहा 20,000/- रुपयाचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. तक्रारकर्ताने सामनेवालाला सदर मशीन बदली करुन द्यावे. किंवा मशीनची घेतलेली रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याची विनंती पत्रावदारे केली. सदर पत्राची सामनेवालाने कोणतीही दखल घेतलेली नाही. म्‍हणून तक्रारकर्ताने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी विनंती केलेली आहे की, सामनेवालाने तक्रारकर्ताला सदर मशीन बदली करुन द्यावी किंवा मशीनची किंमत व्‍याजासह परत मिळावी. तसेच तक्रारकर्ताला झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी व नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाला नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा ते प्रकरणात हजर झाले नाही. म्‍हणून निशाणी 1 वर दिनांक 19.01.2019 ला सदर प्रकरण सामनेवालाचे विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

5. तक्रारकर्ताची दाखल तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र व तोंडी युक्‍तीवादावरुन खालील निष्‍कर्षावरुन अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

नि ष्‍क र्ष

6.   – तक्रारकर्ता यांनी स्‍वयंरोजगाराकरीता सामनेवालाकडून मशीन खरेदी केली व त्‍या करीता सामनेवालाने तक्रारकर्ताकडून रक्‍कम रुपये 6,82,500/- असे आर.टी.जी.एस. व्‍दारे घेतले ही बाब तक्रारकर्ताने  दाखल केलेल्‍या निशाणी 11 वरील दस्‍तावेजावरुन सिध्‍द होते. सबब तक्रारकर्ता हे सामनेवालाचे “ग्राहक” आहेत असे सिध्‍द होते. सामनेवालाने तक्रारकर्ताला निर्मीती दोष असलेल्‍या मशीनचा पुरवठा केला व तक्रारकर्ताने त्‍या संदर्भात सामनेवालाशी संपर्क साधूनही त्‍यावर सामनेवालाने कोणतीही दाखल घेतलेली नाही. म्‍हणून सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंब केलेला आहे असे तक्रारकर्ताव्‍दारे तक्रारीत निशाणी 6 वरील दस्‍तावेजावरुन तसेच निशाणी 15 वरील दाखल शपथपत्रावरुन सिध्‍द होते. सामनेवाला सदर प्रकरणात हजर झाले नाही. त्‍यांनी त्‍यांचे बचावर पक्षात बाजू मांडली नाही. म्‍हणून खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवालाने तक्रारकर्ताला थर्माकोल प्‍लेट व दोना ची मशीन बदली करुन द्यावी.

3.   सामनेवालाने तक्रारकर्ताला झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- (रक्‍कम रु.वीस हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.10,000/- (रक्‍कम रु.दहा हजार फक्‍त ) द्यावे.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.