Maharashtra

Nagpur

CC/11/212

Anitkumar Pritamsingh Panwar - Complainant(s)

Versus

M/s. Ashtvinayak Developers - Opp.Party(s)

Adv.

16 Dec 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/212
 
1. Anitkumar Pritamsingh Panwar
Flat No. 404, R-2-F, 1/385, A-Block, Galli No.2, Mahavir Enclave,
New Delhi
New Delhi
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Ashtvinayak Developers
Wardha Road,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:
अॅड.श्री.कौशिक मंडल
 
 
अॅड.श्री.डी.ए.सोनवणे
 
ORDER

 

मंचाचे निर्णयान्‍वये सौ. जयश्री येंडे, सदस्‍या.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 16/12/2011)
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार, त्‍याने गैरअर्जदार यांच्‍या अष्‍टविनायक पार्क या लेआऊटमधील प्‍लॉट क्र. 91, एकूण क्षेत्रफळ 1453 चौ.फु.चा रु.260/- प्रति चौ.फु.प्रमाणे, ज्‍यामध्‍ये विकास खर्च अंतर्भूत होता, तो रु.3,77,780/- मध्‍ये विकत घेण्‍याकरीता नोंदणीकृत केला. सदर रकमेपैकी वेळोवेळी रु.3,05,000/- तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना दिले. दि.21.06.2008 रोजी तक्रारकर्ता यांनी गैरअर्जदाराला उर्वरित रक्‍कम रु.72,780/- स्विकारुन, प्‍लॉटचे विक्रीपत्र करुन देण्‍याची विनंती केली असता, त्‍यांनी सदर जमिनीचे अकृषीकरण न झाल्‍याने नगर रचना विभागाकडून मंजूरी प्राप्‍त नसल्‍याने भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍यास असमर्थता दर्शविली. तसेच उभय पक्षामध्‍ये करार होऊन जे प्रमाणपत्र गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यास निर्गमित केले, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याची देय रक्‍कम राष्‍ट्रीय बँकेच्‍या मुदत ठेवीच्‍या व्‍याजाच्‍या दरापेक्षा दुपट्टीने परत करण्‍याचे कबुल करुनही अद्यापपावेतो गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास त्‍याची देय रक्‍कम, देय व्‍याजासह परत केली नाही, ही गैरअर्जदार यांची सेवेतील कमतरता आहे, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली असून, मागणी केली की, रु.3,05,000/- ही रक्‍कम कबूल केल्‍याप्रमाणे देय व्‍याजासह द्यावी, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.50,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.25,000/- मिळावे अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
2.                सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारास पाठविण्‍यात आली असता गैरअर्जदारांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल करुन, मंचास तक्रार चालविण्‍याचे क्षेत्रिय अधिकार नाही व तक्रार मुदतीत नसल्‍याबाबतचे प्राथमिक आक्षेप घेतले. पुढे भुखंडाबाबतचा नोंदणी करार मान्‍य करुन, उर्वरित तक्रारकर्त्‍याचे कथन नाकारले आहे व तक्रार खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.
3.                सदर तक्रार युक्‍तीवादाकरीता आल्‍यानंतर, मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. तसेच दाखल दस्‍तऐवजांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता, मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
 
4.                निर्विवादपणे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांच्‍या मौजा-रुई, अष्‍टविनायक पार्क या लेआऊटमधील प्‍लॉट क्र. 91, एकूण क्षेत्रफळ 1453 चौ.फु.चा रु.3,77,780/- (भुखंडाची किंमत   + विकास खर्च) एवढया मोबदल्‍यात खरेदी करण्‍याचा गैरअर्जदार यांच्‍याशी करार केला होता व सदर रकमेपैकी तक्रारकर्त्‍याने रु.3,05,000/- गैरअर्जदार यांना अदा केलेले होते. तसेच उभय पक्षात झालेल्‍या करारानुसार दि.21.07.2007 (बुकींग तारखेपासून) सहा महीन्‍याच्‍या अवधीमध्‍ये म्‍हणजेच दि.21.01.2008 पर्यंत जर तक्रारकर्त्‍याने भुखंडाचे बुकींग रद्द केले तर गैरअर्जदार त्‍याला राष्‍ट्रीयकृत बँकेच्‍या मुदत ठेवीच्‍या व्‍याजाच्‍या दरापेक्षा दुप्‍पट रक्‍कम परत करतील असे उभय पक्षात ठरलेले होते.
5.                सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍याची महत्‍वाची तक्रार ही आहे की, गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास कराराप्रमाणे मान्‍य केलेली (Buy Back Guarantee) व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्त्‍यास दिली नाही.
 
6.                गैरअर्जदार यांच्‍या मते तक्रारकर्त्‍याने सदर भुखंडाची नोंदणी तारखेपासून सहा महिन्‍याचे आत रद्द न केल्‍यामुळे कराराप्रमाणे तो व्‍याज घेण्‍यास पात्र नाही.
 
7.                तक्रारकर्त्‍याच्‍या शपथेवरील कथनावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने भुखंड मोबदल्‍यापोटीची उर्वरित रक्‍कम घेऊन सदर भुखंडाचे विक्रीपत्र नोंदणी करुन देण्‍याची विनंती केली असता, गैरअर्जदार यांनी सदर भुखंडाचे एन.ए.टी.पी. झालेले नसल्‍यामुळे सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍यास असमर्थता दर्शविली. उर्वरित रक्‍कम परत करण्‍यास तयार असल्‍याचे सांगितले.
 
8.                गैरअर्जदार यांच्‍या शपथेवरील जवाबातसुध्‍दा त्‍यांनी सदर लेआऊटचे अकृषक रुपांतर न झाल्‍यामुळे व नगर रचना कार्यालयाकडून मंजूरी न मिळाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास सदर भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देऊ शकले नाही असे नमूद करुन ते राष्‍ट्रीयकृत बँकेच्‍या व्‍याजाप्रमाणे दि.03.08.2011 पर्यंत होणारी रक्‍कम देण्‍यास तयार असल्‍याचे नमूद केलेले आहे.
 
9.                वरील वस्‍तूस्थितीवरुन हे मंच या निष्‍कर्षाप्रत येते की, सदर भुखंडाची नोंदणी ही तक्रारकर्त्‍याने स्‍वतःहून रद्द केलेली नसून, लेआऊटचे एन.ए.टी.पी. झालेले नसल्‍यामुळे सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍यास गैरअर्जदार यांनी असमर्थता दर्शविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांना अदा केलेली रक्‍कम परत घेण्‍याचा मार्ग स्विकारला, त्‍यामुळे सदर घटनेत तक्रारकर्त्‍याची चुक नाही, त्‍याला मान्‍य केलेल्‍या अटीप्रमाणे देय व्‍याजाची रक्‍कम देण्‍यास गैरअर्जदार जबाबदार आहेत. दस्‍तऐवज क्र. 41 वरील दाखल पावतीवरुन गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास 08.03.2011 रोजी रु.3,05,000/- परत केल्‍याचे निदर्शनास येते. सदर रकमेवर (Buy Back Guarantee) नुसार गैरअर्जदार हे सदर रक्‍कम दिल्‍याच्‍या तारखेपासून ते दि.08.03.2011 चा कालावधीसाठी त्‍यावेळेस मुदत ठेवीवर असलेल्‍या व्‍याजाच्‍या दराच्‍या दुपट्टीने रक्‍कम परत करण्‍यास जबाबदार आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते. सबब आदेश.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत असून, गैरअर्जदाराने रु.3,05,000/- या रकमेवर (Buy Back Guarantee) नुसार, सदर रक्‍कम दिल्‍याच्‍या तारखेपासून ते दि.08.03.2011 या कालावधीसाठी, त्‍यावेळेस मुदत ठेवीवर असलेल्‍या व्‍याजाच्‍या दराच्‍या दुपट्टीने रक्‍कम परत करावी.
2)    गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास मानसिक व शारिरीक त्रासापोटी क्षतिपूर्तीबाबत रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे.
3)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.