Maharashtra

Nagpur

CC/291/2018

SAROJ SUBHASH PATIL - Complainant(s)

Versus

M/S. ASHTVINAYAK DEVELOPERS, THROUGH PARTNER SHRI. GIRISH MOTILAL JAISWAL - Opp.Party(s)

ADV. ANURADHA DESHPANDE

13 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/291/2018
( Date of Filing : 10 Apr 2018 )
 
1. SAROJ SUBHASH PATIL
R/O. PLOT NO. 2, PATIL LAYOUT, HINGNA ROAD, NEAR T-POINT, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. ASHTVINAYAK DEVELOPERS, THROUGH PARTNER SHRI. GIRISH MOTILAL JAISWAL
R/O. LAXMISADA APARTMENT, 5TH FLOOR,NEAR SAI MANDIR, WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. M/S. ASHTVINAYAK DEVELOPERS, THROUGH PARTNER SHRI. AJAY KRUSHNAMOHAN JAISWAL
R/O. LAXMISADA APARTMENT, 5TH FLOOR,NEAR SAI MANDIR, WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Mar 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्षाशी मौजा वानाडोंगरी, पटवारी हलका नंबर ४६, सर्व्‍हे नंबर १०४, तह. हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथील भुखंड क्रमांक १३०, एकूण क्षेञफळ १५५.६६ चौरस मिटर म्‍हणजे १६७५ चौ.फुट एकूण किंमत रुपये ९५,०००/- एवढया किंमतीत विकत घेण्‍याचे ठरले व तक्रारकर्तीकडुन संपूर्ण रक्‍कम रुपये ९५,०००/- प्राप्‍त झाल्‍यावर सदर भुखंडाचे विक्रीपञ नोंदनी दुय्यम निबंधक, हिंगणा यांचे कार्यालयात अनुक्रमांक १४८८ अन्‍वये करुन दिले. तक्रारकर्तीने सदर भुखंडाचा ताबा मिळावा म्‍हणून विरुध्‍द पक्षाला अनेकवेळा विनंती केली परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला लवकरच करुन देऊ असे आश्‍वासीत केले. शेवटी तक्रारकर्तीने स्‍वतः जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर भुखंडावर विरुध्‍द पक्षाने अनधिकृतपणे अष्‍टविणायक एम्‍पायर नावाची फ्लॅट स्‍कीम उभी केली असल्‍याचे तक्रारकर्तीच्‍या लक्षात आले. तक्रारकर्तीने याबाबत विरुध्‍द पक्षाकडे वारंवार विचारणा केली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला भुखंड क्रमांक ५ या १५०० चौरस फुटाची नोटरीकृत विक्रीपञ करुन दिले. तक्रारकर्तीने त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाकडे भुखंड क्रमांक ५ च्‍या ताब्‍याची मागणी केली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीची मागणी फेटाळून लावली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला विक्रीपञ हे निबंधक कार्यालयात निबध्‍द न करता नोटरी करुन देणे ही तक्रारकर्तीची फसगत आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला भुखंड क्रमांक १३० चे खोटे नोंदनीकृत विक्रीपञ करुन देणे व भुखंडाचा ताबा स्‍वतः जवळ ठेवणे तसेच प्‍लॉट क्रमांक ५ चे खोटे व नोटरीकृत विक्रीपञ करुन देणे ही तक्रारकर्ती प्रती अनुचित व्‍यापार पद्धीतीचा अवलंब करणारी कृती आहे. करीता तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या प्‍लॉट क्रमांक ५  चे विक्रीपञ करुन देऊन ताबा द्यावा व त्‍यांना सर्व कागदपञे पुरवावी असे निर्देश द्यावे किंवा विक्रीपञ करुन देणे शक्‍य नसल्‍यास या भुखंडाचे आजच्‍या बाजारभावाप्रमाणे किंमत तक्रारकर्तीस द्यावी असे निर्देश द्यावे.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला ते वापरीत असलेली रक्‍कम रुपये  ९५,०००/-, २४ टक्‍के व्‍याज दराने परत करावी.
  3. मानसिक व शारिरीक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी विहीत मुदतीत लेखी जबाब सादर न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण बिना लेखी जबाब चालविण्‍याचा आदेश दिनांक १८/९/२०१८ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍ताऐवज चे अवलोकन केल्‍यावर व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे नमूद आहे.

      अ.क्र.                  मुद्दे                                                                      उत्‍तर

  1. तक्रारकर्ती हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?               होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ?     होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्षाशी मौजा वानाडोंगरी, पटवारी हलका नंबर ४६, सर्व्‍हे  नंबर १०४, तह. हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथील भुखंड क्रमांक १३०, एकूण क्षेञफळ १५५.६६ चौरस मिटर म्‍हणजे १६७५ चौ.फुट एकूण किंमत रुपये ९५,०००/- एवढया किंमतीत विकत घेण्‍याचे ठरले व तक्रारकर्तीकडुन  संपूर्ण रक्‍कम रुपये ९५,०००/- प्राप्‍त झाल्‍यावर सदर भुखंडाचे विक्रीपञ नोंदनी दुय्यम निबंधक, हिंगणा यांचे कार्यालयात अनुक्रमांक १४८८ अन्‍वये करुन दिले. तक्रारकर्तीने सदर भुखंडाचा ताबा मिळावा म्‍हणून विरुध्‍द पक्षाला अनेकवेळा विनंती केली परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला लवकरच करुन देऊ असे आश्‍वासीत केले. शेवटी तक्रारकर्तीने स्‍वतः जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर भुखंडावर विरुध्‍द पक्षाने अनधिकृतपणे अष्‍टविणायक एम्‍पायर नावाची फ्लॅट स्‍कीम उभी केली असल्‍याचे तक्रारकर्तीच्‍या लक्षात आले. तक्रारकर्तीने याबाबत विरुध्‍द पक्षाकडे वारंवार विचारणा केली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला भुखंड क्रमांक ५ या १५०० चौरस फुटाची नोटरीकृत विक्रीपञ करुन दिले. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर असे सिद्ध होते की तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडुन प्‍लॉट विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त  करुनही तक्रारकर्तीला सदर भुखंड क्रमांक १३० चा ताबा दिला नाही. उलट सदर जागेवर विरुध्‍द  पक्षाने अनधिकृतपणे अष्‍टविणायक एम्‍पायर या नावाची फ्लॅट स्‍कीम उभारली व भुखंडाचा ताबा स्‍वतःजवळ ठेवला तसेच प्‍लॉट क्रमांक ५ चे खोटे व नोटरीकृत विक्रीपञ करुन देणे ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ती प्रती अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे. करीता खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्ष यांना निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्तीला वादातील भुखंड क्रमांक ५ मौजा वानाडोंगरी सर्व्‍हे नंबर १०४, पटवारी हलका नंबर ४६ चे विक्रीपञ करुन ताबा द्यावा व विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्त्‍याने स्‍वतः सोसावा.

किंवा

विरुध्‍द पक्षाला तांञिक दृष्‍ट्या सदर भुखंडाचे विक्रीपञ व ताबा  तक्रारकर्तीला देणे शक्‍य  नसल्‍यास विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी भुखंडासाठी वानाडोंगरी झोनमधील अथवा नजीकच्‍या  इतर झोनमध्‍ये १६७५ चौ. फुटाच्‍या अकृषक भुखंडासाठी शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्तीला  आदेशाच्‍या  दिनांकापासुन एक महिण्‍याच्‍या आत द्यावी आणि सदरहु रक्‍कम एक महिण्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रकमेवर दिनांक  १२/०३/२००७ पासुन द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये ४०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  2. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.

तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.