Maharashtra

Nagpur

CC/368/2018

SHRI. RAJESH JAGDISH CHUGH - Complainant(s)

Versus

M/S. ASHTAVINAYAK PLANNERS & DEVELOPERS, THROUGH PARTNERS - Opp.Party(s)

ADV. MASOOD SHAREEF

27 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/368/2018
( Date of Filing : 18 May 2018 )
 
1. SHRI. RAJESH JAGDISH CHUGH
R/O. KALLURWAR COMPLEX (C/O. SHRIRAM HOSIERIES), BALLARPUR-442701, CHANDRAPUR
CHANDRAPUR
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/S. ASHTAVINAYAK PLANNERS & DEVELOPERS, THROUGH PARTNERS
LAXMISADA APRT., NEAR SAI MANDIR, CHHATRAPATI SQUARE, WARDHA ROAD, NAGPUR-440010.
Nagpur
Maharashtra
2. GIRISH MOTILAL JAISWAL, M/S ASHTAVINAYAK PLANNERS & DEVELOPERS
R/O. 134, CHETANA APARTMENT, RAMDASPETH, NAGPUR-440015
Nagpur
Maharashtra
3. AJAY KRISHNAMOHAN JAISWAL, M/S ASHTAVINAYAK PLANNERS & DEVELOPERS
R/O. 134, CHETANA APARTMENT, RAMDASPETH, NAGPUR-440015
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. MASOOD SHAREEF, Advocate
For the Opp. Party:
Dated : 27 Dec 2019
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 ही फर्म असून विरुध्‍द पक्ष 2 व 3 हे त्‍याचे भागीदार असनू अष्‍टविनायक डेव्‍हल्‍पर्स या नावाने व्‍यवसाय करतात. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून मौजा- जामठा, ता.जि. नागपूर येथील अष्‍टविनायक एम्‍प्‍यार जामठा गॅलेक्‍सी या टाऊनशिपमध्‍ये रिध्‍देश अपार्टमेंट मधील तिस-या मजल्‍यावरील  फ्लॅट क्रं. 304, 700 स्‍के. फु. हा रुपये 12,46,460/- मध्‍ये खरेदी करण्‍याचे दि. 02.06.2011 रोजी ठरविले. याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 22.04.2015 पर्यंत एकूण रुपये 6,23,938/- जमा केले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक 18.06.2011 रोजी गॅरन्‍टी बॉन्‍ड लिहून दिलेला आहे. त्‍यात असे नमूद केले होते की, सदरचा गॅरन्‍टी बॉन्‍ड लिहून दिल्‍यापासून कोणत्‍याही कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याने 12 महिन्‍याच्‍या आंत सदर फ्लॅटचे आरक्षण रद्द केल्‍यास विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍याकडून घेतलेली रक्‍कम 12 टक्‍के व्‍याजासह परत करतील. परंतु विरुध्‍द पक्षाने विहित मुदतीत फ्लॅटचे बांधकाम पूर्ण केले नाही आणि गॅरन्‍टी बॉन्‍डप्रमाणे कोणतीही पूर्तता केली नाही. याकरिता तक्रारकर्त्‍याने वारंवांर विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधला व गॅरन्‍टी बॉन्‍डप्रमाणे पूर्तता करण्‍याची विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीची दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 18.12.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली.  सदरची नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केले असल्‍याचे घोषित करावे. विरुध्‍द पक्ष यांनी उपरोक्‍त फ्लॅट क्रं.  304  याचे सर्व बांधकाम करुन सर्व सुख-सुविधां पुरवाव्‍या व कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र  करुन सदर फ्लॅटचा प्रत्‍यक्ष ताबा तक्रारकर्त्‍याला द्यावा.  किंवा  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली एकूण रक्‍कम रुपये 6,23,938/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह परत करावी.  तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त झाल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष प्रकरणात हजर झाले.  विरुध्‍द पक्ष यांना लेखी उत्‍तर  दाखल  करण्‍याकरिता  पुरेशी संधी देऊन ही त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण विना लेखी जबाब पुढे चालविण्‍याचा आदेश दिनांक 09.10.2018 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवज, लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले व तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

  1.  

अ. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?         होय  

               आ. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित

                      व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?                   होय

               ई.   काय आदेश ?                         अंतिम आदेशानुसार

 

  •   निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून मौजा- जामठा, ता.जि. नागपूर येथील अष्‍टविनायक एम्‍प्‍यार जामठा गॅलेक्‍सी टाऊनशिप येथील रिध्‍देश अपार्टमेंट मधील तिस-या मजल्‍यावरील  फ्लॅट क्रं. 304, रुपये 12,46,460/- मध्‍ये खरेदी करण्‍याचे दि. 02.06.2011 रोजी ठरविले होते. याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दिनांक 22.04.2015 पर्यंत एकूण रक्‍कम रुपये 6,23,938/- जमा केले असल्‍याचे रक्‍कमेच्‍या पावत्‍या, बॅंके द्वारे अदा केलेल्‍या रक्‍कमेचे बॅंक स्‍टेटमेंट,  विरुध्‍द पक्षाने प्रसिध्‍द केलेले ब्राऊशर (पाम्‍ंप्‍लेट), बांधकामाचे सविस्‍तर विवरण इत्‍यादी दस्‍तऐवज अभिलेखावर दाखल केलेले आहे. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक 18.06.2011 गॅरन्‍टी बॉन्‍ड लिहून दिलेला आहे हे नि.क्रं. 2 वर दाखल केलेले आहे. त्‍यात असे नमूद केले होते की, सदरचा गॅरन्‍टी बॉन्‍ड लिहून दिल्‍यापासून कोणत्‍याही कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याने 12 महिन्‍याच्‍या आंत सदर फ्लॅटचे आरक्षण रद्द केल्‍यास विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍याकडून घेतलेली रक्‍कम 12 टक्‍के व्‍याजासह परत करतील. परंतु विरुध्‍द पक्षाने विहित मुदतीत ठरल्‍याप्रमाणे फ्लॅटचे बांधकाम पूर्ण केले नाही आणि गॅरन्‍टी बॉन्‍डप्रमाणे कोणतीही पूर्तता केली नाही, ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून त्‍यांनी अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केले असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                       अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या उपरोक्‍त फ्लॅट क्रं. 304 चे संपूर्ण बांधकाम मुळ सुविधांसह पूर्ण करुन द्यावे व तक्रारकर्त्‍याकडे असलेली उर्वरित रक्‍कम रुपये 6,22,522/- स्‍वीकारुन तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून प्रत्‍यक्ष फ्लॅटचा ताबा द्यावा. तसेच सदरहू फ्लॅटच्‍या विक्रीपत्र नोंदणीचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.  

                          किंवा

उपरोक्‍त फ्लॅटचे मुळ सुविधांसह बांधकाम पूर्ण करुन कायदेशीररित्‍या विक्रीपत्र करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 6,23,938/- व त्‍यावर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेला शेवटचा हप्‍ता म्‍हणजेच दि. 22.04.2015 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.