जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे तक्रार क्र. - 83/2010 दाखल दिनांक - 18/02/2010 निकालपञ दिनांक - 22/07/2010 कालावधी - 05 महिने 04 दिवस श्री. रघुनाथ मंडल विजय बँकेच्या मागे, अगाशी रोड, विरार (पश्चिम). ता. - वाशी 401 303. .. अर्जदार विरूध्द मे. अरो डिजिटल प्रा. लि., 1005-1006, मिठाकली, अहम्दाबाद 380 006. .. गैरअर्जदार
समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्री.पी.एन.शिरसाट - मा. सदस्य उभय पक्षकार गैरहजर आदेश (दिः 22/07/2010 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. सदर प्रकरण आज रोजी सुनावणीस आले असता उभय पक्षकारांचा तीन वेळा पुकारा करण्यात आला, ते अथवा त्यांचे वतिने कोणीही हजर झाले नाही. रोजनाम्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की दि.06/04/2010, दि.20/04/2010, दि.01/06/2010, व आज दि.20/07/2010 या तारखांना अर्जदार सातत्याने गैरहजर आहेत. त्यामुळे अर्जदार सदर प्रकरण चालविण्यास इच्छुक नाहीत असे स्पष्ट होते. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- अंतीम आदेश 1.अर्जदारांच्या सततच्या गैरहजेरीच्या कारणाखातर तक्रार क्र. 83/2010 खारीज करण्यात येते. 2.प्रकरण निकाली. 2.न्यायीक खर्चाचे वहन उभयपक्षाने स्वतः करावे.
दिनांक – 22/07/2010 ठिकाण - ठाणे (श्री.पी.एन.शिरसाट) (श्री.एम.जी.रहाटगावकर ) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|