Maharashtra

Nagpur

CC/09/237

Mangesh Pundlikrao Umathe - Complainant(s)

Versus

M/s. Apulki Viaragade Hospital - Opp.Party(s)

15 Oct 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/09/237
1. Mangesh Pundlikrao UmatheNagpurMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. M/s. Apulki Viaragade HospitalNagpurMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 15 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्री विजयसिंह राणे - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 15/10/2010)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 13.04.2009 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          प्रस्‍तुत तक्रारीत तक्रारकर्त्‍याने नमुद केले आहे की, तो अपघातग्रस्‍त झाला व त्‍याच्‍या उजव्‍या हाताला इजा झाली आणि त्‍यामध्‍ये हाड तुटल्‍यामुळे त्‍याला दि.11.09.2008 रोजी गैरअर्जदारांचे दवाखान्‍यात भरती करण्‍यांत आले व त्‍याचे हाताची शस्‍त्रक्रिया करुन त्‍याचे हातामध्‍ये रॉड टाकण्‍यांत आला. दि.14.09.2008 ला तक्रारकर्त्‍यास सुटी देण्‍यांत आली. काही दिवसांनी तो गैरअर्जदारांकडे बॅडेजसाठी गेला असता त्‍याचे हातामधुन एका बाजूने रक्‍त व पु निघत असल्‍याचे लक्षात आले, तसेच रॉड जागा सोडून बाहेर आल्‍याचे दिसुन आले. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे होते की, त्‍यांनी सदर रॉड काढून दुसरा रॉड टाकून द्यावा, गैरअर्जदाराने त्‍यास नकार दिला व तक्रारकर्त्‍यास अपमानास्‍पद वागणूक दिली व हाकलून दिले. त्‍यानंतर तक्रारकर्ता मेओ हॉस्‍पीटल येथे गेला असता त्‍यांनी सांगितले की, दुस-या डॉक्‍टरांनी केलेली चुक आम्‍ही दुरुस्‍त करीत नाही. त्‍यानंतर तो पुन्‍हा गैरअर्जदाराकडे गेला तेव्‍हाही त्‍याला हाकलून देण्‍यांत आले. गैरअर्जदाराने चुकीची शस्‍त्रक्रिया केल्‍यामुळे व आवश्‍यकते पेक्षा जास्‍त मोठा रॉड टाकल्‍यामुळे हा प्रकार झालेला आहे व त्‍याची संपूर्ण जबाबदारी गैरअर्जदाराची आहे. प्रस्‍तुत तक्रारीत तक्रारकर्त्‍याने त्‍याला नोकरीतून काढून टाकण्‍यांत आल्‍याचे नमुद केले आहे. शेवटी तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना नोटीस पाठविला तो त्‍यांना मिळाला असता त्‍यांनी मागणीची पुर्तता केली नाही व शेवटी तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचात दाखल करुन रु.4,00,000/- मिळावे. तसेच शासकीय योजनेचा लाभ घेता आला नाही त्‍याकरता रु.50,000/- व रोजगारापासुन वंचित राहिल्‍यामुळे रु.40,000/- ची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे.
 
3.          प्रस्‍तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्‍यांत आली असता, त्‍यांना नोटीस मिळाल्‍यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्‍यांनी आपले लेखी उत्‍तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे.
4.          गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचे सर्व विपरीत म्‍हणणे नाकबुल केले. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, शल्‍यचिकीत्‍सा करुन तुटलेल्‍या हाडाला आधार म्‍हणून रॉड टाकला व तक्रारकर्त्‍याला दवाखान्‍यातून सुटी देतांना प्रतिबंधक औषधे लिहून दिली होती. तसेच पुर्नतपासनी व बँडेज करण्‍याकरता प्रत्‍येक 3 दिवसांनी बोलावले होते, परंतु तो आला नाही. गैरअर्जदाराने शल्‍यचिकीत्‍सा करीत असतांना सर्व काळजी घेतली असल्‍याचे नमुद केले आहे. तक्रारकर्ता सन 2009 मध्‍ये कायमचे अपंगत्‍व प्रमाणपत्र मागण्‍याकरता जानेवारी-2009 मध्‍ये आला व त्‍यावेळी शस्‍त्रक्रियेस 6 महिने झालेले नसल्‍यामुळे ते प्रमाणपत्र देण्‍यांस नकार दिला. तसेच सदर प्रकरणी त्‍यांनी कोणतीही चुक केलेली नसुन ते अनुभवी डॉक्‍टर आहेत आणि तक्रारकर्त्‍याला त्‍याचे मागणी प्रमाणे अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र देण्‍यांत न आल्‍यामुळे नाराज होऊन त्‍यानं सदर तक्रार दाखल केल्‍याचे म्‍हटले आहे.
 
5.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर .उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
      -// नि ष्‍क र्ष //-
 
6.          प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारकर्ता व गैरअर्जदारांचे वकील यांचा युक्तिवाद ऐकण्‍यांत आला, सदर प्रकरणी तज्ञांचा अभिप्राय मागविण्‍यांत आला होता. तज्ञांनी म्‍हणजेच इंदिरा गांधी शासकीय मेडिकल महाविद्यालय, नागपूर तर्फे प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट यांनी आपला अभिप्राय मंचास दि.07.08.2010 रोजी सादर केला तो खालिल प्रमाणे आहे...
1)         Patient Mr. Magesh Umate had an accidental fall and s sustained fracture both  bones lower one third right side.
2)         He underwent surgery on dated 11.09.2008 in Apulki Vairgade Hospital,         Manewada Cement Road, Nagpur. The fracture fixation was Done with two            square nails.
3)         He reported to Indira Gandhi Medical College & Hospital, Nagpur on dated     17.03.2009, Orthopaedic OPD and found pus discharge and nail protrusion at         ulnar end of ® forearm.
4)         Patient developed delayed deep infection with implant failure.
            The infection and implant failure is post surgical complications and can occur in 2% of cases anywhere.
 
            सदरच्‍या अभिप्रायाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये गैरअर्जदारांनी कोणत्‍या प्रकारे निष्‍काळजीपणा केलेला आहे व निष्‍काळजीपणामुळे तक्रारर्त्‍याची दुखापत बरी झाली नाही, अश्‍या प्रकारचा कोणताही अभिप्राय दिलेला नाही. तक्रारकर्त्‍याचा मुख्‍य उजर असा आहे की, त्‍याच्‍या हातामध्‍ये टाकण्‍यांत आलेल्‍या रॉडची लांबी ही आवश्‍यकतेपेक्षा जास्‍त होती. त्‍यामुळे सदर प्रकार झालेला आहे अश्‍या प्रकारचा युक्तिवाद तक्रारकर्त्‍यातर्फे करण्‍यांत आला. परंतु तक्रारकर्ता या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ कोणताही पुरावा सादर करु शकला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याचे हातामध्‍ये टाकलेला रॉड हा गरजे पेक्षा जास्‍त मोठा आहे असा तज्ञ व्‍यक्तिंचा अभिप्राय मंचासमक्ष येणे गरजेचे आहे. तसा कोणताही अभिप्राय तक्रारकर्ता आणू शकला नाही.
7.          येथील तज्ञ डॉक्‍टरांनी आपल्‍या अभिप्रायात म्‍हटल्‍या प्रमाणे शस्‍त्रक्रीयेनंतर 2% प्रमाणात जंतुसंसर्ग होऊ शकतो आणि असे जंतुसंसर्ग झाल्‍यानंतर हातामध्‍ये टाकण्‍यांत आलेला रॉड हा स्थिर न राहता ढीला होऊन एका बाजूने बाहेर येतो. गैरअर्जदार डॉक्‍टरांनी शस्‍त्रक्रीयेच्‍या वेळेस योग्‍य काळजी घेतली नाही असाही निष्‍कर्ष काढणे शक्‍य नाही.
            वरील सर्व बाबींचा विचार करता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
           
            -// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार योग्‍य पुराव्‍या अभावी निकाली काढण्‍यांत येते. तक्रारीचा खर्च      त्‍यांनी स्‍वतः सोसावा.
            (मिलींद केदार)                         (विजयसिंह राणे)
               सदस्‍य                                अध्‍यक्ष
     
 
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT