Maharashtra

Nagpur

CC/10/776

Shri Milind Shankar Meshram - Complainant(s)

Versus

M/s. Apollo Builders and Developers - Opp.Party(s)

Adv. Manoj Joshi

15 Jul 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/776
1. Shri Milind Shankar MeshramBalaji Apartment, Vishwakarma Nagar,NagpurMaharashtra2. Shri Arvind Udhavrao ShahareBalaji Apartment, Vishwakarma NagarNagpurMaharashtra3. Shri Khushal Kothiram KambleBalaji Apartment, Vishwakarma NagarNagpurMaharashtra4. Shri Krushna Nandu KashyapBalaji Apartment, Vishwakarma NagarNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. M/s. Apollo Builders and DevelopersPlot No. 6, Samrudhi NagarNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :

Dated : 15 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक :15/07/2011)
 
 
1.           प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 24.12.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
                       
2.          यातील तक्रारकर्त्‍यांची थोडक्‍यात तक्रार गैरअर्जदाराविरुध्‍द अशी आहे की, त्‍यानं गैरअर्जदाराकडून फ्लॅट विकत घेतले त्‍याचे क्रमांक अनुक्रमे एफ-101, टी-302, एस-203 व एस-202 असे असुन त्‍यांची किंमत रु.10,00,000/-, 9,00,000/-, 7,50,000/- अशी आहे. सदरचे विक्रीपत्र करुन घेतल्‍यानंतर तक्रारकर्त्‍यांच्‍या लक्षात आले की, इमारतीचे बांधकाम कराराप्रमाणे ब्रोशरनुसार झालेले नाही व त्‍यात पुढील प्रमाणे त्रुटया आहेत. जसे इमारतीचा मुख्‍य दरवाजा व दरवाजाकडे जाणा-या जिन्‍याचे बांधकाम तयार करण्‍यांत आले नाही, इमारतीची मागची भिंत पाडून इमारतीत जाण्‍याकरीता मार्ग गैरकायदेशिर बनविलेला आहे, भिंताला लागून मोटर सायकलचे दुकान चालविण्‍याची परवानगी दिली, इमारतीला व कंपाऊंडला रेग-रंगोटी केलेली नाही, तसेच जमीनीखाली पाण्‍याचे टाके बनवुन दिलेले नव्‍हते ते तक्रारकर्त्‍यांनी स्‍वतःच्‍या पैशाने बनविलेले आहे.
 
4.          तक्रारकर्त्‍यांनी वेळोवेळी गैरअर्जदारांशी संपर्क करुन वर नमुद त्रुटी त्‍यांचे लक्षात आणून दिली असता त्‍यांनी तक्रारकर्त्‍यांच्‍या विनंती/ प्रार्थनेकडे दुर्लक्ष केले. त्‍यामुळे नाईलाजाने दि.26.10.2010 रोजी नोटीस पाठविला. सदर नोटीसला गैरअर्जदारांनी उत्‍तर दिले नाही म्‍हणून ही तक्रार मंचात दाखल केलेली आहे व ती व्‍दारे बांधकामातील त्रुटया पूर्ण करण्‍यांत याव्‍या, शारीरिक मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/- नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च रु.20,000/- मिळावा अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
5.          यातील गैरअर्जदारांना नोटीस देण्‍यांत आला असता ते मंचात हजर झाले मात्र त्‍यांनी आपला जबाब दाखल केला नाही. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण विना लेखी जबाब चालविण्‍याचा आदेश दि.21.03.2011 रोजी पारित करण्‍यांत आला.
 
5.          तक्रारकर्त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात अनुक्रमांक 1 ते 4 विक्रीपत्र, करारनामा, नोटीस व पोच पावती, इमारतीची माहीती पुस्तिका इत्‍यादी दस्‍तावेजांच्‍या छायांकित प्रती जोडलेल्‍या आहेत.
 
 
 
 
 
6.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.01.07.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्‍यांचे वकील हजर त्‍यांचा युक्तिवाद मंचाने ऐकला, गैरअर्जदारा विरुध्‍द विना लेखी जबाब आदेश पारित. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
 
-// नि ष्‍क र्ष //-
 
 
7.          यातील तक्रारकर्त्‍यांनी एकत्रीत ही तक्रार केलेली असुन यात एकूण चार तक्रारकर्ते आहेत. मात्र त्‍यांनी विक्रीपत्र तीघांचे प्रविष्‍ट केले असुन किंमत तीन विक्रीपत्रांची दिलेली आहे. सदर फ्लॅटची किंमत अनुक्रमे रु.10,00,000/- 9,00,000/- व 7,50,000/- याप्रमाणे एकूण रु.26,50,000/- एवढी होते आणि तक्रारकर्त्‍याने ही तक्रार एकत्रीत केलेली आहे. त्‍यामुळे या तक्रारीचे मुल्‍यांकन हे रु.26,50,000/- एवढे होते आणि या मंचाचे आर्थीक अधिकार क्षेत्र हे रु.20,00,000/- पर्यंत असल्‍यामुळे ही तक्रार या मंचाचे आर्थीक अधिकार क्षेत्रात येत नसल्‍यामुळे ती विचारात घेणे योग्‍य नाही. म्‍हणून ही तक्रार निकाली काढण्‍यांत येते.
 
                  -// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्त्‍यांची तक्रार निकाली काढण्‍यांत येते.
2.    दोन्‍ही पक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सोसावा.
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT