ग्राहक तक्रार क्रमांकः-58/2009 तक्रार दाखल दिनांकः-28/01/2009 निकाल तारीखः-31/05/2010 कालावधीः-01वर्ष04महिने03दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्रीमती.श्रेयसी अमित पेठे 101 राहुल विंग,श्रीकृष्ण नगर, पुरापडा,चाळ पेठ,आगाशी, विरार(प)ता.वसई,जि.ठाणे401 301 ...तक्रारकर्ता विरुध्द मेसर्स.अनिल एम.पेडणेकर ज्वेलर्स, पेट्रोलपंपाजवळ, आगाशी रोड, विरार(प)ता.वसई जि.ठाणे.401 303 ...वि.प. उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.ए.बी.जहागिरदार. विरुध्दपक्षः-स्वतःहजर गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.सौ. भवना पिसाळ, मां.सदस्या 3.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-31/05/2010) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्ज दिनांक28/01/2009 रोजी विरुध्दपक्षकार यांचे विरुध्द दाखल करुन नमुद केले आहे की, तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचेकडे जुने के.डी.एस.सोने दिले व नविन हॉलमार्कच्या वस्तू पाहिजेत म्हणून मागणी केली. त्याकरिंता होणारी जादा रक्कम देण्यास तक्रारदार ही तयार होती. तक्रारदार हिने 33.250 ग्राम 23कॅरेट सोने झालेने वरील 12,000/- रुपये जादा होणारी रक्कम विरुध्दपक्षकार यांना देण्यास तयार होते. अशी रक्कम देण्यासाठी तक्रारदार यांनी बँकेकडून आर्थिक सहाय्य घेतले. विरुध्दपक्षकार यांनी ऑर्डर नं.131दिनांक06/02/2008रोजी बुक करुन घेतली व नविन वस्तू तयार करुन दिनांक02/03/2008 रोजी देण्याचा होता. परंतु विरुध्दपक्षकार यांनी ऑर्डर घेतली पण नेमल्या वेळेत ऑर्डर पुर्ण करु दिली नाही. दिनांक 08/03/2008, 18/03/2008, 20/04/2008, 29/04/2009 रोजी त्यांचे कामगार नसल्याने वस्तू तयार झाल्या नाहीत. 2/- दिनांक 29/04/2004 रोजी विरुध्दपक्षकार यांनाहॉलमार्क सोने वस्तू देता येणार नाही असे कळविले. कारण त्यांचे रजिस्ट्रेशन नाही व ते तसे तयार होण्यास थोडा कालावधी लागणार यांची स्पष्ट माहिती दिली होती. तरीसुध्दा तक्रारदार हे विरुध्दपक्षकार यांचेकडे वेळोवेळी ऑर्डरप्रमाणे सोने वस्तू मागणीसाठी गेले होते. तथापी वेळेत ऑर्डर दिले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना त्यांचे घरचे लग्न सोहळयावेळी सोने वापरण्यास मिळाले नाही. दिनांक07/08/2008 रोजी तक्रारदार यांना या व्यवहारांची खात्री झाली की विरुध्दपक्षकार हे त्यांची फसवणूक करीत आहेत. म्हणून दिनांक20/08/2008 रोजी विरुध्दपक्षकार यांचेविरुध्द पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली व मंचातही तक्रार दाखल केली व मागणी केली आहे की, विरुध्दपक्षकार यांनी वेळेत सोने तयार करुन न दिल्याने तक्रारदार यांना सोने लग्नात वापरण्यास न मिळाल्याने समाजात प्रतिष्ठा कमी झाली व मानहानी झाली. म्हणून 3,00,000/- (रुपये तीन लाख फक्त) नुकसान भरपाई रक्कम मागणी केलेली आहे. मानसिक, शारिरीक त्रासाबाबत रुपये 1,00,000/- रुपयेची नुकसान भरपाई, सदर अर्जाचा खर्च रु.20,000/- रुपये विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना जुने केडीयम 23कॅरेट33.250 ग्राम सोने परत करावे. विरुध्दपक्षकार यांनी पुन्हा असे कृत्य करु नये.म्हणून कायदेशीर शिक्षा करणेत यावी. इतर अनुषंगीक दाद मिळावी.विरुध्दपक्षकार यांचेकडून मिळावी म्हणून अशी मागणी केलेली आहे. 2)विरुध्दपक्षकार यांनी दिनांक02/04/2009 रोजी मंचात उपस्थित राहून लेखी जबाब नि.5वर दाखल केलेले आहे. त्यांचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- तक्रारदार यांनी 4,20,000/- ची मागणी केली आहे. विरुध्दपक्षकार यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. तक्रारदार यांनी 6,480/- पैकी अँडव्हान्स रक्कम रुपये 100/- फक्त दिलेली आहे. तक्रारदार यांची तक्रार खोटी असल्याने कलम 26प्रमाणे कॉस्ट लावणेत यावी व अर्ज नामंजुर करणेत यावा. विरुध्दपक्षकार हे तक्रारदार यांना त्यांचे 33.250ग्रॅम सोने व 100/- रुपये परत देण्यास तयार आहेत. मार्च,एप्रिलमध्ये अनेक सण असल्याने अडचणी आल्याने वस्तू तयार करण्यास विलंब झाला आहे. पण तक्रारदार यांनी तोंडी चर्चा करुन 29/04/2008 रोजीच त्यांची ऑर्डर रद्द करणेकरींता सांगितले तेव्हाच सोने परत घेणे आवश्यक होते. पण घेवून गेले नाहीत.07ऑगष्ट,2008 (नि.ए.3) रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली व 39,900/- रुपये रक्कम मागणी केली. विरुध्दपक्षकार यांचेकडे हॉलमार्कचे 3/- लायसेन्स नसल्याने त्यावेळी तसे सोने वस्तू देवू शकत नव्हते. जे सोन्याचे उत्पादन करतात ते हॉलमार्क प्रमाणपत्र देतात. म्हणून सदर तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावी. 3)तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज, विरुध्दपक्षकार यांनी दाखल केलेले म्हणणे, उभयतांची कागदपत्रे, लेखी युक्तीवाद यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले त्यावर कारण मिमांसा देवून आदेश पारीत करण्यात आले. 3.1)सदर तक्रार अर्ज अंतिम निर्णयाकरींता नेमण्यापुर्वी मंचापुढे चर्चा झाली,युक्तीवाद झाले. त्यावेळी अखेर तक्रारदार हे वितळवलेले सोने33.250 ग्रॅम स्विकारण्यास तयार झालेने व गायत्री टचलॅब गोल्ड अँसे.रिपोर्ट दाखल केल्याने तक्रारदार यांचे जुने सोने वितळवल्यानंतर जशाच्या तश्या सोन्याच्या पुर्वीच्या वस्तू परत करणे शक्य नाही हे पुराव्यासह सिध्द केल्याने गोल्ड अँसे.रिपोर्ट प्रमाणे सोने स्विकारणे ही तक्रारदार यांची जबाबदारी व कर्तव्य होते व आहे. म्हणून नि.12 व 13 चे अर्ज उभय पक्षकारांनी दाखल केले आहेत व 100/- रुपये विरुध्दपक्षकार यांनी परत केले आहेत. त्यामुळे मुळ मुद्दा संपुष्टात आलेला आहे. कोणतेही वाद त्या मुद्दयावर उर्वरित नाहीत. 3.2)म्हणून तक्रारदार यांचे तक्रार अर्जाप्रमाणे विरुध्दपक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे का.?व नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत कां?हे मुद्दे पडताळणे आवश्यक आहेत. त्यांची कारणमिमांसा व आदेश पुढील प्रमाणे. विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना दिनांक02/03/2008 रोजी हॉलमार्क सोन्याचे मंगळसुत्र तयार करुन देण्याचे होते याबाबत दिनांक06/02/2008 रोजीची पावती तक्रारदार यांनी दाखल केलेली आहे. विरुध्दपक्षकार यांनीही ती मान्य केली आहे. तथापी पावती देतांना अथवा ऑर्डर घेतांना जर विरुध्दपक्षकार यांचेकडे 'हॉलमार्क' देण्याचे लायसेन्स/परवाना नव्हता तर तो मुद्दा विरुध्दपक्षकार यांनी प्रथम मान्य कां केला?हा मुद्दा उपस्थित होतो. व नेमल्या तारखेदिवशी ऑर्डर पुर्ण केली नाही. तो मुद्दाही विरुध्दपक्षकार यांनी मान्य व कबुल केला आहे व त्या मुद्दयाऐवजी अनेक सण असल्याने अडचणी आल्या होत्या असे नमुद केले आहे. म्हणजेच वेळेत ऑर्डर पुर्तता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना लग्न कार्यालयादिवशी मंगळसुत्र मिळाले नाही हे त्यामुळे सहाजिकच समाजापुढे चर्चा व अडचणीस समोर जावे लागले हे मान्य व गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे. तथापी नुकसान भरपाई करीता जी लाखो रुपयांची मागणी केली आहे ती मागणी योग्य व बरोबर आहे हे तक्रारदार यांनी मंचापुढे पुराव्यासह सिध्द 4/- केलेली नाही. विरुध्दपक्षकार हे पहिले सोन्याच्या वस्तू वितळविल्याशिवाय त्यातून नेमके किती वजनाचे सोने मिळाले व किती चोख सोने आहे हे समजून येत नाही. म्हणून जुन्या सोन्याच्या वस्तू वितळवल्यानंतर त्या तशाच्या तशा परत वरील कारणांमुळे देणे शक्यच नाही. म्हणून विरुध्दपक्षकार यांनी वेळेत ऑर्डर दिली नाही व मागणी प्रमाणे ''हॉलमार्क'' च्या वस्तू देण्याची तयारी दर्शविली व नंतर नाकबुल केल्याने सेवेत त्रुटी निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला आहे व त्यामुळे सहाजिकच आर्थिक,शारीरीक व मानसिक त्रास नुकसान भरपाई झालेले आहे. म्हणून आदेश. -आदेश - 1)तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात आला आहे. 2)तक्रारदार यांना नि.12 व 13 प्रमाणे सोने 33.250 ग्रॅम मिळालेले आहे(देण्यात आलेले आहे) 3)विरुध्दपक्षकार यांनी सेवेत त्रुटी,निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला आहे त्यामुळे आर्थिक,शारिरीक व मानसिक त्रासापोटी तक्रारदार यांना रुपये 2,000/-(रु.दोन हजार फक्त) नुकसान भरपाई व रु.1,000/-(रु.एक हजार फक्त)अर्जाचा खर्च दयावा. अशा आदेशाचे पालन विरूध्दपक्ष यांनी आदेशांची सही शिक्क्याची प्रत मिळालेपासून 30 दिवसात पुर्णपणे एकरक्कमी परस्पर (डायरेक्ट) देय करण्याचे आहे. असे विहीत मुदतीत न घडल्यास मुदती नंतर रक्कम फिटेपर्यंत सर्व रक्कमेवर द.सा.द.शे 10% व्याज दराने दंडात्मक व्याज (पिनल इंट्रेस्ट) म्हणुन रक्कम देण्यास पात्र व जबाबदार कायदेशिररीत्या बंधनकारक आहेत. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 5)तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-31/05/2010 ठिकाणः-ठाणे (श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे |