Final Order / Judgement मा. अध्यक्ष श्री. सचिन शिंपी यांचे आदेशान्वये. - तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 नुसार दाखल केलेली आहे.
- तक्रारदार यांची भागीदारी संस्था असुन वि.प. यांचा Reaction vessal, high speed Dispersor Dynomill, Ballmill, Extruder, dryer, sigma Mixer, ACM, Jetmill, Material Conveying and process automotion तयार करण्याचा व्यवसाय असुन तक्रारदाराने दिनांक 24.8.2024 रोजी वि.प. यांचेशी संपर्क करुन Basket Extruder व SS-304 Shieve Shaker च्या बाबत माहिती मागविली. वि.प.यांनी दिलेल्या कोटेशन नुसार तक्रारदार यांनी Basket Extruder व SS-304 Shieve Shaker ची कोटेशन प्रमाणे रुपये 3,50,000/- इतकी किंमत असल्याने अग्रीम म्हणुन तक्रारदाराने रुये 1,75,000/-, इतकी रक्कम दिनांक 5.10.2020 रोजी एनइएफटी व्दारे वि.प. ला पाठविले व उर्वरित रक्कम मशीन देतेवेळी देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने वि.प. यांना अग्रीम म्हणुन रक्कम अदा करुन देखिल वि.प. यांनी मशीनची डीलीव्हरी तक्रारदारास दिली नाही म्हणुन त्याबाबत वि.प. यांचेशी इ-मेल व नोटीस व्दारे संपर्क करुन देखील वि.प. ने तक्रारदारास मशीन दिली नाही व अग्रीमपोटी घेतलेली रक्कमही परत केली नाही. सदरची बाब ही अनुचति व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असुन आहे म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन वि.प.ने उर्वरित रक्कम स्वीकारुन दोन मशीन द्यावा किंवा अग्रीम घेतलेली रक्कम 1,75,000/-, दिनांक 5.10.2020 पासुन व्याजासह परत करावी. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक शारीरिक त्रासाबद्दल रुपये रु.50,000 व तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावे अशी मागणी केली.
- तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प. यांना नोटीस पाठविण्यात आली असता वि.प. यांना दिनांक 11.7.2022 रोजी नोटीस प्राप्त होऊनही वि.प. तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन दिनांक 21.3.2023 रोजी सदर तक्रार वि.प. विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश नि.क्रं.1 पारित करण्यात आला.
- तक्रारदार यांनी युक्तीवादाबाबत पूरसिस दाखल केले. तसेच तक्रारदारातर्फे अभिलेखावर दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित खालील मुद्दे विचारार्थ आले असता त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे देण्यात आली.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा देवून
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय ? होय - काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
का र ण मि मां सा - मुद्दा क्रं.1 व 2 बाबत - तक्रारदाराने वि.प. यांचेकडुन Basket Extruder व SS-304 Shieve Shaker मशीन विकत घेण्याकरिता दिनांक 24.8.2020 कोटेशन मागविले होते ही बाब अभिलेखावर दाखल नि.क्र.2(1) वरील कोटेशनवरुन स्पष्ट होते. तसेच त्या कोटेशनचे अनुषंगाने वि.प. यांनी दिनांक 29.8.2020 रोजी तक्रारदारास सदर मशीन पाठविण्याकरिता रक्कम रुपये 4,13,000/- चे परचेस ऑर्डर पाठविल्याचे नि.क्र.2/2 वरुन स्पष्ट होते. वि.प. यांनी दिलेल्या कोटेशनप्रमाणे तक्रारदाराने दिनांक 5.10.2020 रोजी एनइएफटी व्दारे रुपये 1,75,000/- वि.प. ला अग्रीम म्हणुन पाठविल्याचे नि.2/3 चे स्टेटमेंटवरुन स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प. चा ग्राहक सरंक्षण कायदा कलम 31(II) नुसार ग्राहक आहे हे सिध्द होते.
- वि.प. यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तक्रारदारास मशीन न पाठविल्यामूळे तक्रारदाराने वि.प. यांना वेळोवेळी ई-मेल व्दारे संपर्क केल्याची बाब नि.क्र.2/4 चे ईमेलचे प्रतीवरुन स्पष्ट होते. तसेच वि.प. यांनी मशीनची डिलीव्हरी दिली नाही व रक्कम देखिल परत केली नाही म्हणुन तक्रारदाराने वि.प. यांना दिनांक 7.7.2021 रोजी नोटीस पाठविल्याची बाब नि.क्र. 2/5 चे नोटीसचे प्रतीवरुन स्पष्ट होते.
- तक्रारदाराने त्यांचे तक्रार अर्जात मशीनची किंमत 3,50,000/- नमुद केली असली तरीही वि.प. यांनी नि.क्रं.2/2 वर तक्रारदार यांना दिलेल्या परचेस ऑर्डरमध्ये जीएसटीसह मशीनची किंमत रुपये 4,13,000/-अशी नमुद आहे. परिणामी तक्रारदाराने अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन ही बाब स्पष्ट होते की वि.प. यांनी तक्रारदाराकडुन अग्रीम रक्कम स्विकारुनही तक्रारदारास मशीनचा पूरवठा केला नाही ही बाब तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असुन सेवेतील कमतरता ठरते. परिणामी वि.प. यांनी दिलेल्या कोटेशन प्रमाणे रुपये 4,13,000/- रक्कमेपैकी रुपये 1,75,000/- इतकी रक्कम स्विकारल्यामूळे उर्वरित रक्कम रुपये 2,38,000/- एवढी रक्कम स्विकारुन तक्रारदारास मशीन पूरवावी अथवा तक्रारदाराकडुन अग्रीम म्हणुन घेतलेली रक्कम रुपये 1,75,000/-,रक्कम घेतल्याचे दिनांक 5.10.2020 पासुन द.सा.द.शे 9टक्के व्याजासह रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो येणारी रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीबाबत रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचे खर्चाबाबत रुपये 10,000/- मंजूर करणे न्यायोचित आहे असे आयोगाचे मत आहे.
सबब अंतिम आदेश खालीलप्रमाणे. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- तक्रारदार यांना वि.प. यांनी दिलेल्या कोटेशन प्रमाणे रुपये 4,13,000/- रक्कमेपैकी रुपये 1,75,000/- इतकी रक्कम स्विकारल्यामूळे उर्वरित रक्कम रुपये 2,38,000/- एवढी उर्वरित रक्कम स्विकारुन तक्रारदारास मशीन पूरवावी अथवा तक्रारदाराकडुन मशीनचे विक्रीपोटी अग्रीम म्हणुन स्विकारलेली रक्कम रुपये 1,75,000/-, रक्कम घेतल्याचे दिनांक 5.10.2020 पासुन द.सा.द.शे 9टक्के व्याजासह रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो येणारी रक्कम तक्रारदार यांना परत करावी.
- तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीबाबत रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचे खर्चाबाबत रुपये 10,000/-अदा करावे.
- विरुध्द पक्ष यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेश पारित दिनांकापासून 45 दिवसाचे आत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.
|