तक्रार दाखल दिनांक – 08/05/2008 निकालपञ दिनांक – 20/03/2010 कालावधी - 01 वर्ष 10महिने 12 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर तक्रार क्र. 249/2008 कृष्णा ग्रिन लॅड पार्क को-ऑ.हॉ.सो. ए बिल्डींग नं. 6 A, कसारबडवली, जी.बी.रोड, ठाणे(पश्चिम) - 400 601. तक्रार क्र. 250/2008 शेख अब्दुल करीम कृष्णा ग्रिन लॅड पार्क को-ऑ.हॉ.सो. ए, फ्लॅट नं.303, बिल्डींग नं. 6 A, कसारबडवली, जी.बी.रोड, ठाणे(पश्चिम) - 400 601. तक्रार क्र. 247/2008 बि.एन.शेट्टी कृष्णा ग्रिन लॅड पार्क को-ऑ.हॉ.सो. ए, फ्लॅट नं.203, 204,बिल्डींग नं. 6A, कसारबडवली, जी.बी.रोड, ठाणे(पश्चिम) - 400 601. .. तक्रारदार विरूध्द 1.मे.अबरोल लॅड डेव्हलपर्स 2.श्री.संजीव अबरोल सोल प्रोपराईटर ऑफ मे.अबरोल लॅड डेव्हलपर्स कृष्णा वास्तु 1, रामचंद्र लेन, एक्टनसन रोड, मुंबई टाईप थियेटर जवळ , क्वीन मारी हाय स्कुलच्या बाजुला, लिंक रोड, मलाड(पश्चिम), मुंबई 400 064. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल करीम शेख वि.प तर्फे वकिल संगीता चव्हाण एकत्रीत आदेश (पारित दिः 20/03/2010) मा. सदस्या सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार नं.249/2008, 250/2008 व 247/2008 अनुक्रमे कृष्णा ग्रीन लॅड पार्क को-ऑप.हाऊ.सो, श्री.शेख करीम व श्री.बी.एन.शेट्टी यांनी मे. अबरोल लॅड डेव्हलपर्स व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे.
.. 2 .. 2. सदर तक्रारदार सोसायटी कासर वडावली ठाणे येथे आहे. विरुध्द पक्षकार हे पेशाने बिल्डर व डेव्हलपर आहेत. तक्रार क्र.249/2008 मधील तक्रारकर्ता सोसायटीने विरुध्द पक्षकार यांचे कडे conveyance, O.C, CC, प्रॉपर्टी टॅक्स, भरणे, पाण्याचे चार्जेस, देणे इलेक्ट्रीकसिटी मिटर नावावर बदलुन देणे तसेच पाणी सोसायटी समोर तुंबते त्याचे निर्मुलन, सर्व इमारतीची गळती, कंपाऊंड वॉल, इमारतीच्या बाहेरुन पडलेले तढे व भेगा यांची दुरुस्ती करुन मागितली आहे. सदर सोसायटीचा ताबा विरुध्द पक्ष्कार यांनी दि.16/02/2007 रोजी दिला होता. सोसायटीतील सर्व सदनिका विकल्या गेलेल्या आहेत. तरीही विरुध्द पक्षकार काही सदनिका विकलेल्या नाहीत असे सांगतात. तक्रारकर्ता सोसायटीला अकाऊंट ठेवण्यास विरुध्द पक्षकार कडुन वरील सर्व कागदपत्राची पुर्तता होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याबद्दल वेळोवेळी स्मरणपत्रे देऊनही विरुध्द पक्षकार त्याबाबत सेवा देण्यास दिरंगाई करीत आहेत. म्हणुन तक्रारकर्ता यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी फोटोग्राफ दाखल केलेले आहेत. तक्रारकर्ता यांच्या प्रतिउत्तरात म्हटले आहे कि विरुध्द पक्षकार यांनी टि.एम.सी पाण्याचे बील वेळेवर भरले नाही त्यामुळे पाणी टि.एम.सी ने कट केले व रु.2,02,240/- रकमेचे वील पाठवले आहे.
3. तक्रार क्र.250/2008 मधील तक्रारकर्ता हे सदर सोसायटीत सदनिका नं.303 मध्ये रहात आहेत. त्यांना सदर सदनिकेचा ताबा दि.23/05/2005 रोजी विरुध्द पक्षकारां तर्फे मिळाला. तक्रारकर्ता यांच्या रहात्या सदनिकेत बाथरुम, बेडरुम, स्वयंपाकघर व हॉल मध्ये पावसाळयामुळे पाण्याची गळती होत असते. व त्यामुळे पुस्तके, कपाट फर्निचर व इतर वस्तु खराब होऊन नाशवंत झाल्या. तक्रारकर्ता यांनी सदर गळतीच्या दुरूस्तीबाबत विरुध्द पक्षकार यांना स्मरणपत्रे पाठवुन वेळोवेळी कळवले आहे. परंतु विरुध्द पक्षकार यांनी त्याची दखल न घेता दुर्लक्ष केले. इलेक्ट्रीक मीटर तक्रारकर्ता यांचे नावे अद्यापी दिलेले नाही म्हणुन या सर्व गोष्टींची पुर्तता करुन घेण्यासाठी सदर तक्रार व फोटोग्राफ दाखल केलेले आहेत.
4. तक्रार क्र.247/2008 यामध्ये तक्रारकर्ता यांची सदर सोसायटीमध्ये सदनिका नं.203 व 204 आहेत. त्यांना या सदनिकांचा ताबा दि.25/05/2005 रोजी विरुध्द पक्षकार तर्फे मिळाला होता. तदनंतर येणा-या पावसाळयात पाण्याची गळती सुरू झाली व बेडरुममध्ये, खिडक्यांवर, टॉयलेट, हॉल मधील भींती व सिलींगमधुन पाण्याची गळती सतत सुरू राहील्याने इमारतीला कमकुवतपणा येऊन भेगा व तढे निर्माण झाले आहेत. सदर गळतीच्या दुरूस्तीबद्दल वेळोवेळी विरुध्द पक्षकार यांना पत्रादद्वारे कळविण्यात येऊन सुध्दा विरुध्द पक्षकार यांनी दखल घेतली नाही व दुरूस्ती केली नाही तसेच तक्रारकर्ता यांच्या नावावर इलेक्ट्रीक मीटर दिलेले नाही या सर्व गोष्टींची व कागदपत्राची पुर्तता करण्याबाबत तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांचेकडे मागणी केली आहे.
.. 3 .. 5. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत वरील तिन्ही तक्रारीमध्ये दि.31/07/2008 रोजी दाखल केली आहे. यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारकर्ता सोसायटीला ताबा देतानाच अकाऊंट OC, CC बिल्डींग प्लॅन कॉपी दिलेली होती व त्यांनी त्यांचे रेकॉर्ड बघावे तसेच ते विरुध्द पक्षकार यांच्या ऑफीसमधुन सदर कागदपत्रे येऊन घेऊ शकतात असेही म्हटले आहे सर्व प्लॉटचे बांधकाम झाल्यानंतरच कन्व्हेयन्स करुन देण्यास विरुध्द पक्षकार तयार आहेत. तसेच विरुध्द पक्षकार यांच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी त्यांनी इमारतीची दुरुस्ती तक्रारकर्ता यांनी कळवल्यावर केलेली आहे.
6. तिन्ही तक्रारीमधील उभयपक्षकारांची शपथपत्रे, कागदपत्रे पुरावा, लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद मंचाने पडताळुन पाहीले व मंचापुढे पुढील प्रश्न उपस्थित होतो. प्र.विरुध्द पक्षकार यांच्या तिन्ही तक्रारदाराच्या सेवेत निष्काळजीपणा व त्रृटी आढळतात का? वरील प्रश्नांचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा विरुध्द पक्षकार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी OC, CC तक्रारकर्ता सोसायटीस दिलेले आहे परंतु तसा ठोस पुरावा मंचापुढे त्यांनी दाखल केलेला नाही. विरुध्द पक्षकार यांनी सोसायटीच्या नावे कन्व्हेयन्स करुन देणे, OC, CC देणे, प्रॉपर्टी टॅक्स भरणे, इलेक्ट्रीक मीटर स्वतःच्या नावचे बदलुन देणे. पाण्याचे कनेक्शन व चार्जेस भरणे ही सर्व जबाबदारी विरुध्द पक्षकार यांचीच आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन सेवेत त्रृटी दाखवल्या गेल्याने पर्यायाने सोसायटीच्या इमारतीची गळती थांबवणे, दुरूस्ती करुन देणे, पाणी सोसायटीच्या आवारात साठु देऊ नये ही जबाबदारी कायदेशीररित्या विरुध्द पक्षकार यांचीच राहील. त्यामुळे तक्रार क्र.249/2008 अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
7. तक्रार क्र.250/2008 मधील तक्रारकर्ता यांच्या सदनिका नं.303 चा ताबा OC व CC न देता दि.23/05/2005 रोजी दिला गेला असे त्यामुळे MOFA कायद्याच्या विरोधात ही कृती केली गेली असे मानण्यात येत असुन सदर सदनिकेमध्ये होणारी पाण्याची गळतीची दुरूस्ती करुन देणे ही विरुध्द पक्षकार यांची कायदेशीर जबाबदारी आहे तसेच त्यांच्या नावे इलेक्ट्रीक मीटर देण्याची जबाबदारीही विरुध्द पक्षकार यांचीच आहे व याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत त्रृटी आढळतात.
8. तक्रार क्र.247/2008 या तक्रारीतील तक्रारकर्ता त्यांच्या सदर सोसायटीतील सदनिका नं.203 व 204 चा ताबा विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना OC, CC देण्याआधीच दि.25/05/2005 रोजी दिला अद्यापी रितसर मागणी .. 4 .. करुनही सदर कागदपत्रे विरुध्द पक्षाकार यांनी तक्रारकत्याला दिलेले नाही. सदनिकेच्या भींतींना तढे जाऊन आर.सी.सी., प्लास्टरींग खराब होऊन त्यांतून पाण्याची गळती सुरूच राहीली आहे. तसेच सदर गळतीची दुरूस्ती करणे व इलेक्ट्रीक मिटर तक्रारकर्ताच्या नावे देणे ह्या विरुध्द पक्षकार यांच्या कायदेशीर जबाबदारीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. म्हणुन हे मंच पुढील अंतीम आदेश देत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 249/2008, 250/2008 व 247/2008 अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च प्रत्येकी रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) विरुध्द प’क्षकार यांनी तक्रारदारांना द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.खालील आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 3 महिन्याच्या आत करावे. a. तक्रार क्र. 249/2008 मधील तक्रारकर्ता सोसायटीस विरुध्द पक्षकार यांनी OC, CC व कन्व्हेयन्स करुन द्यावे. इमारतीला भेगा जाऊन प्लास्टर व आर.सी.सी खराब झाले व पाण्याच्या गळतीमुळे इमारतीस धोका निर्माण झालेला आहे. तरी या इमारतीची निष्णात सिव्हील इंजिनियर कडुन व आर्किटेक्ट रिपोर्ट काढुन त्याप्रमाणे दुरुस्ती करावी, इलेक्ट्रीक मीटर तक्रारकर्ताच्या नावे ट्रान्सफर करुन द्यावे, प्रॉपर्टी टॅक्स भरावा, आतापर्यंतचे पाण्याचे चार्जेस भरुन कागदपत्रे तक्रारदार सोसायटीस द्यावेत. किंवा उभयपक्षकाराची आपसात संमती असल्यास तक्रारकर्ता यांनी दुरूस्ती करुन त्याचा खर्च विरुध्द पक्षकार यांना देता येईल. b.तक्रार क्र. 250/2008 व 247/2008 मधील तक्रारकर्ता यांना विरूध्द पक्षकार यांनी त्यांच्या अनुक्रमे सदनिकांची आर्कीटेक्ट रिपोर्ट प्रमाणे निष्णात गवंडी नेमणुक करुन दुरुस्ती करुन गळती थांबवावी इलेक्ट्रीक मीटर तत्सम तक्रारदारांच्या नावे द्यावे, पाण्याचे कनेक्शन द्यावे. 3.विरुध्द पक्षकार यांनी वरील तक्रारीमधी सर्व तक्रारदारास प्रत्येक रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी द्यावेत. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 20/03/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट ) (सौ.भावना पिसाळ ) सदस्य सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|