मुद्दे निष्कर्ष १. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदारास वाहन दुरुस्ती पावतीमध्ये चुकीची दिनांक नमुद करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? होय २. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदारास वाहन दुरुस्ती पावतीमध्ये विमा कंपनीचे नांवाची चुकीची नोंद करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? होय ३. गैरअर्जदार क्र. १ व २ अर्जदारास नुकसान भरपाई रक्कम देण्यास पात्र आहेत काय ? होय ४. आदेश ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. १ ते ३ बाबत : ५. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदाराचे वाहन दुरुस्तीसाठी आल्यानंतर दिनांक १४.०५.२०१५ रोजी दुरुस्त करुन रक्कम रु. १,५३,१८६/- अर्जदाराकडुन स्विकारले. परंतु सदर वाहन दिनांक १६.०५.२०१५ रोजी दुरुस्तीसाठी गैरअर्जदार क्र. १ यांचेकडे आणन्यात आले. ही बाब युनायटेड इंडीया इंसुरन्स कंपनीने दिनांक २१.०५.२०१५ रोजी गैरअर्जदार क्र. १ यांनी कळविले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गडचिरोली यांनी दिनांक २१.०६.२०१६ रोजी ग्राहक तक्रार क्र. २/२०१६ मध्ये पारीत आदेशाचे अवलोकन केले असता मंचाने केवळ वर नमुद त्रृटीमुळे तक्रार अमान्य केली आहे. अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ व २ यांना दिनांक ३०.०६.२०१५ रोजी पत्र पत्र देवुन जॉब कार्डवरील दिनांक १४.०५.२०१५ ऐवजी १६.०५.२०१५ करण्यात यावी व बजाज आलायंझ ऐवजी युनायटेड इंडीया इंसुरन्स कंपनी असे नांव नमुद करुन कागदपत्रे द्यावी व सदर सदोष सेवा दिल्याने नुकसान भरपाई रक्कम रु. ३,७९,३७६/- अर्जदारास डिमांड ड्राफ्ट व्दारेतात्काळ अदा करण्यात यावी अशी विनंती केली. सदर पत्र गैरअर्जदार क्र. १ व २ यांना प्राप्त होवुन देखील गैरअर्जदारांनी कोणतेही न्यायोचित उपाययोजना न केल्याने गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदारास वाहन दुरुस्ती पावतीमध्ये चुकीची दिनांक नमुद करुन तसेच अर्जदारास वाहन दुरुस्ती पावतीमध्ये विमा कंपनीचे नांवाची चुकीची नोंद करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब अर्जदार यांनी सिध्द केली आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदाराचा न्यायोचित विमा दावा गैरअर्जदार क्र. १ व २ यांच्या चुकीमुळे विहीत मुदतीत विमा कंपनीकडे सादर करुन देखील कागदोपत्री चुकीमुळे मान्य होवु शकला नसल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होत असल्याने अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब सिध्द होते परीणामी गैरअर्जदार क्र. १ व २ वैयक्तीकव संयुक्तीकपणे अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे असा निष्कर्ष निघतो. सबब मुद्दा क्रं. १ ते ३ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. ४ बाबत : ६. मुद्दा क्रं. १ ते ३ चे वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश १. ग्राहक तक्रार क्र. ९२/२०१६ अंशत: मान्य करण्यात येते. २. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे अर्जदारास वाहन दुरुस्ती पावतीमध्ये चुकीची दिनांक नमुद करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. ३. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे वाहन दुरुस्ती पावतीमध्ये विमा कंपनीचे नांवाची चुकीची नोंद करुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. ४. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे अर्जदारास वाहन दुरुस्ती खर्चापोटी व टोइंग चार्जेस असे एकत्रित रक्कम रु. १,६०,६८६/- दिनांक २०.११.२०१७ पासुन अदा करेपर्यंत १० % व्याजासह अदा करावे. ५. अर्जदार यांना औषोधोपचारसाठी चंद्रपुर व नागपुर येथे जाणेसाठी, अर्जदारांनी त्याबाबत कागदोपत्री पुरावा दाखल न केल्याने सदर विनंती अमान्य करण्यात येते. ६. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे अर्जदारास गाडी दुरुस्तीसाठी आरमोरी ते चंद्रपुर प्रवासासाठी झालेला खर्च, शारिरीक,मानसिक त्रास व तक्रार खर्चाची रक्कम रु. १०,०००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवसात अदा करावे. ७. या आदेश प्राप्ती दिनांकापासून गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी सर्व प्रकारचे वाहन दुरुस्ती पावतीमध्ये अचुक दिनांक नमुद करुन तसेच नमूद केल्यानंतरच वाहन खरेदीदाराच्या ताब्यात देण्याचे तसेच विमा कंपनीचे नांवाची अचुक नोंद करुन अर्जदारास दिलेल्या अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंबाची पुनरावृत्ती न करण्याचे निर्देश ग्राहक संरक्षण अधिनियम कलम १४ (फ) अन्वये गैरअर्जदार क्र. १ व २ यांना देण्यात येतात. ८. या आदेश प्राप्ती दिनांकापासून गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी सर्व प्रकारचे वाहनाची मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम ४२ नुसार विहीत मुदतीत नोंदणी झाल्यानंतरच वाहन, वाहन मालकाच्या स्वाधीन करण्यात यावे. ९. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. श्रीमत श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री. उमेश वि. जावळीकर (सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष) |