अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपीडीएफ/242/08
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 07/03/2006
तक्रार निकाल दिनांक : 21/11/2011
श्री. भिमराज पंढरीनाथ आव्हाड, ..)
रा. सर्व्हे नं. 5/1, प्लॉट नं.35, ..)
दत्तनगर बसस्टॉजवळ, दत्तनगर, ..)
दिघी, पुणे - 5. ..).. तक्रारदार
विरुध्द
1. मे. ए.एस.के. एंटरप्रायजेस मॅन्यूफॅक्चरर्स, ..)
ऑफ कॉंक्रीट अॅडीटीव्हीज, ..)
691/अ-2, पुणे – सातारा रोड, ..)
डिमेलो पेट्रोलपंपाचे पाठीमागे, ..)
पुणे – 37. ..)
..)
2. मे. योगीराज प्लाय पेन्टस अॅण्ड हार्डवेअर, ..)
कृष्ण – रुक्मिणी बिल्डींग, आळंदी रोड, ..)
भोसरी, पुणे – 39. ..)... जाबदार
*******************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 2006 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/70/2006 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/242/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान तडजोड झालेली असून या तडजोडीचा मसुदा त्यांनी निशाणी 15 अन्वये मंचापुढे दाखल केला आहे. जाबदारांनी दिलेला चेक न वटल्यास त्यांचेविरुध्द अंमलबजावणी अर्ज दाखल करण्याची मुभा ठेवून सदरहू तक्रार अर्ज निकाली करण्यात येत आहेत.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक – 21/11/2011