जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/284 प्रकरण दाखल तारीख - 24/11/2010 प्रकरण निकाल तारीख – 01/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या हबीबा बेगम अन्सारी भ्र.मुस्ताक हुसेन अन्सारी, वय 75 वर्षे धंदा घरकाम, अर्जदार रा. महमदी मस्जीद जवळ, किल्ला रोड, नांदेड. विरुध्द मे.व्यकंटेश ज्वेलर्स, सराफा मस्जीद समोर, गैरअर्जदार. धुत बिल्डींगचे बाजूस, सराफा चौरस्ता, नांदेड तर्फे मालक शरद सांभ अमिलकंठवार. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदारा तर्फे - अड. अ.व्ही.चौधरी. निकालपत्र (मार्फत - मा.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) 1. फिर्यादी हबीब बेगम अन्सारी यांनी गैरअर्जदार मे.व्यकंटेश ज्वेलर्स यांच्या सेवेतील त्रुटीबद्यल ही फिर्याद उशिराने दाखल केली आहे. फिर्यादीची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी इ.स.2005 साली त्यांची एक सोन्याची अंगठी तुटल्यमुळे त्यांनी ती अंगठी गैरअर्जदार यांचेकडे नवीन करुन द्या म्हणुन त्यांना अंगठी दिली होती. त्यांची अशीही तक्रार आहे की, सदरील तुटलेली अंगठी दिल्यानंतर दोन वर्षाच्या काळामध्ये गैरअर्जदार यांनी उद्या या परवा या असे म्हणुन शेवटी अंगठी दिली नाही त्यानंतर अर्जदाराने पोलिस स्टेशन ईतवारा येथे अर्ज दिला होता व त्यानंतर सुमारे दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अनेक अर्ज पोलिस स्टेशनला दिले त्यानंतर पोलिस स्टेशनच्या अधिका-याने फिर्यादीला नोटीस दिली व फिर्यादीस ग्राहक मंचात जाण्याचा सल्ला दिला? म्हणून ही फिर्याद दाखल करण्यात येत आहे. खर्चाबद्यल त्यांनी रु.12,000/-ची मागणी केली आहे व गैरअर्जदाराकडुन अंगठी मिळावी अशीही मागणी केली आहे. सदरील फिर्याद ही सर्व प्रथम दि.24/11/2010 रोजी मंचात दाखल केली आहे. सुरुवातीला फिर्यादीने मे. व्यंकटेश ज्वेलर्स यांच्या मालकाचे नांव म्हणुन “दिलीप सावकार व त्यांचा मामा” असे लिहीले होते त्यानंतर तक्रार दुरुस्तीचा अर्ज देऊन त्यांनी मालकाचे नांव “शरद सांभ अमीलकंठवार” अशी दुरुस्ती केली. 2. गैरअर्जदार शरद सांभ हे वकीला मार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दि.17/01/2011 रोजी दिले, त्यांनी अर्जदाराचे सर्व कथन नाकारले आहे. अर्जदाराने त्यांचेकडे 2005 अथवा कधीही सोन्याची अंगठी दिली नव्हती त्यामुळे अश्वासन किंवा हमी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने पोलिस स्टेशनला त्यांच्या विरुध्द खोटया तक्रारी दिल्या परंतु त्या सर्व तक्रारी पोलिसानी निकाली काढल्या आहेत, कारण तसा कोणताही व्यवहारच अर्जदार व गैरअर्जदारामध्ये झालेला नव्हता. गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्यांनी 2005 साली सदरील तुटलेली अंगठी गैरअर्जदाराकडे दिली त्यानंतर ते अनेक वर्ष गप्प बसले याचाच अर्थ ही फिर्याद मुदतीच्या बाहेर आहे. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहकच होऊ शकत नाही त्यामुळे या ग्राहक मंचासमोर ही केस चालू शकत नाही. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी अंगठी दिलीप पेन्शलवार यांना दिली होती परंतु अर्जदाराने सदरील दिलीप पेन्शलवार यांना या दाव्यात पक्षकार का केले नाही? त्याबद्यल काहीही खुलासा नाही, इ.स.2005 ते 2010 पर्यंत फिर्यादी गप्प का बसले? व त्यांनी मुदतीत तक्रार दाखल का केली नाही? त्याबद्यल काहीही खुलासा केला नाही किंवा विलंब माफीचा अर्ज नाही म्हणुन सदरील तक्रार खोटी असल्यामुळे व गैरअर्जदाराकडुन पैसे उकळण्यासाठी दाखल केलेली असल्यामुळे ती खर्चासह व दंडनिय खर्च रु.10,000/-सह खारीज करावी अशी विनंती केली आहे. 3. दोन्ही पक्षकारांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ शपथपत्र दिलेले आहे. अर्जदाराने सदरील पोलिसांनी त्यांना दिलेली नोटीस दि.16/11/2010 व दि.11/02/2010 ची दाखल केली आहे तसेच त्यांनी पोलिस स्टेशनला दिलेली फिर्यादीची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. सदरील तथाकथीत पावतीची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. फिर्यादचे व्हिजिटींग कार्डची झेरॉक्स प्रत देखील दाखल केलेली आहे. 4. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व म्हणणे लक्षात घेता जे मुद्ये उपस्थित होतात ते मुद्ये व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे काय? नाही. 2. अर्जदार हे गैरअर्जदाार यांचे ग्राहक होऊ शकतात काय? नाही. 3. गैरअर्जदार अर्जदारास सदरील सोन्याची अंगठी किंवा काह नुकसान भरपाई देण्यास बाध्य आहेत काय? नाही. 4. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 ते 3 5. हे सर्व मुद्ये एकमेकास पुरक असल्यामुळे एकत्रित चर्चेला घेतलेले आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी इ.स.2005 रोजी गैरअर्जदार यांचेकडे तुटलेली अंगठी दुरुस्त करण्यासाठी दिली होती त्यानंतर सर्व प्रथम त्यांनी ही जी फिर्याद दाखल केली आहे ती दि.24/11/2010 रोजी दाखल केली आहे? याचाच अर्थ सदरील फिर्याद ही पाच वर्षानंतर दाखल केलेली आहे, जे की, सकृतदर्शनी मुदतीच्या बाहेर आहे. वास्तविक पहाता अर्जदाराने दोन वर्षाच्या आतच फिर्याद दाखल करावयास पाहीजे होती, पण तसे न करता ही फिर्याद पाच वर्षानंतर दाखल केली व त्या फिर्यादीबरोबर विलंब माफीचा अर्ज देखील दिलेला नाही? त्यामुळे फिर्यादीस कलम 24 A ग्राहक संरक्षण कायदाचा मुदतीचा बाध येत असल्यामुळे ही फिर्याद चालुच शकत नाही. 6. अर्जदाराने जी पावतीची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे त्यावरुन असे दिसते की, ती पावती दि.01/01/2005 ची आहे या झेरॉक्स प्रतला कोणाचीही ‘सत्यप्रत’ म्हणुन सही नाही?. अर्जदाराने मुळ पावती का दाखल केली नाही? त्याबद्यल खुलासा नाही, या पावतीवर गैरअर्जदाराच्या दुकानाचे नांवही छापलेले नाही? सदरील पावती पहाता असे दिसून येते की, ती पावती “श्री. डॉ. अन्सारी हबीबा बेगम” या नावाने दिलेली होती? फिर्यादी डॉक्टर असल्याचे त्यांच्या फिर्यादीत कुठेही कथन केलेले नाही? त्यामुळे सदरील झेरॉक्स प्रत बघता ही पावती गैरअर्जदाराच्या दुकानचीच किंवा गैरअर्जदारानेच ती दिली याबद्यल ठोस असा कुठलाही पुरावा नाही. अर्जदाराचे म्हणणे असे आहे की, सदरील पावती दिलीप सावकार यांनी दिली तर मग हे जर खरे असेल तर सदरील दिलीप सावकार यांना फिर्यादीमध्ये शेरीक का केले नाही? याबद्यल काही खुलासा नाही. एकंदरीत पहाता अर्जदार हे गैरअर्जदाराचे रितसर ग्राहक आहे हे दाखविण्यासाठी सबळ कागदोपत्री कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. 7. अर्जदाराने पोलिसाकडे जी कागदपत्र दाखल केलेले होते त्यावरुन असे दिसते की, पोलिसांनी यामध्ये चौकशी केली व त्यात कांही निष्पन्न झालेले नाही पोलिसांनी शेवटी दिलेली नोटीसवरुन असे दिसते की, अर्जदाराला ही बाब दिवाणी स्वरुपाची असल्यामुळे परस्पर कोर्टात दाद मागण्यास सांगीतले आहे पण या नोटीसमध्ये ग्राहक मंचात जाऊन दाद मागावी असा उल्लेख केलेला नाही, असे असतांना फिर्यादीने आपल्या फिर्यादीमध्ये पोलिसांनी त्यांना ग्राहक मंचात जाण्याचा सल्ला दिला हे खोटे कथन केल्याचे दिसते? 7. 8. एकंदरीत कागदपत्र पहाता फिर्यादीने गैरअर्जदार यांचेकडे जूनी अंगठी दिल्याचे किंवा गैरअर्जदार यांनी त्यांना पावती दिल्याचे सबळ पुरावा दाखल केलेले नाही. त्यामुळे एक तर अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक होऊ शकत नाही व जरी युक्तीवाद म्हणुन ग्राहय धरले तरीही सदरील फिर्याद ही मुदतीच्या बाहेर असल्यामुळे ती दाखलच करुन घेण्या जोगी नाही. कारण सदरील पावती दि.01/01/2005 रोजी मिळाल्या पासून अर्जदार दि.26/07/2009 पर्यंत गप्पच बसले व त्यानंतर सर्व प्रथम त्यांनी दि.26/07/2009 रोजीच पोलिसाकडे फिर्याद दिली आहे, ते ही चार वर्षानंतर? म्हणुन कलम 24 अ प्रमाणे ही फिर्याद दाखलच होऊ शकत नाही. वरील कारणास्तव मुद्या क्र. 1 ते 3 चे उत्तर नाकारात्तक देण्यात येते. 9. मुद्या क्र. 4 गैरअर्जदाराचे असे कथन आहे की, फिर्यादीने ही खोटी केस पैसे उकळण्यासाठी दिलेली आहे म्हणुन ती खर्चासह व दंडनिय खर्च रु.10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी. फिर्याद व कागदपत्र पहाता फिर्यादीचे वय 75 वर्षे आहे व त्यांना अनेक रोग आहेत. असे दिसते की, फिर्यादीने ही फिर्याद त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरुन दाखल केली असावी, त्यामुळे फिर्यादीला या वयामध्ये दंड लावणे उचित होणार नाही असे या मंचाचे मत झाले आहे. त्यामुळे फिर्यादीला दंड न लावता ही फिर्याद खारीज करणे उचित होईल, असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. फिर्यादीची फिर्याद खारीज करण्यात येते. 2. पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळवावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार. लघुलेखक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/284 प्रकरण दाखल तारीख - 24/11/2010 प्रकरण निकाल तारीख – 01/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या हबीबा बेगम अन्सारी भ्र.मुस्ताक हुसेन अन्सारी, वय 75 वर्षे धंदा घरकाम, अर्जदार रा. महमदी मस्जीद जवळ, किल्ला रोड, नांदेड. विरुध्द मे.व्यकंटेश ज्वेलर्स, सराफा मस्जीद समोर, गैरअर्जदार. धुत बिल्डींगचे बाजूस, सराफा चौरस्ता, नांदेड तर्फे मालक शरद सांभ अमिलकंठवार. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदारा तर्फे - अड. अ.व्ही.चौधरी. निकालपत्र (मार्फत - मा.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) 1. फिर्यादी हबीब बेगम अन्सारी यांनी गैरअर्जदार मे.व्यकंटेश ज्वेलर्स यांच्या सेवेतील त्रुटीबद्यल ही फिर्याद उशिराने दाखल केली आहे. फिर्यादीची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी इ.स.2005 साली त्यांची एक सोन्याची अंगठी तुटल्यमुळे त्यांनी ती अंगठी गैरअर्जदार यांचेकडे नवीन करुन द्या म्हणुन त्यांना अंगठी दिली होती. त्यांची अशीही तक्रार आहे की, सदरील तुटलेली अंगठी दिल्यानंतर दोन वर्षाच्या काळामध्ये गैरअर्जदार यांनी उद्या या परवा या असे म्हणुन शेवटी अंगठी दिली नाही त्यानंतर अर्जदाराने पोलिस स्टेशन ईतवारा येथे अर्ज दिला होता व त्यानंतर सुमारे दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अनेक अर्ज पोलिस स्टेशनला दिले त्यानंतर पोलिस स्टेशनच्या अधिका-याने फिर्यादीला नोटीस दिली व फिर्यादीस ग्राहक मंचात जाण्याचा सल्ला दिला? म्हणून ही फिर्याद दाखल करण्यात येत आहे. खर्चाबद्यल त्यांनी रु.12,000/-ची मागणी केली आहे व गैरअर्जदाराकडुन अंगठी मिळावी अशीही मागणी केली आहे. सदरील फिर्याद ही सर्व प्रथम दि.24/11/2010 रोजी मंचात दाखल केली आहे. सुरुवातीला फिर्यादीने मे. व्यंकटेश ज्वेलर्स यांच्या मालकाचे नांव म्हणुन “दिलीप सावकार व त्यांचा मामा” असे लिहीले होते त्यानंतर तक्रार दुरुस्तीचा अर्ज देऊन त्यांनी मालकाचे नांव “शरद सांभ अमीलकंठवार” अशी दुरुस्ती केली. 2. गैरअर्जदार शरद सांभ हे वकीला मार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दि.17/01/2011 रोजी दिले, त्यांनी अर्जदाराचे सर्व कथन नाकारले आहे. अर्जदाराने त्यांचेकडे 2005 अथवा कधीही सोन्याची अंगठी दिली नव्हती त्यामुळे अश्वासन किंवा हमी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने पोलिस स्टेशनला त्यांच्या विरुध्द खोटया तक्रारी दिल्या परंतु त्या सर्व तक्रारी पोलिसानी निकाली काढल्या आहेत, कारण तसा कोणताही व्यवहारच अर्जदार व गैरअर्जदारामध्ये झालेला नव्हता. गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्यांनी 2005 साली सदरील तुटलेली अंगठी गैरअर्जदाराकडे दिली त्यानंतर ते अनेक वर्ष गप्प बसले याचाच अर्थ ही फिर्याद मुदतीच्या बाहेर आहे. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहकच होऊ शकत नाही त्यामुळे या ग्राहक मंचासमोर ही केस चालू शकत नाही. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी अंगठी दिलीप पेन्शलवार यांना दिली होती परंतु अर्जदाराने सदरील दिलीप पेन्शलवार यांना या दाव्यात पक्षकार का केले नाही? त्याबद्यल काहीही खुलासा नाही, इ.स.2005 ते 2010 पर्यंत फिर्यादी गप्प का बसले? व त्यांनी मुदतीत तक्रार दाखल का केली नाही? त्याबद्यल काहीही खुलासा केला नाही किंवा विलंब माफीचा अर्ज नाही म्हणुन सदरील तक्रार खोटी असल्यामुळे व गैरअर्जदाराकडुन पैसे उकळण्यासाठी दाखल केलेली असल्यामुळे ती खर्चासह व दंडनिय खर्च रु.10,000/-सह खारीज करावी अशी विनंती केली आहे. 3. दोन्ही पक्षकारांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ शपथपत्र दिलेले आहे. अर्जदाराने सदरील पोलिसांनी त्यांना दिलेली नोटीस दि.16/11/2010 व दि.11/02/2010 ची दाखल केली आहे तसेच त्यांनी पोलिस स्टेशनला दिलेली फिर्यादीची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. सदरील तथाकथीत पावतीची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. फिर्यादचे व्हिजिटींग कार्डची झेरॉक्स प्रत देखील दाखल केलेली आहे. 4. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व म्हणणे लक्षात घेता जे मुद्ये उपस्थित होतात ते मुद्ये व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे काय? नाही. 2. अर्जदार हे गैरअर्जदाार यांचे ग्राहक होऊ शकतात काय? नाही. 3. गैरअर्जदार अर्जदारास सदरील सोन्याची अंगठी किंवा काही नुकसान भरपाई देण्यास बाध्य आहेत काय? नाही. 4. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 ते 3 5. हे सर्व मुद्ये एकमेकास पुरक असल्यामुळे एकत्रित चर्चेला घेतलेले आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी इ.स.2005 रोजी गैरअर्जदार यांचेकडे तुटलेली अंगठी दुरुस्त करण्यासाठी दिली होती त्यानंतर सर्व प्रथम त्यांनी ही जी फिर्याद दाखल केली आहे ती दि.24/11/2010 रोजी दाखल केली आहे? याचाच अर्थ सदरील फिर्याद ही पाच वर्षानंतर दाखल केलेली आहे, जे की, सकृतदर्शनी मुदतीच्या बाहेर आहे. वास्तविक पहाता अर्जदाराने दोन वर्षाच्या आतच फिर्याद दाखल करावयास पाहीजे होती, पण तसे न करता ही फिर्याद पाच वर्षानंतर दाखल केली व त्या फिर्यादीबरोबर विलंब माफीचा अर्ज देखील दिलेला नाही? त्यामुळे फिर्यादीस कलम 24 A ग्राहक संरक्षण कायदाचा मुदतीचा बाध येत असल्यामुळे ही फिर्याद चालुच शकत नाही. 6. अर्जदाराने जी पावतीची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे त्यावरुन असे दिसते की, ती पावती दि.01/01/2005 ची आहे या झेरॉक्स प्रतला कोणाचीही ‘सत्यप्रत’ म्हणुन सही नाही?. अर्जदाराने मुळ पावती का दाखल केली नाही? त्याबद्यल खुलासा नाही, या पावतीवर गैरअर्जदाराच्या दुकानाचे नांवही छापलेले नाही? सदरील पावती पहाता असे दिसून येते की, ती पावती “श्री. डॉ. अन्सारी हबीबा बेगम” या नावाने दिलेली होती? फिर्यादी डॉक्टर असल्याचे त्यांच्या फिर्यादीत कुठेही कथन केलेले नाही? त्यामुळे सदरील झेरॉक्स प्रत बघता ही पावती गैरअर्जदाराच्या दुकानचीच किंवा गैरअर्जदारानेच ती दिली याबद्यल ठोस असा कुठलाही पुरावा नाही. अर्जदाराचे म्हणणे असे आहे की, सदरील पावती दिलीप सावकार यांनी दिली तर मग हे जर खरे असेल तर सदरील दिलीप सावकार यांना फिर्यादीमध्ये शेरीक का केले नाही? याबद्यल काही खुलासा नाही. एकंदरीत पहाता अर्जदार हे गैरअर्जदाराचे रितसर ग्राहक आहे हे दाखविण्यासाठी सबळ कागदोपत्री कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. 7. अर्जदाराने पोलिसाकडे जी कागदपत्र दाखल केलेले होते त्यावरुन असे दिसते की, पोलिसांनी यामध्ये चौकशी केली व त्यात कांही निष्पन्न झालेले नाही पोलिसांनी शेवटी दिलेली नोटीसवरुन असे दिसते की, अर्जदाराला ही बाब दिवाणी स्वरुपाची असल्यामुळे परस्पर कोर्टात दाद मागण्यास सांगीतले आहे पण या नोटीसमध्ये ग्राहक मंचात जाऊन दाद मागावी असा उल्लेख केलेला नाही, असे असतांना फिर्यादीने आपल्या फिर्यादीमध्ये पोलिसांनी त्यांना ग्राहक मंचात जाण्याचा सल्ला दिला हे खोटे कथन केल्याचे दिसते? 7. 8. एकंदरीत कागदपत्र पहाता फिर्यादीने गैरअर्जदार यांचेकडे जूनी अंगठी दिल्याचे किंवा गैरअर्जदार यांनी त्यांना पावती दिल्याचे सबळ पुरावा दाखल केलेले नाही. त्यामुळे एक तर अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक होऊ शकत नाही व जरी युक्तीवाद म्हणुन ग्राहय धरले तरीही सदरील फिर्याद ही मुदतीच्या बाहेर असल्यामुळे ती दाखलच करुन घेण्या जोगी नाही. कारण सदरील पावती दि.01/01/2005 रोजी मिळाल्या पासून अर्जदार दि.26/07/2009 पर्यंत गप्पच बसले व त्यानंतर सर्व प्रथम त्यांनी दि.26/07/2009 रोजीच पोलिसाकडे फिर्याद दिली आहे, ते ही चार वर्षानंतर? म्हणुन कलम 24 अ प्रमाणे ही फिर्याद दाखलच होऊ शकत नाही. वरील कारणास्तव मुद्या क्र. 1 ते 3 चे उत्तर नाकारात्तक देण्यात येते. 9. मुद्या क्र. 4 गैरअर्जदाराचे असे कथन आहे की, फिर्यादीने ही खोटी केस पैसे उकळण्यासाठी दिलेली आहे म्हणुन ती खर्चासह व दंडनिय खर्च रु.10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी. फिर्याद व कागदपत्र पहाता फिर्यादीचे वय 75 वर्षे आहे व त्यांना अनेक रोग आहेत. असे दिसते की, फिर्यादीने ही फिर्याद त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरुन दाखल केली असावी, त्यामुळे फिर्यादीला या वयामध्ये दंड लावणे उचित होणार नाही असे या मंचाचे मत झाले आहे. त्यामुळे फिर्यादीला दंड न लावता ही फिर्याद खारीज करणे उचित होईल, असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. फिर्यादीची फिर्याद खारीज करण्यात येते. 2. पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळवावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार. लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |