Maharashtra

Additional DCF, Thane

RBT/CC/19/78

MRS. SAYYAD ZEENAT BEGUM W/O SAYYED LADLE HUSSAIN - Complainant(s)

Versus

M/S VIKRAM GROUP - Opp.Party(s)

Adv. H.V.Barge

18 Sep 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. RBT/CC/19/78
 
1. MRS. SAYYAD ZEENAT BEGUM W/O SAYYED LADLE HUSSAIN
FLAT NO 302 3 FLOOR BUG. NO.9, PREMJYOT COMPLEX, NEAR INDIAN OIL NAGAR, GHATKOPAR MANKHURD LINK ROAD, SHIVAJI NAGAR, GOVADI, MUMBAI 400043
...........Complainant(s)
Versus
1. M/S VIKRAM GROUP
EKRAM PALACE, PLOT NO 134, SECTOR NO 10, SANPADA NAVI MUMBAI 400606
2. VIKRAM CO.OP.HOUSING SOCIETY LTD
PLOT NO. 64,SECTOR 50, NERUL, NAVI MUMBAI 400706
Navi Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 18 Sep 2019
Final Order / Judgement

उभयपक्षातर्फे वकील हजर.

निशाणी 1 वर आदेश

सदरची तक्रार मा. राज्‍य आयोगाने अपिल क्रमांक ए/16/508 मध्‍ये तारीख 31/01/2019 रोजी पारीत केलेल्‍या आदेशाप्रमाणे पुन्‍हा फेर चौकशीसाठी आली आहे. जेव्‍हा पहिल्यांदा तक्रारीचा निकाल या मंचाने केला तेव्‍हा, ज्‍या करारांतर्गत तक्रारदाराने सदनिका विकत घेतली तो करार दाखल केला नव्‍हता म्‍हणून तक्रार रद्द झाली होती. सबब सदरचे कागदपत्र दाखल करुन, तसेच सामनेवाले क्रमांक 3 ची सहाकरी गृहनिर्माण संस्‍था स्‍थापन झालेली असल्‍याने त्‍यांना पक्षकार करुन उभयतांना संधी देऊन पुन्‍हा तक्रार निकाली काढण्‍याचा आदेश झालेला आहे. सबब तक्रारदारांनी दुरुस्‍त तक्रारीची प्रत तारीख 30/05/2019 रोजी दाखल केली आहे.

मूळ तक्रारीत व दुरुस्‍त तक्रारीत प्रार्थना खालीलप्रमाणे आहे –

  1. सामनेवाले यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा वापर केला असा जाहिरनामा मिळणेकामी.
  2.   सामनेवाले यांनी  नोंदणीकृत सहाकरी गृहनिर्माण संस्‍था स्‍थापन करुन देण्‍याची व त्‍यानंतर त्‍या सहाकरी गृहनिर्माण संस्‍थेच्‍या लाभात अभिहस्‍तांतरण लेख (मोफा कायद्याचे कलम 9 व 11 प्रमाणे) करुन देण्‍याची,  तसेच सामनेवाले यांनी जास्‍तीची घेतलेली रक्‍कम रुपये 80,000/- ही 18 टक्‍के व्‍याजासह परत देण्‍याचा आदेश करणेकामी, तसेच शारिरीक मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- तक्रारीच्‍या खर्चासह मिळणेकामी, तसेच वादातीत सदनिकेचा नोंदणीकृत  करार करुन देण्‍याची मागणी केली आहे. या सर्व मागण्‍याबाबत तक्रार दुरुस्‍तीची प्रत तारीख 30/03/2019 रोजी दाखल केली तेव्‍हाही केलेली आहे. सबब अमरिश शूक्‍लाच्‍या निवाडयाप्रमाणे या मंचास आर्थिक अधिकार फक्‍त वीस लाखापर्यंतचे आहे. त्‍यापेक्षा जास्‍त रकमेच्‍या बाबतीत मागणी केल्‍यास तक्रार या मंचास चालविण्‍याचे अधिकार राहत नाही, ही वस्‍तुस्थिती आहे.

तसेच तक्रारदाराने वादातीत सदनिकेच्‍या ज्‍या नोंदणीकृत करारावर विश्‍वास ठेवला आहे, त्‍याची तारीख 04/11/2009 आहे आणि मूळ तक्रार तारीख 25/06/2012 रोजी दाखल केली आहे. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍याच्‍या एकटयाच्‍या सदनिकेची किंमत रुपये 22,00,000/- आहे व सामनेवाले यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे एकूण 15 सदनिका सामनेवाले क्रमांक 3 च्‍या इमारतीमध्‍ये आहेत. सबब जेव्‍हा मोफा कायद्याचे कलम 11 प्रमाणे अभिहस्‍तांतरणाचा लेख सहकारी गृहनिर्माण संस्‍था स्‍थापन झाल्‍यानंतर करुन मिळणेची मागणी केली आहे, तेव्‍हा तक्रारदाराने मुल्‍यांकन तक्‍ता दाखल करणे आवश्‍यक होते. परंतु या मुलभूत गोष्‍टींचे पालन तक्रारदार हे विधिज्ञांच्‍या मदतीने भांडत असतांनाही केलेले नाही.

सबब प्रथमदर्शनी वरील बाबींचा विचार केल्‍यानंतर व सहकारी गृहनिर्माण संस्‍थेची स्‍थापना उशिरा झाली म्हणून गृह‍निर्माण संस्‍था स्‍थापन करणेची मागणी तक्रारीत केली हा युक्‍तीवाद नोंदणीकृत कराराच्‍या अनुषंगाने धादांत खोटा ठरतो. वादातीत सदनिकेचा नोंदणीकृत करार तारीख 04/11/2009 रोजी झालेला आहे व तक्रार 20/02/2012 मध्‍ये दाखल झाली आहे. तरीही तक्रारदाराचे वकील वरीलप्रमाणे विधान करतात ही बाब नक्‍कीच सर्वांना आचंबित करणारी आहे. सबब तक्रार चालविण्‍याचे आर्थिक अधिकार या मंचास वरील कारणास्‍तव नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

अशा परिस्थितीत तक्रारदाराच्‍या वकीलांनी त्‍यांच्‍या तक्रारीतील प्रतिज्ञा क्रमांक “एफ”  वर या मंचाचे लक्ष वेधले. सदर प्रार्थनेप्रमाणे त्‍यांनी नोंदणीकृत करार करुन देण्‍याची मूळ तक्रारीत मागणी केली आहे. दुरुस्‍त  तक्रारीत नोंदणीकृत करारात  सहकारी गृहनिर्माण संस्‍थेची नोंदणी दुरुस्‍तीपूर्वी करुन देण्‍याची मागणी केली होती. सोसायटीच्‍या नोंदणीचा फॉर्म दाखल केला आहे. सदर फाँर्मप्रमाणए क्रमांक 3 सोसायटीचा नोंदणी क्रमांक NBOM/CIDCO/HSG/(HO)/1951/JTR/2003-2004 असा आहे. परंतु तक्रारदाराच्‍या लाभात तारीख 04/11/2009 रोजी करुन दिलेल्‍या नोंदणीकृत करारात सदरचा नंबर चूकीचा टंकलेखित केलेला असल्‍याने त्‍याबाबतीत तक्रारदाराला कुठल्‍याही प्रकारची हानी होण्‍याचे कारण नाही. तरीही तक्रारदार अत्‍यंत जागृत आहेत असे मानले, तरी त्‍यांनी सामनेवाले क्रमांक 3 विक्रम सोसायटीच्‍या पदाधिका-यांकडे वरीलप्रमाणे तारीख 04/11/2009 च्‍या सदनिका विक्रीच्‍या नोंदणीकृत करारात सामनेवाले क्रमांक 3 सोसायटीचा नोंदणी क्रमांक चूकीने 1951 चे ऐवजी  1957 टंकलेखि‍त झाल्‍याने, त्‍याबाबतीत शुध्‍दीकरण लेख सब रजिस्‍ट्रार कार्यालयातून दुरुस्‍त करुन घेण्‍याची विनंती केल्‍यास सामनेवाले त्‍या प्रमाणे वर्तन करण्‍यास जबाबदार राहतील. अशा शूल्लक गोष्‍टीसाठी न्‍यायालयाचे दरवाजे ठोठावणे नक्‍कीच चांगले नाही. सदरची दुरुस्‍ती करुन देण्‍याची जबाबदारी सामनेवाले क्रमांक 3 च्या विधिज्ञांनी व विद्यमान चेअरमन जयकृष्‍ण पटले यांनी सोसायटीच्‍या खर्चाने दुरुस्‍त करुन देण्‍याची हमी घेतली. सबब तक्रार या न्‍याय मंचाच्‍या आर्थिक  मंचास अधिकार क्षेत्राबाहेर असल्‍याने रद्द करण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्‍यामुळे तक्रारदारास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी झालेला खर्च वरील कारणास्‍तव सामनेवाले यांचेकडून मागण्‍याचा अधिकार नसल्‍याने खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येतो –

- अंतिम आदेश -

  1. सदरची तक्रार चालविण्‍याचे आर्थिक अधिकार या मंचास नसल्‍याने तक्रार रद्द करण्‍यात आली.
  2. सदर तक्रारीचे कागदपत्र अभिलेख कक्षात पाठविण्‍यात यावेत.
 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.