तक्रार दाखल दिनांक – 12/06/2009 निकालपञ दिनांक – 31/03/2010 कालावधी - 0 वर्ष 09 महिने 12 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर तक्रार क्रमांक – 399/2009 श्री.प्रकाश रागो जाधव रुम नं.1, शंकर नीक चॉल हनुमान मंदीरच्या समोर, शिरवानेगाव, नेरुल, नवी मुंबई. .. तक्रारदार तक्रार क्रमांक – 402/2009 श्री. बिरंद्र कुमार उमाकांत उपाध्याय रुम नं. 97, अक्बर पान भंडार, दिनबंधु नगर, सोल्टपन रोड वडाळा(पुर्व), मुंबई 37. .. तक्रारदार तक्रार क्रमांक – 403/2009 श्री. विजय विष्नु थोरात शिव-शंकर नगर, साल्टपेन रोड, वडाळा(पुर्व), मुंबई 37. .. तक्रारदार तक्रार क्रमांक – 404/2009 श्री. धनंजय रामजी सिंग दिवालेगाव, रुम नं.2, चाळ नं.10, बेलापुर, मुंबई. .. तक्रारदार तक्रार क्रमांक – 405/2009 विजेंद्र कुमार रामहित ठाकुर पाटील चाळ, कोपरखेरने, पोस्ट – घन्सोली, नवी मुंबई. .. तक्रारदार विरूध्द मे. तिरुपती बालाजी कन्सट्रक्शन बिल्डरस आणि डेव्हलपर्स तफे भागिदार श्री. वेन्कटेश तिमय्या कोलमी व श्री. तिमय्या नागप्पा कोलमी पत्ताः गणेश कॉलणी, जुनी जनता सहकारी बँकेच्या मागे, कोल्सेवाडी, कल्याण(पुर्व), जिल्हा - ठाणे. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र.अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य
.. 2 .. उपस्थितीः- त.क तर्फे वकिल पुनम माखिजानी वि.प एकतर्फा आदेश (पारित दिः 31/03/2010) मा. प्र.अध्यक्ष सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रारी क्र.399/2009, 400/2009, 402/2009, 403/2009, 404/2009 व 405/2009 अनुक्रमे श्री. प्रकाश जाधव, उमाशंकर शुक्ला, श्रीयुक्त बिरेंद्र कुमार उपाध्याय, श्रीयुक्त विजय थोरात, श्री. धनंजय सिंग व श्री. विजेंद्रकुमार ठाकुर यांनी मे.तिरुपती बालाजी कंन्ट्रक्शन बिल्डर्स अन्ड डेव्हलपर्स व त्यांचे भागिदार श्री. व्यंकटेश कोलमी व तिमय्या कोलमी यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकाराकडे सदनिका विकत घेण्यासाठी भरलेले रक्कम परत मागितली आहे.
2. विरुध्द पक्षकार हे पेशाने बिल्डर व्यवसायाशी संबंधीत आहेत. सदर तक्रारीमधील तक्रारदारांनी विरुध्द पक्षकारांनी बांधण्यास घेतलेल्या चाळीच्या स्किम मध्ये सदनिका घेण्याचे ठरविले. सदर बांधकामाचा प्लॉट खांदेगोलीवली गाव कल्याण येथे असुन या मध्ये तक्रारदारांनी 230 चौरस फुट जागा अनुक्रमे. तळमजल्या वरील रुम. नं 6, रुम नं. 3, रुम नं. 5, रुम नं. 11, रुम नं.1 घेण्यासाठी तत्सम करारनामा करुन नोंदणीकृत करुन घेतला.
3. तक्रार क्र.399/2009 मधील तक्रारदाराने जागेची किंमत रु.2,10,000/- ठरवुन त्यापैकी रु.40,000/- रक्कम विरुध्द पक्षकाराला दिली व करारनामा दि. 09/02/2008 रोजी नोंदणीकृत केला. तक्रार क्र.402/2009 मधील तक्रारदाराने सदर जागेची किंमत रु.2,10,000/- ठरवुन दि.09/02/2008 रोजी करारनामा करुन त्यापैकी रु.40,000/- रक्कम विरुध्द पक्षकाराला दिली व दि.18/11/2008 रोजी रु.50,000/- विरुध्द पक्षकाराला दिले. तक्रार क्र. 403/2009 मधील तक्रारदाराने सदर जागेची किंमत रु. 2,10,000/- ठरवुन दि. 09/02/2008 रोजी करारनामा नोंदणीकृत करुन त्यापैकी रु.40,000/- विरुध्द पक्षकाराला दिले. तक्रार क्र. 404/2009 मधील तक्रारदाराने सदर जागेची किंमत रु. 2,15,000/- ठरवुन दि. 27/02/2008 रोजी करारनामा नोंदणीकृत केला व त्यापैकी रु.40,000/- विरुध्द पक्षकाराला दिले. तक्रार क्र. 405/2009 मधील तक्रारदाराने सदर जागेची किंमत रु.2,10,000/- ठरवुन तत्सम करारनामा दि.09/02/2008 रोजी नोंदणीकृत करुन त्यापैकी रु. 40,000/- विरुध्द पक्षकारांना दिले.
.. 3 .. 4. सर्व तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षकारांनी लोन मिळवुन देण्याचे कबुल करुनही तशी पुर्तता केली नाही तसेच विरुध्द पक्षकारानी बांधकामही वेळेवर ठरल्याप्रमाणे सुरू करुन पुर्ण केले नाही त्यामुळे सर्व तक्रारदाराने सदनिकेपोटी विरुध्द पक्षकाराकडे भरलेली त्यांची रक्कम परत मागितली आहे.
5. मंचाने नोटिस बजावुनही विरुध्द पक्षकार मंचापुढे हजर राहिले नाहीत व त्याची लेखी कैफीयत त्यांनी दाखल केली नाही म्हणुन मंचाने त्याच्या विरुध्द दि.23/11/2009 रोजी नो डब्ल्यु आदेश पारित केला तदनंतर एकतर्फा चौकशी करुन हे मंच पुढील अंतीम आदेश पारित करीत आहे. अंतीम आदेश
1. तक्रार क्र. 399/2009, 402/2009, 403/2009, 404/2009 व 405/2009ही अंशतः मंजुर करण्यात येत आहेत व या तक्रारीचा खर्च प्रत्येकी रु.500/- (रु. पाचशे फक्त) विरुध्द पक्षकार यांनी प्रत्येक तक्रारदारास द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रार क्र. 399/2009, 403/2009, 404/2009, 405/2009 यामधील तक्रारदारांना सदनिकेच्या खरेदीपोटी प्रत्येकी घेतलेले रु. 40,000/-(रु. चाळीस हजार फक्त) एवढी रक्कम प्रत्येकास परत करावी. तसेच तक्रार क्र.402/2009 यामधील तक्रारदारास रु.90,000/-(रु. नव्वद हजार फक्त) एवढी रक्कम परत करावी व वरील सर्व रक्कम परत करतांना तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे 6% दराने व्याज द्यावे. या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 3 महिन्यांच्या आत करावे. अन्यथा तदनंतर वरील सर्व रक्कमेवर 3% ज्यादा दंडात्मक व्याज संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द्यावे लागेल. 3.विरुध्द पक्षकार यांनी मानसिक त्रास व नुकसान भरपाईपोटी सर्व तक्रारदारास प्रत्येकी रु. 2,000/-(रु.दोन हजार फक्त) द्यावेत. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदतीनंतर मंचाची जबाबदारी नाही.
दिनांक – 25/02/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट ) (सौ. भावना पिसाळ ) सदस्य प्र.अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|