1. तक्रारदाराचे कथन संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणेः-
तो व्यवसयाने वकील असून, टाईमस ऑफ इंडिया दैनिकात दिनांक 2.2.2010 रोजी आलेल्या जाहिरातीनुसार त्यांनी अल्ट्रा सेक्सी डिझाईनार मल्टी मिडीया सिम मोबाईल हा भ्रमण दुरध्वनी संच रु.3,499/- किंमतीस विरुध्द पक्ष यांच्याकडून विकत घेण्याची मागणी नोंदविली. आपल्या क्रेडीट कार्डव्दारे त्यांनी ती रक्क्म विरुध्द पक्षास ऑनलाईन अदा केली. विरुध्द पक्ष यांनी त्यांना दुस-या दिवशी मागणी क्रमांक कळविला व दि.12.2.2010 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडून त्यास वादग्रस्त भ्रमणध्वनी संच प्राप्त झाला. या संचात विकत घेतल्याच्या दिवश्सपासून अनेक दोष त्यांच्या निर्दशनास आले. बाहेरुन येणा-या कॉल सदंर्भात रिंग न वाजने, तसेच पुर्णपणे संचाचे काम बंद पडणे. याबात त्यांनी 17.2.2010 रोजी विरूध्द पक्षाकडे तक्रार नोंदविली त्याची दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने दि.26.2.2010 रोजी परत तक्रार करण्यात आली. दोन दिवसांच्या आत दुरुस्ती करण्यात येईल असे विरुध्द पक्ष यांनी त्यास कळविले मात्र काहीही केले नाही. दि.3.6.2010 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविण्यात आली. दि.14.10.10 रोजी ईमेल पाठविण्यात आला व रकमेचा परतावा त्यांनी विरुध्द पक्ष यास मागितला त्याची कोणतीही दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने प्रार्थनेत नमुद केल्याप्रमाणे भ्रमणध्वणी विकत घेण्याची रक्क्म व न्यायीक खर्च मिळावा असे त्यांचे म्हणणे आहे.
तक्रारीच्या समर्थनार्थ निशाणी 2 अनवये प्रतिज्ञापत्र तसेच निशाणी 3.1 ते 5.1 अन्वये दस्तऐवज दाखल करण्यात आले. यात प्रामुख्याने 2.2.2010 रोजीची जाहीरात, विरुध्द पक्षाचा मेल, 3.6.2010 रोजी विरुध्द पक्षाला पाठविलेली नोटीस तसेच दि.14.10.2010 रोजीचा ईमले याचा समावेश आहे.
2. मंचाने विरुध्द पक्षाला निशाणी 5 अन्वये नोटीस जारी केली व जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले, मंचाची नोटीस विरुध्द पक्षाला प्राप्त झाल्याबाबत पोच पावती निशाणी 6 अभिलेखात उपलब्ध आहे. या पोचपापवतीवर विरुध्द पक्ष यांचा शिक्क असून दि.30.5.2011 रोजी नोटीस प्राप्त झाल्याची नोंद आहे. त्यांनतर दि.29.6.2011, 13.7.2011, 3.8.2011, 14.9.2011 या प्रमाणे अनेक तारखा होऊनही विरुध्द पक्ष यांनी लेखी जबाब दाखल केला नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 13(2)ब(ii) अन्वये एकतर्फी सुनावणी घेण्यात आली. आज रोजी मंचासमक्ष हजर असणा-या तक्रारदाराचे म्हणणे ऐकण्यात आले सदर तक्रारीचे निराकरणासाठी खालील मुद्दांचा मंचाने विचार केला-
मुद्दा क्र.1 तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून खरेदी केलेला भ्रमणध्वनी संच दोषपुर्ण आहे का?
उत्त्र – होय.
मुद्दा क्र. 2 तक्रारदार विरुध्द पक्षाकडून वादग्रस्त संचाची रक्क्म व न्यायीक खर्च मिळण्यात पात्र आहे काय?
उत्त्र – होय.
स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1
मुद्दा क्र. 1 चे संदर्भात विचार केला असता असे निदर्शनास येत की, तक्रारदाराने टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकातील दि.2.2.2010 रोजीच्या विरुध्द पक्षाच्या जाहीरातीनुसार दुरध्वनी संच विकत घेण्यासाठी मागणी नोंदवली. या संचाची किंमत रु.19,000/- जरी असली तरी तो रु.3,499/-ला तक्रारदाराला देण्यात येईल असा उल्लेख जाहिरातीत आढळतो आपल्याला भ्रमणध्वनी संच अतिशय स्वस्तात मिळेल या जाहिरातीला बळी पडला व त्यानी ऑनलाईन मागणी नोंदविली तसेच आपल्या क्रेडीट कार्डव्दारा रु.3,499/- विरुध्द पक्षाला ऑनलारईन अदा केले. विरुध्द पक्षानी त्यांस दि.12.2.2010 रोजी त्यांच्या घरच्या पत्यावर संच पाठविला. तक्रारीसोबत जोडण्यात आलेल्या निशाणी 3 प्रमाणे जोडलेल्या कागदपत्राच्या आधारे ही बाब स्पष्ट होते की, मोबाईल नंबर 8898012535 त्याला विरुध्द पक्षांनी पोचता केला. विकत घेतल्याच्या दिवसापासून हा संच व्यवस्थीत काम करीत नव्हता या बाबत तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे संपर्क साधला, ईमेलव्दारा कळविले, एवढेच नव्हे तर कायदेशीर नोटीस पाठविली. नोटीसची प्रत, ईमेलची प्रत, तसेच दि.14.10.2010 रोजीच्या पत्राची प्रत तक्रारीसोबत जोडलेली आहे. विकत घेतल्याच्या दिवसापासून वादग्रस्त संच नादुरुस्त अवस्थेत होता व आजही आहे हे त्यांचे प्रतिज्ञपत्रातील म्हणणे मंचाने विचारात घेतले व जवळपास 4 वेळा विरुध्द पक्ष यांच्याकडे लेखी तक्रारी नोंदवुनही त्याचीही कोणतीही दखल विरुध्द पक्षांनी घेतली नाही याचाही मंचाने विचार केला. उपरोक्त विवेचनाच्या आधारे मंच या निष्कर्षाप्रत आला की, विरुध्द पक्ष हा ग्राहक संरक्षकण कायद्याचे कलम 2(1)ग अन्वये तक्रारदारास उत्पादनातील दोक्ष असणारा भ्रमणध्वनी संच विकल्याबाबत दोषी आहे.
स्पष्टिकरण मुद्दा क्र.2
मुद्दा क्र. 2 च्या संदर्भात मंचाचे मत असे की, विरुध्द पक्ष हा तक्रादारास दोषपुर्ण संच विकल्याबाबत जबाबदार असल्याने व संच विकत घेण्याच्या पहिला दिवसापासूनच दोष निर्दशनास आल्याने विरुध्द पक्ष यांनी या संचाऐवजी दुसरा संच बदलून देणे आवश्यक होते. परंतु तक्रारदाराच्या सततच्या लेखी तक्रारीची दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने तक्रारदार विरुध्द पक्ष यांच्याकडून संच विकत घेण्यासाठी अदा केलेली रक्कम रु.3,499/-परत मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे ज्या उद्देशाने त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून भ्रमणध्वनी विकत घेतला तो उद्देश पुर्ण होऊ शकला नाही, तक्रारदार हा व्यवसायाने वकील असल्याने वादग्रस्त संच दोषपुर्ण असल्याने त्यास गैरसोय झाली व त्यास मनस्ताप सहन करावा लागला. तक्रारीचा वारंवार पाठपुरावा करुनही विरुध्द पक्ष यांनी दखल न घेतल्याने त्यांना या मंचाकडे येणे भाग पडेले. सबब तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांच्याकडून नुकसान भरपाई रु.3,000/- व न्यायीक खर्च रु.2,000/- मिळणेस पात्र आहे.
3. सबब अंतीम आदेश पारीत करण्यात येतो-
आदेश
1. तक्रार क्र 80/2011 मंजुर करण्यात येते.
2.आदेश तारखेच्या 45 दिवसांच्या आत विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास खालील प्रमाणे रक्क्म द्यावी.
अ) भ्रमणध्वनी संचाची रक्कम रु.3,499/- (रु. तीन हजार चारशे नव्यानव फक्त).
ब)मानसिक त्रासासाठी रु.3000/- (रु. तीन हजार फक्त).
क) न्यायीक खर्चाचे रु. 2000/- (रु. दोन हजार फक्त)
3.विहित मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्द पक्ष यांनी न केल्यास उपरोक्त सपुर्ण रक्क्म आदेश
तारीखेपासुन प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यत द.सा.द.शे 18 टक्के दारने वसुल करण्यास पात्र राहील.
दिनांक-22/11/2011
ठिकाण- ठाणे.