मा.अध्यक्षपद रिक्त.
तक्रारदारांतर्फे ॲड तेजल चौधरीसाठी ॲड अनिमा मिश्रा हजर. त्यांचा तक्रार दाखल करणेकामी युक्तीवाद ऐकण्यात आला.
तक्रार व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते की, तक्रारदार कंपनी ही कंपनी कायदा, 1956 खाली नोंदणीकृत कंपनी असून, त्यांनी व्यावसायिक कारणासाठी विकत घेतलेल्या वाहन क्र.एमएच 06 एएन 1393 साठी सामनेवाले यांचेकडून कर्जाच्या स्वरुपात सेवा घेतलेल्या आहेत. ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 च्या कलम 2 (7) (ii) मधील तरतुदीनुसार “ग्राहक” ही संज्ञा खालीलप्रमाणे आहे.
“2 (7)- ‘consumer’ means any person who-
(ii) hires or avails of any service for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such service other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person, but does not include a person who avails of such service for any commercial purpose”.
सबब, ग्राहक संरक्षण अधिनियमातील वर नमुद स्वयंस्पष्ट संज्ञेनुसार तक्रारदार हे ‘ग्राहक’ होत नसल्याने, प्रस्तुतची ग्राहक तक्रार क्र.139/2021 दाखल न करता, तक्रारदारांना याच कारणास्तव योग्य त्या न्यायासनासमोर दाद मागण्याची मुभा देऊन, दाखल टप्प्यावर खारीज करण्यात येते.
खर्चाबद्दल आदेश नाहित.
प्रकरणांत हाच अंतिम आदेश समजण्यात यावा.
आदेशाची साक्षांकित प्रत तक्रारदारांना विनाविलंब व विनामुल्य पाठविण्यात यावी. प्रकरण समाप्त.