आदेश (दिः 12 /05/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. या दोन्ही तक्रार प्रकरणातील विरुध्द पक्ष समान आहेत. तसेच वाद विषय समान आहे. त्यामुळे या एकत्रीत आदेशान्वये दोन्ही प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत ही बाब सर्वप्रथम स्पष्ट करण्यात येते. 2. तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्षाच्या विरार जिल्हा ठाणे या शाखेत खाते होते. त्यातील रक्कम तसेच रिकरिंग योजनेत गुंतविलेल्या खात्यातील रक्कम वारंवार मागणी करुनही विरुध्द पक्षांनी न दिल्याने व्याजासह संपुर्ण रक्कम मिळावी तसेच नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मंजुर करण्यात यावा या अपेक्षेने या तक्रारी दाखल करण्यात आल्या. विरुध्द पक्ष मे. तापी सहकारी पतपेढी महाराष्ट्र सहकारी कायद्यान्वये स्थापन झालेली पतपेढी आहे. चोपडा जि. जळगाव येथे संस्थेचे मुख्य कार्यालय असुन विरुध्द पक्ष 1 हा अध्यक्ष व 2 हा संस्थेचा व्यवस्थापक आहे. विरुध्द पक्ष 3 विरार शाखेचा व्यवस्थापक आहे. मंचाने अंतिम सुनावणीचे वेळेस तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकले तसेच त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. विरुध्द पक्षाकडे जमा केलेल्या रक्कमांच्या पावत्याच्या मुळ प्रतींचे अवलोकन करण्यात आले. विरुध्द पक्षाला मंचाने जारी केलेल्या नोटिसीच्या पोचपावत्या रेकॉडवर उपलब्ध आहेत. नोटिस प्राप्त होऊनही विरुध्द पक्षाने लेखी जबाब दाखल केला नाही. विरुध्द पक्षाला मंचाने अनेकवेळा संधी दिली. मात्र त्यांनी लेखी जबाब दखल न केल्याने ग्राहक कायद्याचे कलम 13(2)ब(ii) अन्वये एकतर्फी सुनावणीच्या आधारे सदर प्रकरणे निकाली काढण्याचे मंचाने निश्चित केले. 3. या तक्रारीच्या निराकरणार्थ खालील प्रमुख मुद्दांचा विचार करण्यात आला. मुद्दा क्र. 1 - विरुध्द पक्ष सदोष सेवेसाठी जबाबदार आहे काय ? उत्तर – होय. मुद्दा क्र. 2- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडुन ठेव जमा रककम व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे काय? उत्तर – होय. मुद्दा क्र. 3– तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडुन मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहे काय? उत्तर - होय. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1 व 2 - मुद्दा क्र. 1 व 2 यांचे संदर्भात तक्रार क्र.772/2009 (श्रीमती. मंगला ठोंबरे व इतर विरुध्द मे. तापी सहकारी पतपेढी ली.) या प्रकरणी तक्रारकर्त्यानी जोडलेल्या दस्तऐवजांच्या आधारे असे स्पष्ट होते की, मंगला किसन ठोंबरे यांचे बचत खाते नं. 23/297 यात दि.25/10/2007 रोजी रक्क्म रु.5,386/- शिल्लक होते. मागणी करुनही ही रक्कम विरुध्द पक्षाने परत केली नसुन त्यांचेच दुसरे बचत खाते 22/701 यात दि.23/07/2007 रोजी रु.10,000/- शिल्लक होते ही रक्कम देखील त्यांना परत मिळाली नाही या तक्रारीतील तक्रारकर्ता क्र. 2 किसन विठ्ठल ठोंबरे यांच्या .. 3 .. (तक्रार क्र. 772/2009 व 773/2009) रिकरींग खाते 25/99 यात दि.05/01/2005 रोजी रु.41,250/- शिल्लक होते विरुध्द पक्षानी ही रक्कम परत केली नाही. याच तक्रारीतील तक्रारकर्ता क्र. 3 विकास किसन ठोंबरे यांचे रिकरिंग अकाऊंट 25/102 आहे या खात्यात रक्कम रु.66,626/- शिल्लक आहेत. ही रक्कम अद्यापही विरुध्द पक्षांनी त्याला परत केलेली नाही. तक्रार क्र.773/2009 (सौ. योजना शामसुंदर पाटील व इतर विरुध्द मे. तापी सहकारी पतपेढी ली.) या प्रकरणातील मुळ दस्तऐवजांचा विचार केला असता असे सिद्ध होते की, सौ. योजना शामसुंदर पाटील यांचे विरार-पुर्व शाखेतील बचत खाते क्र.25/288 यात दि.19/09/2007 रोजी रु.2,519/- शिल्लक होते. त्यांचेच अष्टचक्र खाते क्र.22/626 यात दि.20/01/2007 रोजी रु.20,252/- शिल्लक होते. त्याचप्रमाणे रिकरींग खाते क्र.23/300 यात दि.23/01/008 रोजी रु.11,492/- जमा होते. ही रक्कम विरुध्द पक्षांनी त्याला परत केलेली नाही. या प्रकरणातील तक्रारकर्ता क्र.2 श्री. भासकर दगडु पाटील यांचे धनसंचय सुविधा ठेव खाते क्र.32/64 यात दि.11/11/2008 रोजी रु.25,000/- जमा होती. तर खाते क्र.32/68 यात दि.25/11/2008 रोजी रु.21,000/- शिल्लक होते. तसेच खाते क्र.23/210 यात दि.05/01/2009 रोजी रु.48,088/- शिल्लक होते. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षाकडे जमा असणा-या आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम व्याजासह परत मिळावी अशी मागणी वारंवार विरुध्द पक्षाला केली तक्रारीसोबत विरुध्द पक्षाला पाठविलेल्या पत्रांच्या प्रती जोडलेली आहेत. ही विनंती पत्रे विरुध्द पक्षाला प्राप्त झाल्याबाबत स्वाक्षरी व शिक्का पत्राखाली आढळतो मात्र विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला रक्कम परत केली नाही त्यामुळे मंचाच्या मते विरुध्द पक्ष हे वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या ग्राहक कायद्याचे कलम 2(1)(ग) अन्वये सदोष सेवसाठी जबाबदार आहेत. वर उल्लेख केल्यानुसार तक्रारकर्ते हे विरुध्द पक्षाकडे जमा असणारी रक्कम अंतिम आदेशात नमुद केल्यानुसार द.सा.द.शे 12% दराने परत करावी. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 2 - मुद्दा क्र. 2 चे संदर्भात मंचाचे असे निदर्शनास येते की, विरुध्द पक्ष ही संस्था जरी महाराष्ट्र सरकारी कायद्यान्वये स्थापीत झालेली असली तरी या संस्थेने ''सहकार'' या उदात्त हेतुला आपल्या कृतीने तिलांजली दिलेली आहे. जास्त व्याजाचे अमीष दाखवुन सर्वसामान्य ग्राहकांना आपल्या जाळयात ओढायचे त्यांचेकडुन ठेवी जमा करायच्या सुरवातीस काही काळ काही ग्राहकांच्या रकमा परत करायच्या संस्थेच्या संचालक मंडळावर भाबडा विश्वास ठेवून कनिष्ट मध्यम वर्गीय व मध्यम वर्गीय ग्राहकांनी आपल्या कष्टाची कमाई विश्वासाने सहकारी पतपेढयात गुंतवायची त्यानंतर संचालक मंडळ व संस्थेच्या तथाकथीत प्रर्वतक यांनी कटकारस्तांन करुन बोगस नावाने कोण्ोतेही तारण न घेता मोठया रकमेचे कर्ज मंजुर करावयाचे अनेकदा आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या नावाने कर्ज मंजुर करण्यासाठी पतपेढीच्या कर्मचा-यांवर दबाव आणायचा व त्यानंतर वाटलेल्या रक्कमांपैकी कोणतीही रक्कम वसुल करणे शक्य नाही कारण मुळात ती रक्कम वसुल केल्या जाणार नाही या उद्देशानेच कर्जाच्या नावाखाली वाटलेली असल्याने संस्था आर्थिक डबघाईस आल्याचे चित्र तयार करायचे
.. 4 ..(तक्रार क्र. 772/2009 व 773/2009) व अगदी ठरवुन संस्था बुढवायची हा प्रकार दुर्दैवाने या राज्यात राजरोशपणे शासनाच्या अनास्थेमुळे शुरू आहे ही बाब नमुद करणे आवश्यक ठरते. सदर प्रकरणी देखील विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांनी मागणी करुनही खात्यातील रक्कम परत केली नाही. त्यामुळे त्यांचे केवळ आर्थिक नुकसान झाले असे नसुन त्यांना फार मोठया प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. सबब विरुध्द पक्ष तक्रार क्र.772/2009 व 773/02009 यात प्रत्येकी रु.50,000/- नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास देण्यास जबाबदार आहेत. तसेच त्यांच्या मागणीची योग्य दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने त्यांना सदर प्रकरण मंचात दाखल करणे भाग पडले त्यामुळे विरुध्द पक्षांनी स्वतंत्रयपणे रु.10,000/- नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. 4. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1.तक्रार क्र.773/2009 व 774/2009 मंजूर करण्यात येतो. 2.आदेश तारखेच्या 2 महिन्याचे आत विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या खाली नमुद केल्यानुसार रक्कम तक्रारकर्त्यांना व्याजासह द्यावी. अ) तक्रार क.772/2009 (श्रीमती. मंगला ठोंबरे व इतर विरुध्द मे. तापी सहकारी पतपेढी ली.) अ.क्र. नाव/खाते क्र. रक्कम(रु) व्याज द.सा.द.शे 12% दराने रक्कम मिळेपर्यंत 1. सौ.मंगला किसन ठोंबरे 23/297 रु. 5,386/- 25/11/2007 2. सौ.मंगला किसन ठोंबरे 22/709 रु.10,126/- 23/07/2007 3. श्री.किसन विठ्ठल ठोंबरे 25/99 रु.41,250/- 05/01/2005
4. श्री.विकास किसन ठोंबरे 25/102 रु.66,626/- 14/01/2005 ब) तक्रार क्र.773/2009 (सौ. योजना शामसुंदर पाटील व इतर विरुध्द मे. तापी सहकारी पतपेढी ली.) अ.क्र. नाव/खाते क्र. रक्कम(रु) व्याज द.सा.द.शे 12% दराने रक्कम मिळेपर्यंत 1. सौ.योजना शामसुंदर पाटील 25/288 रु. 2,519/- 19/09/2007 2. सौ.योजना शामसुंदर पाटील 22/626 रु.20,252/- 20/01/2007 3. सौ.योजना शामसुंदर पाटील 23/300 रु.11,492/- 22/01/2008 4. श्री.भास्कर दगडु पाटील 32/64 रु.25,000/- 11/11/2008 5. श्री.भास्कर दगडु पाटील 32/68 रु.21,000/- 25/11/2008 6. श्री.भास्कर दगडु पाटील 23/210 रु.48,088/- 05/01/2009 3.विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या तक्रार क्र. 772/2009 व तक्रार क्र.773/2009 यातील तक्रारकर्त्यांना नुकसान भरपाई रक्कम प्रत्येकी रु.50,000/- (रु.पन्नास हजार फक्त) तसेच न्यायिक खर्चाचे रु.10,000/-(रु. दहा हजार फक्त) याप्रमाणे एकुण रु.60,000/- (रु. साठ हजार फक्त) द्यावेत. .. 5.. (तक्रार क्र. 772/2009 व 773/2009) 4.विहित मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या न केल्यास तक्रारकर्ता उपरोक्त संपुर्ण रक्कम विरुध्द पक्षाकडुन आदेश तारखेपासुन ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे 12% दराने व्याजासह वसुल करण्यास पात्र राहतील. दिनांक – 12/05/2011 ठिकाण - ठाणे सही/- सही/- (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |