Maharashtra

Central Mumbai

CC/11/160

Shri Sukumar G. Maity - Complainant(s)

Versus

M/S T.M.Star Rolling Shutter - Opp.Party(s)

Self

22 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/11/160
 
1. Shri Sukumar G. Maity
Sector-7,48/892, 3rd floor, C.G.S. colony, Antop Hill, Mumbai 400037
...........Complainant(s)
Versus
1. M/S T.M.Star Rolling Shutter
Shop No 102, Navatarun Naik Nagar, Sion Koliwada Church,Antop Hill, Mumbai 400037
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. MR. NALIN MAJITHIA PRESIDENT
  SMT.BHAVNA PISAL MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

मध्‍य मुंबई ग्राहक तक्रार न्‍याय निवारण मंच, परेल मुंबई

 

                                    ग्राहक तक्रार क्रमांक 160/2011

                                    तक्रार दाखल दिनांक 04/08/2011                                                          

                                  निकालपत्र दिनांक 22/09/2011

 

 

 

श्री. सुकुमार जी. मैती,

सेक्‍टर 7, 48/892, 3 रा मजला,

सी.जी.एस. कॉलनी, अॅन्‍टॉप हिल,

मुंबई 400 037.                                            ........   तक्रारदार

 

विरुध्‍द

मेसर्स टी.एम. स्‍टार रोलींग शटर,

शॉप नंबर 102, नवतरुण नाईक नगर,

सायन कोळीवाडा चर्च, अॅन्‍टॉप हील,

मुंबई 400 037.                                              ......... सामनेवाले

 

समक्ष मा. अध्‍यक्ष, श्री. नलिन मजिठिया

        मा. सदस्‍या, श्रीमती भावना पिसाळ 

 

उपस्थिती तक्रारदार स्‍वतः हजर

          विरुध्‍दपक्ष गैरहजर (एकतर्फा)

निकालपत्र

                                        एकतर्फा

 

द्वारा - मा. सदस्‍या, श्रीमती भावना पिसाळ 

 

     तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत  दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांचेकडून त्‍यांच्‍या घराच्‍या मुख्‍य दरवाज्याला लोखंडी सेफ्टी डोअर (सुरक्षा दरवाजा) विकत घेण्‍याचे ठरविले होते, व त्‍याकरीता त्‍यांनी रुपये 1,500/- अॅडव्‍हॉन्स गैरअर्जदार यांना दिलेले होते. गैरअर्जदार यांनी लोखंडी दरवाजा बनवून दिला नाही.  तसेच अग्रीम दिलेली रक्‍कम रुपये 1500/- परत केलेले नाहीत. त्यामुळे तक्रारीत तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून अग्रीम रक्‍कम रुपये 1500/- परत मिळणेबाबत व नुकसानभरपाई मिळणेबाबत मागणी केलेली आहे.

  

      2) प्रस्‍तुत प्रकरणात मंचामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस काढण्‍यात आली. गैरअर्जदार हे मंचाची नोटीस मिळूनही हजर झाले नाहीत. तसेच सदर नोटीस  मिळाल्याबाबतची पोचपावती अभीलेखात उपलब्‍ध आहे. गैरअर्जदार हे मंचात हजर न झाल्यामुळे मंचाने गैरअर्जदार यांचेविरुध्‍द दिनांक 13.09.2011 रोजी तक्रार एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारित केला होता. सदर प्रकरणात तक्रारकर्ती यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, सत्‍यप्रतिज्ञा पत्रावर पुरावा दाखल केलेला आहे.

 

        3) प्रस्‍तुत प्रकरण मंचासमक्ष दिनांक 22/09/2011 रोजी मौखिक युक्‍तीवादाकरीता आले असता तक्रारदार स्‍वतः  हजर. त्‍यांचा मौखिक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज म्‍हणजेच तक्रार,  प्रतिज्ञापत्रावरील पुराव्‍याचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्‍कर्षावर येत आहे.

                              - निष्‍कर्ष -

      तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केले आहे की गैरअर्जदार हे फॅब्रीकेशन, लोखंडी दरवाजे, ग्रील, कंपाऊंड इत्‍यादीचे काम करतात. तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना दिनांक 09.04.2011 रोजी सेप-टी डोअर बनवण्‍याकरीता एकूण रुपये 3800/- देण्‍याचा करार केला होता. त्यापैकी रुपये 1500 अग्रीम म्‍हणून दिले होते. ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कॅश मेमो/अॅप्रुव्हल मेमो वरुन सिध्‍द होते.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार सत्‍य प्रतिज्ञा पत्रावर दाखल केली आहे व नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांना सेफ्टी डेाअर बनवून दिले नाही व अग्रीम रक्‍कम परत केली नाही.  गैरअर्जदार यांनी अनूचीत व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे.  तसेच सेवेत त्रुटी दिली आहे.  मंचाच्‍या मते गैरअर्जदानी रुपये 1500/- दिनांक 09.04.2011 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे 12 टक्‍के व्‍याज दाराने तक्रारदाराला परत करावे.  तक्रारदारानी शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- ची मागणी केली आहे. मंचाच्‍या मते तक्रारदाराने घराच्‍या सुरक्षे करीता गैरअर्जदाराकडे सेफ्टी डोअर बसवण्‍याचा करार केला होता व त्‍याअंतर्गत रुपये 1500/- अग्रीम रक्‍कम दिली होती. परंतु गैरअर्जदाराने सदर रक्‍कम परत न दिल्‍याने तक्रारदाराला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याकरीता गैरअर्जदाराने तक्रारदाराला रुपये 1500/- दयावयास पाहिजेत.  तसेच तक्रारीच्‍या खर्चा पोटी रुपये 1000/- दयावयास पाहिजेत. प्रस्‍तुत तक्रारीत गैरअर्जदाराला संधी देवूनही गैरअर्जदाराने तक्रारीबाबत कोणतेच संयुक्तिक म्‍हणणे दाखल केलेले नाही.  तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा व दस्‍तावेजांचा विचार केला असता. मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहेत.

 

- अंतिम आदेश -

 

1)         तक्रारदार यांची तक्रार क्रमांक 160/2011 अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

2)       गैरअर्जदार यांना आदेश देण्‍यात येतो की,  त्‍यांनी तक्रारदाराकडून  घेतलेली रक्‍कम रुपये रुपये 1500/- (रुपये एक हजार पाचशे फक्‍त) दिनांक 09.04.2011 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम देईपर्यंत द.सा.द.शे 12 टक्‍के व्‍याज दाराने तक्रारदाराला परत करावे

3)       गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला शारिरीक मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रुपये 1,500/- (रुपये एक हजार पाचशे फक्‍त) द्यावेत.  

 

4)      गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला तक्रारीच्‍या न्‍यायिक खर्चापोटी नुकसानभरपाई रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.

 

    4) गैरअर्जदार यांनी सदर आदेशाची पूर्तता आदेश प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे

         आंत करावी.

5)   सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्‍यात यावी.

 

( सदर आदेश तक्रारदाराच्‍या वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर लगेच  

  मंचाच्‍या बैठकीत देण्‍यात आला.)  

 

दिनांक 22/09/2011

ठिकाण - मध्‍य मुंबई, परेल.

 

 

                   सही/-                                 सही/-

               (भावना पिसाळ)                 (नलिन मजिठिया)

                   सदस्‍या                         अध्‍यक्ष

         मध्‍य मुंबई ग्राहक तक्रार न्‍याय निवारण मंच, परेल मुंबई

                                                     एम.एम.टी./-

 

 
 
[HONABLE MR. MR. NALIN MAJITHIA]
PRESIDENT
 
[ SMT.BHAVNA PISAL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.