Maharashtra

Nagpur

CC/571/2019

SMT. SONAPATIDEVI PRABHUNATHRAM PRAJAPATI - Complainant(s)

Versus

M/S SWAPNSHREE DEVELOPERS AND BUILDERS, THROUGH PARTNERS - Opp.Party(s)

ADV. ROHAN MALVIYA

12 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/571/2019
( Date of Filing : 05 Oct 2019 )
 
1. SMT. SONAPATIDEVI PRABHUNATHRAM PRAJAPATI
R/O. AT POST YERKHEDA, TAHSIL-KAMPTEE, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. MRS. RAJLAXMI RADHESHYAM PRASAD PRAJAPATI
R/O. AT POST YERKHEDA, TAHSIL KAMPTEE, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S SWAPNSHREE DEVELOPERS AND BUILDERS, THROUGH PARTNERS
601, NEAR YESHWANT STADIUM, BACK OF SABHARWAL TRAVELS, CHHOTI DHANTOLI, NAGPUR-440012
NAGPUR
MAHARASHTRA
2. MRS. NEELIMA RAMESH SONAK, PARTNER OF M/S SWAPNASHREE DEVELOPERS AND BUILDERS
R/O. PLOT NO. 46, VAKILPETH, NEAR BOKADE KIRANA STORES, HANUMAN NAGAR, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
3. MRS. SEEMA SUNIL LAKHANKAR , PARTNER OF M/S SWAPNASHREE DEVELOPERS AND BUILDERS
R/O. FLAT NO. 103, NEAR RELIANCE FRESH, PLOT NO. EA/4, OMKAR NAGAR SQUARE, PARVATI NAGAR, NAGPUR-440027
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 12 Mar 2020
Final Order / Judgement

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम १२ अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षा सोबत मौजा- वडद, खाता नंबर ८३, सर्व्‍हे नंबर ८३, तहसिल उमरेड, जिल्‍हा  नागपूर येथील भूखंड क्रं. ०३, एकूण क्षेत्रफळ २३५ चौ.मी. हा एकूण रक्‍कम रुपये ७,९२,२९१/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार  दिनांक ७/१/२०१९ रोजी केला होता. त्‍याकरीता तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे करार करतेवेळी रुपये ४,८८,०००/- दिले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस सदरच्‍या जागेचे अकृषक तसेच नगर रचना विभागाकडुन नकाशा स्विकृत करुन देण्‍याचे व एम.आर.टी.पी. अॅक्‍ट प्रमाणे सदरच्‍या लेआऊट च्‍या जागेचा निवासी वापर, पर्यावरणाचे प्रमाणपञ आणून देण्‍याचे आश्‍वासन दिले होते परंतु विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त  कोणत्‍याही बाबींची पूर्तता केली नाही. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षास त्‍यांच्‍या भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपञ करण्‍याकरीता वारंवार विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने वारंवार टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षास दिनांक २५/७/२०१९ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्षाने त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीस  सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले.  
  2. तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार पद्धतीचा वापर करुन सेवेत ञुटी केली असल्‍याचे घोषित करावे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे उपरोक्‍त भुखंड क्रमांक ३ करीता एकूण जमा असलेली रक्‍कम रुपये ७,९२,२९१/- स्विकारली असल्‍यामुळे सदरच्‍या भुखंडाचे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपञ करुन द्यावे. हे शक्‍य नसल्‍यास सदरच्‍या  रकमेवर द.सा.द.शे. १८ टक्‍के  व्‍याजदराने तक्रारकर्तीस संपूर्ण रक्‍कम परत करण्‍यात यावी तसेच  मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासाकरीता रुपये ५,००,०००/- देण्‍यात यावे व तक्रारीचा खर्च रुपये ५०,०००/- देण्‍यात यावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२ व ३ यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त  होऊनही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. ०९/०१/२०२० रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता व तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्षे खालीलप्रमाणे नोंदविले.

          अ.क्र.                     मुद्दे                                                               उत्‍तर

  1. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?                    होय           
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा देऊन                     होय

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय ?                      

  1. काय आदेश ?                                                               अंतिम आदेशानुसार

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 2 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षा सोबत मौजा- वडद, खाता नंबर ८३, सर्व्‍हे नंबर ८३, तहसिल उमरेड, जिल्‍हा नागपूर येथील भूखंड क्रं. ०३, एकूण क्षेत्रफळ २३५ चौ.मी. हा एकूण रक्‍कम रुपये ७,९२,२९१/- मध्‍ये  विकत घेण्‍याचा  करार दिनांक ७/१/२०१९ रोजी केला होता त्‍याकरीता तक्रारकर्तीने विरुध्‍द  पक्षाकडे करार करतेवेळी ४,८८,०००/- दिले. विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्तीच्‍या सदरच्‍या जागेचे अकृषक तसेच नगर रचना विभागाकडुन नकाशा स्विकृत करुन देण्‍याचे व एम.आर.टी.पी. अॅक्‍ट प्रमाणे सदरच्‍या  लेआऊट च्‍या जागेचा निवासी वापर, पर्यावरणाचे प्रमाणपञ आणून देण्‍याचे आश्‍वासन दिले.  परंतु विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त कोणत्‍याही बाबींची पूर्तता केली नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्षास दिनांक २५/७/२०१९ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे वेळोवेळी मिळून एकूण रक्‍कम रुपये ७,९२,२९१/- नगदी/ धनादेशाद्वारे अदा केलेली आहे व त्‍याबाबतच्‍या  पावत्‍या देखील जोडलेल्‍या आहेत. यावरुन तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्षाने सौ निलीमा रमेश सोनक, सौ सिमा सुनिल लाखनकर व श्री रुक्षदास मोकासराव बनसोड यांच्‍यासोबत झालेले विक्रीपञ सुद्धा लावलेले आहे. विरुध्‍द पक्षाने सदरची जागा उमरेड तहसिल मधुन रुपये २९,००,०००/- मध्‍ये  खरेदी केल्‍याचे दिसून येते. तसेच तक्रारकर्तीने  दिनांक ७/१/२०१९ रोजी रुपये ५००/- च्‍या स्‍टॅम्‍पपेपरवर उभयपक्षात झालेला करारपञ अभिलेखावर दाखल केला आहे. या करारपञाअन्‍वये विरुध्‍द पक्षाला रुपये ७,९२,२९१/- प्राप्‍त  झाल्‍याचे विरुध्‍द पक्षाने मान्‍य केले आहे. तसेच विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्तीस कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपञ करुन देण्‍याचे मान्‍य केले आहे. तसेच संपूर्ण लेआऊट करीता एम.एस.ई.बी. या विभागाकडुन ट्रान्‍सफॉरमर, मंदिर, बगिचा, क्‍लब हाऊस व लेआऊट च्‍या आतील रोड बनविण्‍याचे करारपञातच परिच्‍छेद ११ मध्‍ये नमुद असल्‍याप्रमाणे आश्‍वासन दिले होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडुन करारपञाप्रमाणे ठरलेली संपूर्ण रक्‍कम रुपये ७,९२,२९१/- स्विकारुन सुद्धा उपरोक्‍त  लेआऊट चे शासनातर्फे अकृषक स्विकृती करुन, भूखंडाचे विकसन करुन कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा तक्रारकर्तीकडुन स्‍वीकारलेली रक्‍कम सुद्धा आजतागायत परत केली नाही ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून त्‍याने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केले असल्‍याचे दिसून येते.   

      सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार मंजूर अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२ व ३ यांनी तक्रारकर्तीच्‍या नावे उपरोक्‍त भुखंड क्रमांक ३ चे विक्रीपञ सदरहु लेआऊट ची शासनातर्फे अकृषक वापरासाठी आवश्‍यक असलेली परवानगी प्राप्‍त करुन आणि विकसनाचे कार्य पूर्ण करुन कायदेशीरपणे नोंदणीकृत विक्रीपञ करुन द्यावे आणि विक्रीपञ नोंदणीचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.
  3. वरीलप्रमाणे विक्रीपञ नोंदणीकृत करुन देण्‍यास कायदेशीर किंवा तांञिक अडचण असेल तर विरुध्‍द पक्ष यांनी २३५ चौरस मीटर इतके क्षेञफळ असलेल्‍या भुखंडासाठी मौजा वडद, तालुका उमरेड, सर्व्‍हे नंबर ८३ या मिळकतीच्‍या झोन मधील अथवा नजीकच्‍या इतर झोनमध्‍ये २३५ चौरस मीटर एवढ्या क्षेञफळाच्‍या अकृषक भुखंडासाठी शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्तीला     आदेशाच्‍या दिनांकापासुन एक महिण्‍याचे आंत द्यावी आणि सदरहु रक्‍कम एक महिण्‍याचे आत न दिल्‍यास त्‍या रकमेवर आदेशाच्‍या  दिनांकापासुन द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने व्‍याज रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला मानसिक व  शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये १०,०००/-  द्यावे.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्तीला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.