:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, मनोहर गो. चिलबुले, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 23/07/2013)
प्रस्तुत प्रकरणात उभयपक्षात नि.क्रं. 12 प्रमाणे समझोता पञातील अटी मान्य असल्याची अर्जदार व गैरअर्जदार यांचेकडून समक्ष खाञी करुन घेतली आहे.
समझोता पञ नि.क्रं. 12 मधील अटी प्रमाणे खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतिम आदेश
समझोता पञ नि. क्रं. 12 प्रमाणे अर्जदाराचा अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
1. गै.अ.यांनी या प्रकरणातील सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन दि.अर्जदारास 28 जून 2013 रोजी पंजीबध्द विक्रीपञ करुन दिले असून आज रोजी सदनिकेचा ताबासुध्दा दिलेला आहे. त्याबाबत स्वतंञ ताबापावती अर्जदाराने दिलेली आहे.
2. परंतु अजून पावेतो वीज कंपनीकडून मीटरची व्यवस्था न झाल्यामुळे सदनिकेसाठी वीजेचे स्वतंञ मीटर लागलेले नाही. गै.अ. दि. 28/08/2013 पावेतो सदर सदनिकेसाठी अर्जदाराच्या नावाने स्वतंञ वीज मिटर लावून देतील.
3. सदर सदनिकेसाठी स्वतंञ मीटरची व्यवस्था होईपावेतो सर्व सदनिकांसाठी असलेल्या कॉमन मीटरवरुन वीजेचा वापर अर्जदार करतील. त्याबाबत दरमहा रु. 200/- अर्जदार गै.अ.यांना देतील.
4. राजस्व अभिलेख तसेच इतर सरकारी आणि निमसरकारी अभिलेखात अर्जदार आपले नाव चढवून घेवू शकेल. त्यासाठी गै.अ.ची सम्म्ती असून त्यासाठी आवश्यक त्या कागदपञावर गै.अ. सहया करुन दिल्या आहेत. याशिवाय इतर कोणत्याही सम्मतीपञावर किंवा कागदपञांवर गै.अ.यांच्या सहया लागतील तर त्यासुध्दा ते देतील आणि फेरफारासाठी पूर्ण सहकार्य करतील.
5. अर्जदाराने इतर सर्व मागण्या सोडून दिल्या आहेत.
6. या प्रकरणाचा खर्च ज्याचा त्याचेवर राहील.
चंद्रपूर,
दिनांक : 23/07/2013.