Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/04/162

Shri Anil Hurkat& Other - Complainant(s)

Versus

M/s Sterling Holiday Resorts Ltd - Opp.Party(s)

B MGanu

16 Dec 2010

ORDER


ADDITIONAL DISTRICT CONSUMER REDRESSAL DISPUTES FORUM,BANDRA3rd floor,New ADM BLDG. Near Chetna College,Bandra(E)-51.
Complaint Case No. CC/04/162
1. Shri Anil Hurkat& Other401 Kalpana Beasant Street,Santacruz(W)Mumbai-54 ...........Appellant(s)

Versus.
1. M/s Sterling Holiday Resorts LtdBhagirathi Smrithi, A Wing, Subhash Road, Vile Parle ,Mumbai 67 ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. JUSTICE S P Mahajan ,PRESIDENTHONORABLE G L Chavan ,Member
PRESENT :

Dated : 16 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

अर्जदारातर्फे वकील श्री.बी.एम्.गाणू.
गैरअर्जदारासाठी वकील श्री.रामदासन.
 
मा.अध्‍यक्षानुसार दिलेले निकालपत्र.
 
तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार खालील प्रमाणे.
1.    तक्रारदारांनी सामनेवाले यांच्‍या लोणावळा येथील हॉलीडे रिसॉर्टमध्‍ये "टाईम" शेअर विकत घेतला. त्‍या बद्दलचा स्‍टरलिंग व्‍हॅकेशन टाईम शेअर करार दिनांक 18/05/1994 रोजी झाला. टाईम शेअरचा कालावधी प्रत्‍येक वर्षी 24 जून ते 30 जून पर्यत होता. हॉलीडे रिसॉर्टमध्‍ये या कालावधीत तक्रारदारांना एक शयनकक्ष, डायनिंग एरिया, व किचन असलेले 350 चौरस फुटापेक्षा कमी असलेले रेग्‍युलर अपार्टमेंट ( Compact Apartment)  देणार होते.  तक्रारदारांनी या टाईम शेअरसाठी रु.29,900/- सामनेवाले यांना दिले. त्‍यापैकी 13,500/- ही टाईम शेअरची किंमत होती व ग्राहकांना ज्‍या सुविधा पुरविल्‍या जातील त्‍यासाठी रु.16,500/- त्‍यांनी आगाऊ घेतले. सदरचा करार 1996 पासून ते 99 वर्षासाठी होता.  
2.    तक्रारदारांचे म्‍हणणे की, कराराचे वेळी असे ठरले होते की, जर कंपनी हॉलीडे रिसॉर्टचे बांधकाम करु शकली नाही तर कंपनी टाईम शेअर धारकांना /त्‍यांचे सदस्‍यांना त्‍याच्‍या टाईम शेअरच्‍या कालावधीची त्‍या वर्षाची 18 टक्‍के प्रमाणे त्‍यांनी भरलेल्‍या रक्‍कमेवर नुकसान भरपाई देईन. तक्रारदारांचे म्‍हणणे की, सा.वाले कंपनी 7 वर्षापर्यत हॉलीडे रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण करु शकली नाही. ही सामनेवाले यांच्‍या सेवेत न्‍यूनता आहे. म्‍हणून त्‍यांनी सामनेवाले यांचेकडे ठरल्‍याप्रमाणे नुकसान भरपाई मागायला सुरुवात केली. सामनेवाले यांनी त्‍यांना कळविले की, नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे ते हॉलिडे रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण करु शकले नाही. मात्र तक्रारदार यांना 1999 या वर्षासाठी साठी पुकसान भरपाई देण्‍याची कार्यवाही सुरु झाली आहे. सा.वाले यांनी  या वर्षासाठी रु.5,130/- येवढी नुकसान भरपाई मंजूर केली. मात्र रोख पैसे न देता त्‍यांना त्‍या रक्‍कमेची स्‍टरलिंग हॉलीडेअर्स करंन्‍सी दिली. ती फक्‍त त्‍यांच्‍या हॉलीडे रिसॉर्टमध्‍ये वापरता येत होती.  ही नुकसान भरपाई देण्‍यासाठी सा.वाले यांनी खुप उशिर केला
3.    तक्रारदारांचे म्‍हणणे असे की रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण झालेले नसल्‍यामुळे त्‍यांनी सा.वाले यांचे कडून दिनांक 07/05/2001 च्‍या पत्राने आणि 2001 या वर्षासाठीही नुकसान भरपाई मागीतली. सा.वाले यांनी त्‍यांच्‍या वेलवेट हिल रीट्रीट या त्‍यांच्‍या टायअप पर्यायी रीसॉर्टबद्दल कळविले परंतु तक्रारदारांनी सा.वाले यांना कळविले की, त्‍यांच्‍या पर्यायी हॉलिडे रिसॉर्टमध्‍ये त्‍यांना स्‍वारस्‍य नाही. तक्रारदारांनी दिनांक 22/05/2001 रोजीच्‍या पत्राने सा.वाले यांना कळविले की, त्‍यांच्‍या वेलवेट हिल या पर्यायी हिल रिसॉर्टमध्‍ये स्‍वयंपाक खोलीची व्‍यवस्‍था नसल्‍याने त्‍यांनी तक्रारदारांना ठरल्‍याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. मात्र सा.वाले यांनी दिनांक 31/08/2001 चे पत्र देवून तक्रारदाराचा 1996,1997,1998,2000 व 2001 चा क्‍लेम नाकारला. दिनांक 06/10/2001 चे पत्राने सा.वाले यांनी कळविले की, 16 दिवस तक्रारदारांच्‍या खाती जमा आहेत. तक्रारदाराने पुन्‍हा पत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु सा.वाले यांनी त्‍याला प्रतिसाद दिला नाही. त्‍यानंतर तक्रारदाराने वकीलांमार्फत पत्र पाठवून त्‍यांनी सा.वाले यांना दिलेले रु.30,000/- व त्‍यांच्‍या खाती जमा असलेल्‍या 16 दिवसाची नुकसान भरपाई याची सा.वाले यांचेकडून मागणी केली. सा.वाले यांनी कळविले की, तक्रारदारांची नुकसानभरपाईची मागणी विचारात घेता येत नाही. तक्रारदार यांचे म्‍हणणे की, कराराची अट परिच्‍छेद क्र.22 डी. त्‍यांचे केसच्‍या बाबतीत लागू होत नाही, कारण निवासस्‍थान तंयार आहे परंतु त्‍याचा वापर केला नाही तरच ही अट लागू होते. सा.वाले यांनी पर्यायी हॉलिडे रिसॉर्ट देऊ केले होते ते लांबच्‍या ठिकाणी असल्‍यामुळे त्‍यांनी त्‍याचा प्रस्‍ताव नाकारला होता. तक्रारदाराला पर्यायी रिसॉर्टमध्‍ये तसेच त्‍यांच्‍या खाती रिसॉर्ट न वापरलेले दिवस जमा होण्‍यास स्‍वारस्‍य नसल्‍यामुळे सदरहू तक्रार दाखल केली. तक्रारदार यांनी सा.वाले यांना दिलेले रु.30,000/- व त्‍यांच्‍या खाती जमा असलेले दिवसाची नुकसान भरपाई तसेच मानसिक त्रासापोटी रु.5 लाख नुकसान भरपाई अशी मागणी केली आहे. तसेच या तक्रारीचा खर्च रु.15,000/- मागीतलेला आहे.
4.    सा.वाले यांनी त्‍यांची कैफीयत देवून तक्रारदारांचे आरोप नाकारले. त्‍यांचे म्‍हणणे की, त्‍यांचे स्‍वतःचे चालु परिस्थितीत 14 रिसॉर्ट आहेत. व 18 रिसॉर्ट टायअप रिसॉर्ट आहेत. टायअप रिसॉर्टमध्‍येही ते त्‍यांच्‍या सभासदांना कराराप्रमाणे ठरलेल्‍या सुविधा देतात. तसेच त्‍यांचे म्‍हणणे की, सन 1996 मध्‍ये त्‍यांचे पर्यायी रिसॉर्ट उपलब्‍ध होते. परंतु तक्रारदारांनी ती सुविधा घेतली नाही. 1997 व 2004 या वर्षी तक्रारदाराने हॉलिडे रिसॉर्टची सुविधा उपभोगलेली आहे. तक्रारदाराने उपभोगलेल्‍या हॉलिडे रिसॉर्ट बाबत सविस्‍तर माहिती तक्रार प्‍यारा क्र. 3 मध्‍ये दिलेली आहे. त्‍यांचे म्‍हणणे की, 1997 मध्‍ये लोणावळा,पाचगणी,महाबळेश्‍वर या ठिकाणी तक्रारदाराने एकूण 14 दिवस हॉलिडे रिसॉर्टची सुविधा घेतलेली आहे. म्‍हणजे तक्रारदाराने 1996-97 या दोन्‍ही वर्षाची सेवा घेतलेली आहे. कारण एका वर्षात फक्‍त 7 दिवस ते सुविधा घेऊ शकतात. तसेच 1998 मध्‍ये मसुरी येथे 5 दिवस त्‍यांनी हॉलिडे रिसॉर्टची सुविधा घेतली आहे. 2004 ला मनाली येथे 24 दिवस सुविधा घेतली आहे. याप्रमाणे त्‍यांनी 1996-2004 पर्यत एकूण 43 दिवस त्‍यांच्‍या वेगवेगळया हॉलिडे रिसॉर्टची सुविधा उपभोगलेली आहे. केवळ पैसे मिळविण्‍याच्‍या उद्देशाने सदर तक्रार केलेली आहे. 1999 या वर्षी ते लोणावळा येथे पर्यायी हॉलिडे रिसॉर्ट तक्रारदारांना देऊ शकलेले नाही. म्‍हणून त्‍या वर्षाची नुकसान भरपाई त्‍यांनी तक्रारदाराला कराराप्रमाणे दिलेली आहे. याप्रमाणे हॉलिडे रिसॉर्टची सुविधा 50 दिवस तक्रारदाराने घेतली आहे.
5.    सा.वाले यांचे म्‍हणणे की आजही त्‍यांचेकडे पर्यायी चांगले हॉलिडे रिसॉर्ट उपलब्‍ध आहेत. व त्‍यांचे इतर सदस्‍य ती सुविधा घेत आहेत. सा.वाले यांचे म्हणणे की, कराराची अट 22 डी.नुसार त्‍यांनी तक्रारदाराला लोणावळा येथे पर्यायी हॉलिडे रिसॉर्टची व्‍यवस्‍था करुन दिलेली होती. त्‍यांच्‍या हॉलिडे रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण झाल्‍यानंतर तक्रारदार त्‍यांचा उपभोग घेऊ शकतात. 1996-2004 पर्यत एकूण 63 दिवस तक्रारदार हॉलिडे रिसॉर्टची सुविधा घेऊ शकत होते. त्‍यापैकी 43 दिवस त्‍यांनी हॉलिडे रिसॉर्टची सुविधा घेतलेली आहे. व 1999 या वर्षासाठी त्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. याप्रमाणे त्‍यांनी 50 दिवसाची सुविधा घेतली आहे. तक्रारदाराने न घेतलेल्‍या सुविधांचे दिवस त्‍यांचे खाती जमा आहेत
6.    सामनेवाले यांचे म्‍हणणे की, मा.उच्‍च न्‍यायालयाची स्‍थगिती असल्‍यामुळे ते त्‍यांचे लोणावळा येथील हॉलिडे रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण करु शकले नाही. सदरहू बाब त्‍यांच्‍या नियंत्रणातील नव्‍हती. सा.वाले यांचे म्‍हणणे त्‍यांचे सेवेत न्‍यूनता नाही.
7.    सा.वाले यांचा असाही बचाव आहे की, तक्रारदार व सा.वाले यांच्‍यामध्‍ये झालेला सदरचा व्‍यवहार हा स्‍थावर मिटकतीत टाईम शेअर विकत घेण्‍याचा आहे. तक्रारदार व सा.वाले यांच्‍यात या करारातून वाद उद्भवलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार हा ग्राहक होत नाही. व सदरच्‍या मंचाला ही केस चालविता येत नाही. या कारणावरुन ही केस रद्दबातल करण्‍यात यावी.
8    सा.वाले यांचे तर्फे वकील श्री.रामदासन यांचा युक्‍तीवाद ऐकला. तोंडी युक्‍तीवादाचे वेळी तक्रारदारातर्फे कुणीही हजर नव्‍हते. आम्‍ही तक्रारदारांचा लेखी युक्‍तीवाद व कागदपत्रं वाचली.
9.    सा.वाले हे लोणावळा येथे हॉलीडे रिसॉर्टचे बांधकाम करु शकले नाहीत. याबद्दल सा.वाले यांना मान्‍य आहे. परंतु त्‍यांचे म्‍हणणे की, मा.उच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती दिलेली असल्‍यामुळे ते बांधकाम करु शकले नाहीत. सा.वाले हे रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण करु शकत होते, पण त्‍यांनी बांधकाम पूर्ण करण्‍यास निष्‍काळजीपणा केला असा आरोप तक्रारदार यांनी केलेला आहे. मा. उच्‍च न्‍यायालयाच्‍या स्‍थगितीवरुन सा.वाले बांधकाम पूर्ण करु शकले नाही, ही सामनेवाले यांच्‍या सेवेतील न्‍यूनता म्‍हणता येत नाही.
10.   तक्रारदार व सा.वाले यांच्‍यात झालेल्‍या करारानुसार तक्रारदाराला 1996 पासून लोणावळा येथे हॉलीडे रिसॉर्टची सुविधा मिळणार होती. मात्र सा.वाले यांच्‍या नियंत्रणाबाहेरील वरील परिस्थितीमुळे ते त्‍याचे बांधकाम पूर्ण करु शकले नाही. कागदपत्रावरुन असे दिसून येते की, सा.वाले यांचे स्‍वतःचे 14 हॉलीडे रिसॉर्ट होते व 18 इतर हॉलीडे रिसॉर्टशी त्‍यांचा आपसी करार होता व सा.वाले त्‍यांच्‍या सदस्‍यांना कंपनीच्‍या टाय-अप (Tie-up) हॉलीडे रिसॉर्टमध्‍येही निवासाची सोय उपलब्‍ध करुन द्यायचे.  1996 साली सा.वाले यांचे लोणावळा येते टाय-अप रीसॉर्ट उपलब्‍ध होते. परंतु तक्रारदारांनी ती सुविधा घेतली नाही. मात्र 1997 या वर्षी तक्रारदारांनी लोणावळा, पांचगणी व महाबळेश्‍वर येथे पर्यायी रिसॉर्टच्‍या सुविधा एकूण 14 दिवसासाठी घेतली. म्‍हणजे 1996 व 1997 या दोन्‍ही वर्षाची सुविधा घेतली आहे. 1998 या वर्षी तक्रारदारांनी मसुरी येथे पांच दिवसांची पर्यायी हॉलीडे रिसॉर्टची सुविधा घेतली आहे. 1999 या वर्षाची तक्रारदाराला ठरल्‍याप्रमाणे नुकसानभरपाई दिली आहे. लेखी युक्‍तीवादात सा.वाले यांनी म्‍हटले आहे की, सन 2000-2001 आणि 2002 या वर्षी  लोणावळा येथे पर्यायी हॉलीडे रिसॉर्टची व्‍यवस्‍था होती. परंतु तक्रारदारांनी घेतली नाही. 2003 पासून लोणावळा येथे सा.वाले यांनी भाडयाने  मालमत्‍ता घेतली होती व पर्यायी निवासाची व्‍यवस्‍था केली होती. 2004 मध्‍ये तक्रारदार मनाली येथील हॉलीडे रिसॉर्टमध्‍ये 24 दिवस राहीले. सन 1996 ते 2004 पर्यत तक्रारदार यांना दरवर्षी 7 प्रमाणे एकूण 63 दिवस हॉलिडे रिसॉर्टमध्‍ये राहण्‍याचा हक्‍क होता. त्‍यातील 43 दिवस त्‍यांनी लाभ घेतली व 7 दिवसांची नुकसान भरपाई घेतली. तक्रारदार यांचे हॉलिडे रिसॉर्टचे  राहिलेले दिवस त्‍यांच्‍या खाती जमा आहेत. काही वर्षी पर्यायी रिसॉर्ट उपलब्‍ध असूनही तक्रारदाराने त्‍याचा लाभ घेतला नव्‍हता.
11.   तक्रारदार व सा.वाले यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या करारातील संबंधित अट खालील प्रमाणे आहे. 
     In the unlikely event of the COMPANY not being in a position
to providethe apartment, the company may at its discretion   provide stay facilities generally equivalent to the Apartment,
in which event all clauses in this Agreement having any reference          to the Apartment and Holiday Resort shall be applicable to such    equivalent stay facilities.
 
वरील अट व या तक्रारीतील परिस्थिती लक्षात घेता सा.वाले यांच्‍या सेवेत न्‍यूनता दिसत नाही.
12.   सा.वाले यांनी कैफीयतीत मुद्दा उपस्थित केला की, तक्रारदार व सा.वाले यांच्‍यात झालेला व्‍यवहार स्‍थावर मालमत्‍तेतील टाईम शेअर खरेदीबाबत असल्‍याने या व्‍यवहारातून उत्‍पन्‍न झालेला वाद हा ग्राहक वाद होऊ शकत नाही. व अशा प्रकारच्‍या वादाचे निराकरण ग्राहक मंचाच्‍या कार्यकक्षेत येत नाही. त्‍यांनी या त्‍यांच्‍या मुद्याच्‍या पुष्टिसाठी मा.राष्‍ट्रीय आयोगाने खालील केसमध्‍ये दिलेल्‍या निकालावर त्‍यांची भीस्‍त ठेवली आहे.
       1)   दालमिया रिसॉर्ट इंटरनॅशनल (प्रा.) लि.
                     विरुध्‍द
           डॉ.रंजना गुप्‍ता व इतर.
     सदरहू निकाल मा.राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यांनी दिनांक 17/06/1996 मध्‍ये पहिले अपील क्र.719/93 मध्‍ये दिलेला आहे.
 2 )   किरीट पी. जोशी   
   विरुध्‍द
पंजाब टुरीझम डेव्‍हलपमेंट कार्पोरेशन लि.
     [ 1997 (I) ( C P R 77 ) ]    
           
            मात्र तोंडी युक्तिवाद झाल्‍यानंतर व निकाल देण्‍याचे अगोदर सा.वाले यांनी मा.राष्‍ट्रीय आयोगाचे पहिले अपील नंबर 163/1995 आणि 335/2002 तसेच रिव्‍हीजन पिटीशन नं. 1100/1998, 1216/2000 व 316/2000 यामध्‍ये दिनांक 08/05/2003 रोजी एकत्रित दिलेल्‍या निकालाची प्रत दाखल केली. त्‍यामध्‍ये मा.रास्‍ट्रीय आयोगाने त्‍यांनी वरील दालमीया रिसॉर्ट इंटरनॅशनल प्रा.लि.तसेच पंजाब टूरीझम डेव्‍हलपमेंट कार्पोरेशन लि. या केसेस मध्‍ये घेतलेला दृष्‍टीकोन, मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या सिव्‍हील अपील नं.120/03 के.एन.शर्मा वि. तोषाली रिसॉर्ट इंटरनॅशनल व इतर या केसमधील दिनांक 10/01/2003 रोजीचा निकाल विचारात घेऊन बदलविला व असे निरीक्षण केले की,      " प्रॉपर्टी टाईम शेअर " चा वाद हा ग्राहक मंचात दाखल करता येतो. मा.सर्वोच्‍च न्‍यायालय व मा.राष्‍ट्रीय आयोगाचा सदरचा दृष्‍टीकोन लक्षात घेता सा.वाले यांनी उपस्थित केलेला ग्राहक मंचाच्‍या अधिकार क्षेत्राबाबतचा मुद्दा नाकारण्‍यात येतो. या मंचास सदर तक्रार चालविण्‍याचा अधिकार आहे. मात्र तक्रारदारांनी सा.वाले यांचे सेवेत न्‍यूनता आहे किंवा त्‍यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे हे सिध्‍द केलेले नसल्‍याने सदरची तक्रार रद्द होण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
 
 
    
आदेश
 
 
1.    तक्रार क्र. 162/2004 रद्द बातल करण्‍यात येते.
2.    उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा.
 
3.   आदेशाच्‍या प्रमाणित प्रती दोन्‍ही पक्षकारांना विनामूल्‍य पाठविण्‍यात याव्‍या.

[HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. JUSTICE S P Mahajan] PRESIDENT