जिल्हा आयोगातील मा.सदस्याचे एक पद रिक्त.
मा.सदस्य श्री.स.व.कलाल रजेवर. आयोग अपुर्ण.
इंटरनेट सुविधा खंडीत.
दरखास्तदार स्वतः हजर. सामनेवाले आरोपी श्री.समीर झियाउद्दीन खान हजर. सामनेवाले यांचेसाठी वकील श्री.बळीराम कांबळे यांचेकडून वकील श्रीमती ज्योती गुप्ता अधिकारपत्रासह हजर.
सामनेवाले आरोपी श्री.समीर झियाउद्दीन खान यांना समन्स बजावणीबाबतचा अहवाल पोलिसांनी दाखल केला. सामनेवाले आरोपी श्री.समीर झियाउद्दीन खान हे आयोगात हजर झाले.
दरखास्तदार यांनी आज आयोगासमोर सांगीतले की, त्यांना सामनेवाले यांचेकडून दोन महिन्यांचे व्याज व रु.1000/- आयोगाने लावलेला दंड असे एकूण रु.2,000/- मिळणे बाकी आहे.
सामनेवाले आरोपी श्री.समीर झियाउद्दीन खान यांनी आज रोजी दरखास्तदार यांना रक्कम रु.2,000/- आयोगासमोर दिले.
दरखास्तदार यांनी सांगीतले की, त्यांना प्रकरणामधील वसुलीची रककम मिळाली असल्याने प्रकरण समाप्त करण्यात यावे.
दरखास्त प्रकरणात वसुली झाल्याने प्रकरण दरखास्तदार यांच्या विनंतीनुसार समाप्त करण्यात येते.
सामनेवाले आरोपी श्री.समीर झियाउद्दीन खान यांना मुक्त करण्यात येते. वैयक्तिक जात मुचलका रद्द करण्यात येतो. सामनेवाला आरोपीने जामिनाची रक्कम भरली असल्यास सामनेवाले आरोपी श्री.समीर झियाउद्दीन खान यांस परत करावी.
दरखास्तदार यांना एक सदस्य संच परत करण्यात आला.
प्रकरण समाप्त.