Maharashtra

Nagpur

CC/154/2019

SHRI AJAY NAMDEV SHINGRE - Complainant(s)

Versus

M/S SONY INDIA PVT LTD THROUGH DIVISIONAL HEAD - Opp.Party(s)

ADV UDAY KSHIRSAGAR

11 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/154/2019
( Date of Filing : 22 Feb 2019 )
 
1. SHRI AJAY NAMDEV SHINGRE
591, RAMNAGAR, MARARTOLI, NAGPUR 440033
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI PALLAB PRIMEN KRISHNA DATTA
SIDHHESH APARTMENT, PLOT NO 29, GANESH COLONY, PRATAPNAGAR, NAGPUR 440022
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S SONY INDIA PVT LTD THROUGH DIVISIONAL HEAD
002 GROUND FLOOR, MARVAH HOUSE, KRUSHNALAL MARVAH MARG, ANDHERI EAST MUMBAI 400072
MUMBAI
MAHARASHTRA
2. M/S FAIRDEAL ARKEDE THROUGH PROP. PARTNER
48, YASHWANT STADIUM, DHANTOLI, NAGPUR 440012
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 11 Jun 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्ता क्रमांक १ व २ हे दोघेही मिञ असुन तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी निर्मित केलेल्‍या सोनी ब्राव्हिया लेड टीव्‍ही मॉडेल नंबर केडीएल ४३ डब्‍ल्‍यु ८०० सी हा टीव्‍ही विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे कडुन दिनांक ७/११/२०१५ रोजी रुपये ६०,२००/- एवढ्या किंमतीत विकत घेतला. तक्रारकर्त्‍याने सदर टीव्‍ही विकत घेतल्‍यापासुन टीव्‍ही मध्‍ये बिघाड सुरु झाला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे माहे जुर्ले महिण्‍यात तक्रार केली. विरुध्‍द पक्षाने दुरुस्‍तीकरीता तंञज्ञ पाठविला व टीव्‍ही दुरुस्‍त केला परंतु त्‍यानंतर परत तोच ञास सुरु झाल्‍याने तक्रारकर्त्‍याने परत दिनांक ९/९/२०१६ विरुध्‍द पक्षाकडे टीव्‍ही बाबत तक्रार केली तसेच ईमेल व्‍दारे तक्रार केली असता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने दिनांक १४/०७/२०१७ रोजी तक्रारकर्त्‍याला पञ पाठवुन सदर टीव्‍ही मधील बी बोर्ड बदलवावा लागेल व त्‍यापोटी दुरुस्‍ती खर्च रुपये ४,९९५/- लागतील असे सांगितले. तक्रारकर्त्‍याने सदरचा टीव्‍ही वॉरंटी काळात असल्‍याने व त्‍यामध्‍ये निर्मिती दोष असल्‍यामुळे टीव्‍ही मोफत दुरुस्‍त करुन देण्‍याची विनंती केली परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी त्‍याबाबत कोणतेही सहकार्य करण्‍यास नकार दिला.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदरचा टीव्‍ही वॉरंटी कालावधीमध्‍ये असुन सुद्धा टीव्‍ही दुरुस्‍त करुन दिला किंवा बदलवुन दिला नाही. तसेच टीव्‍ही ची किंमत सुद्धा परत केली नाही ही सेवेमधील ञुटी आहे व तक्रारकर्त्‍याप्रती अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात यावी.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याचा टीव्‍ही तक्रारकर्त्‍याचे समाधान होईल असा सुधारुन द्यावा किंवा बदलवुन द्यावा किंवा सदरच्‍या टीव्‍ही ची किंमत रुपये ६०,०००/- विकत घेतल्‍याच्‍या तारखेपासुन म्‍हणजे दिनांक ७/११/२०१५ पासुन १८ टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याचे आदेशीत करावे.
  3. मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ३०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- देण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली व ती प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ मंचासमक्ष हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक १०/०७/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  1. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकूण घेतल्‍यावर खालिल मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.

      अ.क्र.                         मुद्दे                                                              उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                होय
  2. सदरची तक्रार ही मुदतीत आहे काय ?                                               नाही
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                      नाही
  4. काय आदेश ?                                                                     अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी निर्मित केलेल्‍या सोनी ब्राव्हिया लेड टीव्‍ही मॉडेल नंबर केडीएल ४३ डब्‍ल्‍यु ८०० सी हा टीव्‍ही विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे कडुन दिनांक ७/११/२०१५ रोजी रुपये ६०,२००/- एवढ्या किंमतीत विकत घेतला. तक्रारकर्त्‍यांनी निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजावरुन हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याने मंचाचे अभिलेखावर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे निर्दशनास आले की, तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या सोनी ब्राव्हिया लेड टीव्‍ही मॉडेल नंबर केडीएल ४३ डब्‍ल्‍यु ८०० सी ची वॉरंटी एक वर्षाची होती म्‍हणजे दिनांक ७/११/२०१६ पर्यंत होती. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वापरात असलेला टीव्‍ही खराब झाल्‍याबाबतची तक्रार विरुध्‍द पक्षाला माहे जुर्ले २०१६ ला केली व विरुध्‍द पक्षाने तक्रारीची दखल घेऊन तक्रारकर्त्‍याचा टीव्‍ही  दुरुस्‍त करुन दिला असे तक्रारीत तक्रारकर्त्‍याने नमुद केले आहे. परंतु त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला टीव्‍ही मध्‍ये दोष असल्‍याबाबतचा ईमेल दिनांक १७/११/२०१६ ला ४.३० वाजता केला. त्‍याअनुषंगाने विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक १४/७/२०१७ रोजी पञ पाठवुन त्‍यामधील बोर्ड बदलविण्‍याकरीता दुरुस्‍ती खर्च रुपये ४,९९५/- लागतील असे कळविले. तसेच विरुध्‍द पक्षाने वॉरंटी शर्तीनुसार एक वर्षाची निःशुल्‍क सेवा दिली आहे तसे पञात नमुद आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या  वापरात असलेल्‍या  सोनी ब्राव्हिया लेड टीव्‍ही   मॉडेल नंबर केडीएल ४३ डब्‍ल्‍यु ८०० सी ला वॉरंटी कालावधीमध्‍ये एक वर्षाची निःशुल्‍क  दिली असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतेही ञुटीपूर्ण सेवा दिली नसल्‍याचे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्त्‍यांनी दिनांक ७/११/२०१५ रोजी टीव्‍ही खरेदी केला आणि तक्रार दिनांक १६/२/२०१९ रोजी दाखल करण्‍यात आल्‍यामुळे सदरची तक्रार मुदतबाह्य आहे  व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍यांची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.