तक्रार क्रमांक – 459/2009 तक्रार दाखल दिनांक – 13/07/2009 निकालपञ दिनांक – 03/04/2010 कालावधी - 00 वर्ष 08 महिना 21 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. भालचंद्र बाळकृष्ण परब रा. योगीधाम कॉम्पलेक्स जवळ खोली नं.8, चाळ नं.17, त्रिमुर्ति कॉलनी, कल्याण (प). .. तक्रारदार विरूध्द मे.लोढा कन्सस्ट्रक्शन डोंबिवली भागीदारकी राजेंश एन लोंढा, 216, शहा अन्ड नाहर इस्टेट डॉ.इ.मोझेस रोड, वरळी, मुंबई-18. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा सौ.भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः-त.क तर्फे वकिल श्री.अशोक तुकाराम शिंदे वि.प एकतर्फा आदेश (पारित दिः 03/04/2010 ) मा. श्री. पी. एन. शिरसाट – सदस्य यांचे आदेशानुसार 1. तक्रारदाराने हि तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 12 अन्वये दाखल केली असुन त्यातील कथन संक्षिप्तपणे खालीलप्रमाणेः- तक्रारदार ह्यांनी दि.14/10/2002 रोजी चंद्रेश रिजेन्सी, डोंबिवली, कल्याण येथील एफ 404या नंबरची सदनिका विकत घेण्यासंबंधी विक्री करारनामा दस्त क्र.03293/2002 हा मुद्रांक फी भरुन नोंदणीकृत करण्यात आला. सदनिकेसंबंधी तक्रारदाराने विरुध्द पक्षकाराला रु.1,10,000/- एवढी रक्कम अदा करण्यात आली. तसेच तक्रारदाराने सदनिकेचा विक्री करारनामा व पंजिकरण करण्यासाठी मंद्रांक फी व नोंदणी फी प्रित्यर्थ रु.52,938/- एवढी रक्कम अदा करण्यात आली. तसेच तक्रारदाराने विरुध्द पक्षकारास एकंदर रु.1,62,938/- एवढी रक्कम दिल्यानंतर हि विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास वकिलमार्फत नोटिस पाठवुन रु.1,29,530/- एवढी रक्कम 7 दिवसाचे आत भरण्यास फर्माविले. परंतु तक्रारदारास वरील रक्कम देण्यासंबंधी पुरेशी संधी व वेळ विरुध्द पक्षकाराने न दिल्यामुळे अचाणकपणे तक्रारदारास रु.25,000/- व रु.20,000/- एकंदर रु.45,000/- एवढी रक्कम
.. 2 .. धनादेश नं.746398 व 746397 दिनांक 10/12/2007 व दिनांक 10/01/2008 ओरिएंटल बँकेद्वारे चुकिच्या नावाने दिले पाठविले व सदरच्या सदनिकेचा विक्री करारनामा रद्दबातल ठरविला. विरुध्द पक्षकाराने तक्रारदाराकडुन रु.1,10,000/- एवढी रक्कम स्विकारुनही व विक्री करारनामा पंजिकृत करुन त्या प्रित्यर्थ रु.52,938/- एकुन रक्कम रु.1,62,938/- एवढी रक्कम खर्च करुनही सदनिकेचा ताबा तर दिलाच नाही उलट विक्रीकरानामा रद्द करुन चुकिच्या नावे धनादेश दिल्यामुळे तक्रारदाराने वकिलामार्फत दिनांक 05/08/2008 रोजी नोटीस पाठविली. सदरची नोटिस विरुध्द पक्षकारास दि.27/09/2008 मिळाली. परंतु तक्रारदाराच्या तक्रारीची पुर्तता करण्यासंबंधी विरुध्द पक्षकाराने कोणतीही तसदी/दक्षता/ काळजी घेतली नाही. विरुध्द पक्षकाराच्या अशा तृटियुक्त व दोषपुर्ण सेवेमुळे दुःखी झाल्यामुळे तक्रारदाराने हि तक्रार दाखल केली व कथन केले की तक्रारीचे कारण दि.05/08/2008 जेव्हा नोटिस पाठविली तेव्हा घडली व सतत घडत आहे त्यामुळे तक्रार मुदतीच्या कायद्याच्य सिमेत आहे. सदनिका हि डोंबिवली, जिल्हा-ठाणे येथे स्थित असल्यामुळे या मंचाचे कार्यक्षेत्रामध्ये येते. सबब या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा पुर्ण अधिकार आहे. तक्रारदाराची प्रार्थना खालील प्रमाणेः- 1. तक्रारदाराने गुंतविलेली सदनिकेची रक्कम रु.1,62,938/- परत मिळावी 2. त्या रकमेवर 78,069/- एवढे व्याज द्यावे. 3. आर्थिक नुकसानी पोटी रु.1,00,000/- द्यावे. 4. मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- द्यावे. 5. तक्रार खर्च व न्यायिक खर्च रु.5,000/- द्यावे. वरील तक्रारीची मंचाची नोटिस निशाणी 5 वर विरुध्द पक्षकारास पाठविली व निशाणी 6 नुसार विरुध्द पक्षकारास नोटिस प्राप्त झाली. विरुध्द पक्षकारास नोटिस प्राप्त होऊनही विरुध्द पक्षकाराने नोटिसची कोणतीही दखल/दक्षता/काळजी घेतली नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द 'नो डब्ल्यु एस' 'काहीही म्हणणे नाही' असा आदेश पारित करण्यात आला. त्याप्रित्यर्थ तक्रारदाराने निशाणी 7 वर प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद व निशाणी 8 वर कागदपत्रे दाखल केले. सदर प्रकरण एकतर्फा आदेशासाठी ठेवण्यात आले. विरुध्द पक्षकाराने कोणतीही दखल न घेतल्यामुळे तक्रारदाराचे तक्रारीतील कथन, प्रतिज्ञापत्रे कागदपत्रे रक्कम स्विकारल्याची पावती व लेखी युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्मरितीने पडताळणी व अवलोकन केले असता न्यायिक प्रक्रियेसाठी एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो येणेप्रमाणेः- अ)विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये, त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय ? उत्तर – होय. कारण मिमांसा अ)स्पष्टिकरणाचा मुद्दाः- तक्रारदाराने विरूध्द पक्षकाराकडुन ''चंद्रेश रिजेन्सी'' डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील सदनिका नं. एफ 404 हि विकत घेण्यासंबंधी दस्त .. 3 .. क्र.03293/2002 नुसार मुद्रांक फी भरुन सदरचा विक्री करारनामा दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण येथे नोंदणीकृत करण्यात आला. सदरच्या सदनिकेच्या व्यवहारासंबंधी तक्रारदाराने रु.1,10,000/- व मुद्रांक व नोंदणी फि एकंदर सर्व रक्कम रु.1,62,938/- विरुध्द पक्षकाराचा दिले. विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास कोणतीही पुर्वसुचना न देता घाईघाई मध्ये वकिलामार्फत नोटिस पाठवुन रु.1,29,530/-एवढया रकमेची मागणी केली. त्या मागणीची तुर्तातुर्त व्यवस्था न झाल्यामुळे विरुध्द पक्षकाराने सदरचा सदनिकेचा व्यवहार विक्रीकरारनामा रद्द करण्यासंबंधी कळविले व व्यवहार रद्द करण्यासंबंधी तक्रारदारास चुकीच्या नावे रु.25,000/- धनादेश नं.746397 दि.10/12/2007 रोजी व रु.20,000/- धनादेश नं.746398 दि.10/01/2009 रोजी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स वर काढलेले श्री.बाळकृष्ण बालचंद परब या चुकीच्या नावावर पाठविले. तक्रारदाराचे खरे नाव श्री. भालचंद्र बाळकृष्ण परब असे आहे. विरुध्द पक्षकारास त्यासंबंधी पुर्ण माहिती आहे त्यासंबंधी विक्री करारनामा स्वयंस्पष्ट आहे. अशा प्रकारे चुकिच्या नावावर धनादेश देणे, प्रचंड रक्कम स्विकारुन सदनिकेचा ताबा न देणे बाकीची उर्वरित रक्कम तक्रारदार देण्यास तयार असुनही त्यांना पुर्वसुचना न देता तडकाफडकी वकिलामार्फत नोटिस पाठवुन उर्वरित रकमेची मागणी करणे. या सर्व कृती ह्या सेवेमध्ये त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा या सदरात मोडतात. विरुध्द पक्षकाराच्या वरील कृति न्यायोचित, विधीयुक्त व कायदेशीर वाटत नाहीत तसेच त्या कृति नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिकोनातुन ही अयोग्य व अन्यायाकारक आहेत. सबब विरुध्द पक्षकाराने सदरच्या सदनिकेचा विक्री करारनामा रद्द ठरविल्यामुळे तक्रारदाराने केलेली मागणी मान्य करणे विरुध्द पक्षकाराचे न्यायोचित कर्तव्य आहे. तक्रारदाराने सदरच्या सदनिकेचा व्यवहार हा 14/10/2002 रोजी केला तेव्हा सदनिकेच्या कमी किमतीच्या भावाने उपलब्ध होत्या परंतु आजच्या बाजारभावाप्रमाणे सदनिकेची किमती गगणाला भिडल्या आहेत. तरीही तक्रारदाराने आजच्या बाजारभावाप्रमाणे सदनिकेची किमतीची मागणी केली नाही. तक्रारदाराची तक्रारीतील प्रार्थना न्यायोचित व योग्य आहे असे या मंचास वाटते त्या प्रिर्त्यथ हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. अंतीम आदेश 1.तक्रार क्र.459/2009 हि मान्य करण्यात येत आहे. 2.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास सदनिकेची किंमत रु.1,62,938/-(रु.एक लाख बासष्ट हजार नौशे अडोतीस फक्त) त्वरीत अदा करावी. 3.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास व्याजापोटी रू.78,069/-(रु.अठयाहत्तर हजार एकोनसत्तर फक्त) द्यावे. 4.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास आर्थिक नुकसानीपोटी रु.25,000/-(रु.पंचवीस हजार फक्त) द्यावे
.. 4 .. 5.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास मानसिकनुकसानीपोटी रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त) द्यावे. 6.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास न्यायिक खर्च रु.3,000/-(रु.तीन हजार फक्त) द्यावा. 7.वरील आदेशाची अंमलबजावणी सही शिक्कयाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत परस्पर करावी (Direct Payment) अन्यथा आदेश पारीत तारखेपासुन वरील रकमेवर जादा दंडात्मक व्याज @3% द.सा.द.शे देय होईल. 8.वरील आदेशाची सांक्षाकित प्रत त्वरीत, निशुल्क पक्षकारास द्यावी. दिनांक – 03/04/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (श्रीमती भावना पिसाळ) (सौ. शशिकला श. पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|