मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई दरखास्त क्रमांक – 01/2011 मूळ तक्रार क्रमांक – 53/2008 आदेश दिनांक – 30/04/2011 श्री. पांडुरंग लक्ष्मण घाडगे, रा. अपोलियन निवास 4/5, इंदिरा गांधी नगर, कांजूरमार्ग (पूर्व), भांडूप, मुंबई 400 042. ....... अर्जदार/मूळ तक्रारदार विरुध्द
मेसर्स श्रेयस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, 112 शिवस्मृती एन एम जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई 400 013. ......... गैरअर्जदार/मूळ सामनेवाले समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती - उभयपक्ष हजर
- आदेश - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत दरखास्त प्रकरण तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अंतर्गत गैरअर्जदार मेसर्स श्रेयस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांचेविरुध्द दाखल केलेले आहे. तक्रारदार स्वतः हजर होते, गैरअर्जदारातर्फे अशोक रेडकर हजर. सदर प्रकरणी तक्रारदार व गैरअर्जदार यांनी संयुक्तीक पुरसिस दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी आदेशाप्रमाणे तक्रारदाराला डीमांड ड्राफ्ट दिलेला आहे व उभयपक्षांमध्ये आता कोणताच वाद शिल्लक राहीलेला नाही. मंचाने तक्रारदाराला विचारणा केली असता त्यांनी सदर वाद हा आपसी तडजोडीने मिटलेला आहे असे नमूद केले आहे. सबब सदर दरखास्त प्रकरणी ही पुरसिस दाखल केल्यामुळे व त्यांचा वाद संपृष्टात आल्यामुळे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. - अंतिम आदेश - 1) तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामधील वाद आपसी तडजोडीने सोडविल्यामुळे प्रस्तुत दरखास्त निकाली काढण्यात येते. 2) उभयपक्षांनी आपापला खर्च सोसावा. दिनांक – 30/04/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई एम.एम.टी./- |