Maharashtra

Nagpur

CC/581/2018

SMT. MEENA MURLIDHAR NIPANE - Complainant(s)

Versus

M/S SHREE NAVNATH CONSTRUCTIONS, THROUGH DIRECTOR & AUTHORIZED SIGNATORY, RAJENDRA BHASKARRAO NINAWE - Opp.Party(s)

ADV. D.P. SHOUCHE

07 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/581/2018
( Date of Filing : 27 Sep 2018 )
 
1. SMT. MEENA MURLIDHAR NIPANE
R/O. FLAT NO. 101, HIND SWAMI SAMARTH APARTMENT, GODHANI ROAD, ZINGABAI TAKLI, NAGPUR-440030
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S SHREE NAVNATH CONSTRUCTIONS, THROUGH DIRECTOR & AUTHORIZED SIGNATORY, RAJENDRA BHASKARRAO NINAWE
OFF. AT, 255/4, GANESH CHAMBRS, LAXMI NAGAR, NAGPUR-22/ DATTATRAYANAGAR, NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 07 Feb 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा-श्री. एस.आर. आजने,मा.सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे मौजा झिंगाबाई टाकळी, प्‍लॉट नंबर १-सी, खसरा नंबर ३४/१, ३५/५, ३४/९ आणि ३४/१० या भुखंडावर  उभारलेल्‍या  हिंदस्‍वामी समर्थ अपार्टमेंट गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी नागपूर मधील सदनिका क्रमांक १०१, एकुण क्षेञफळ ९१ चौ.मी. एकूण रुपये १२,२१,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा विरुध्‍द पक्षाशी दिनांक १५/६/२००७ रोजी रजिस्‍टर्ड विक्री करारनामा करण्‍यात आला व त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याने रुपये ४९,७६०/- एवढी स्‍टॅम्‍प ड्युटी भरली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला धनादेश व्‍दारे दिनांक १/२/२००७ ते ३०/०६/२००८ या कालावधीत एकुण रक्‍कम १२,५४,३१०/- अदा केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला संपूर्ण रक्‍कम अदा करुनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला अपूर्ण बांधकाम असलेल्‍या सदनिकेचा ताबा दिनांक २७/४/२००८ रोजी दिला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे बांधकाम त्‍वरीत पूर्ण करण्‍याचे कबुल केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे शब्‍दावर विश्‍वास ठेवुन व तक्रारकर्त्‍याला सदनिकेची राहण्‍याकरीता आवश्‍यकता असल्‍याने सदनिकेचा ताबा स्विकारला परंतू विरुध्‍द पक्षाला विनंती करुनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला स‍दनिकेचे विक्रीपञ करुन दिले नाही. तक्रारकर्त्‍याने दिनांक ३०/०५/२०१८ ला विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस बजावली व त्‍याव्‍दारे सदनिकेचे विक्रीपञ करुन देण्‍याची मागणी केली परंतु विरुध्‍द पक्षाला नोटीस मिळुनही त्‍याने उत्‍तर दिले नाही. करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे विक्रीपञ करुन न दिल्‍यामुळे विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला ञुटीपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला स‍दनिकेचे विक्रीपञ करुन द्यावे व मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये ४,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५०,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍दपक्षाला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली व स्‍थानिक वर्तमानपञातुन जाहिर नोटीस पाठवुनही विरुध्‍द पक्षकार मंचात हजर झाले नाही करीता मंचाने विरुध्‍दपक्ष विरुध्‍द दिनांक ९/८/२०१९ ला एकतर्फी आदेश पारित केला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

 

  1. अ.क्र.        मुद्दे                                                                  उत्‍तर
  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवादिली काय ?         होय
  3. काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

कार‍णमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे मौजा झिंगाबाई टाकळी, प्‍लॉट नंबर १-सी, खसरा नंबर ३४/१, ३५/५, ३४/९ आणि ३४/१० या भुखंडावर  उभारलेल्‍या  हिंदस्‍वामी समर्थ अपार्टमेंट गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी नागपूर मधील सदनिका क्रमांक १०१, एकुण क्षेञफळ ९१ चौ.मी. एकूण रुपये १२,२१,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा विरुध्‍द पक्षाशी दिनांक १५/६/२००७ रोजी रजिस्‍टर्ड विक्री करारनामा करण्‍यात आला व त्‍यापोटी  तक्रारकर्त्‍याने रुपये ४९,७६०/- एवढी स्‍टॅम्‍प ड्युटी भरली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला धनादेश व्‍दारे दिनांक १/२/२००७ ते ३०/०६/२००८ या कालावधीत एकुण रक्‍कम १२,५४,३१०/- अदा केली. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक आहे. विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन सदनिकेच्‍या खरेदीपोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुन सुद्धा तक्रारकर्त्‍याला वादातील सदनिकेचे विक्रीपञ नोंदणी करुन दिले नाही ही विरुध्‍दपक्षाची तक्रारकर्ताप्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍दपक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला मौजा झिंगाबाई टाकळी, प्‍लॉट नंबर १-सी, खसरा नंबर ३४/१, ३५/५, ३४/९ आणि ३४/१० या भुखंडावर  उभारलेल्‍या हिंदस्‍वामी समर्थ अपार्टमेंट गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी नागपूर मधील सदनिका क्रमांक १०१, एकुण क्षेञफळ ९१ चौ.मी. या वादातील सदनिकेचे विक्रीपञ करुन द्यावे. विरुध्‍द पक्षाने विक्रीपञ नोदंणी करतेवेळी येणारा कायदेशीर खर्च करावा.
  3. विरुध्‍दपक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.