मा.अध्यक्ष रजेवर.
तक्रारदारांतर्फे ॲङ सपना पांडे हजर. त्यांचा तक्रार दाखल सुनावणीकामी युक्तीवाद ऐकण्यात आला.
तक्रारीचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे नोंदणी केलेल्या सदनिकेचा ताबा देण्याची मागणी केली असून, तक्रारदारांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र.3 मध्ये नमुद केल्याप्रमाणे सदरच्या सदनिकेची ठरलेली एकुण किंमत रु.19,37,000/- (अक्षरी रुपये एकोणवीस लाख सदतीस हजार फक्त) अशी आहे. याशिवाय रु.1,00,000/- (रूपये एक लाख फक्त) नुकसानभरपाई व खर्चाची मागणी केली आहे.
सबब, तक्रारदारांनी प्रस्तुतच्या तक्रारीद्वारे केलेली एकुण मागणी रु.20,00,000/- (अक्षरी रुपये वीस लाख फक्त) पेक्षा जास्त म्हणजेच ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 11 (1) मधील तरतुदींनुसार या मंचाच्या आर्थिक कार्यक्षेत्राबाहेर असल्याने, प्रस्तुतची तक्रार आर्थिक कार्यक्षेत्राअभावी या मंचास चालविण्याचा अधिकार नाही.
सबब, प्रस्तुतची ग्राहक तक्रार क्र.315/2019 दाखल करुन न घेता दाखल टप्प्यावर तक्रारदारांना योग्य त्या आयोग / मंचासमोर दाखल करण्याची मुभा देऊन दिवाणी प्रक्रिया संहिता, 1908 च्या ऑर्डर 7 रुल 10 नुसार परत करण्यात येते.
प्रकरण समाप्त.
प्रकरणांत हाच अंतिम आदेश समजण्यात यावा.
तक्रारदारांना मुळ तक्रार व एक अतिरीक्त संच परत करण्यात यावा तसेच आदेशाची साक्षांकित प्रत पाठविण्यात यावी.