Maharashtra

Nagpur

CC/435/2021

SHRI. RAJENDRA TULSHIRAMJI SHINDE - Complainant(s)

Versus

M/S SHREE LAXMI BALAJI DEVELOPERS & BUILDERS, THROUGH PROPRIETOR, SHRI. ASHOKSINGH VASANTSINGH CHAUH - Opp.Party(s)

ADV. R.D. KHOBRAGADE

22 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/435/2021
( Date of Filing : 06 Aug 2021 )
 
1. SHRI. RAJENDRA TULSHIRAMJI SHINDE
R/O. PLOT NO. 56, OLD SUBHEDAR LAYOUT (EXTENSION), NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S SHREE LAXMI BALAJI DEVELOPERS & BUILDERS, THROUGH PROPRIETOR, SHRI. ASHOKSINGH VASANTSINGH CHAUHAN
OFF AT. PLOT NO. 65, GAJANAN NAGAR, CHITALE BUNGLOW, NEAR TAMBE HOSPITAL, WARDHA ROAD, NAGPUR-440018
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. ASHOKSINGH VASANTSINGH CHAUHAN
R/O. GURU KRUPA, PLOT NO.31, SNEHA NAGAR, NAGPUR-440015
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 22 Apr 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम ३५(1) नुसार दाखल केलेली आहे.
  2. तकारदाराने वि.प. यांनी मौजा-वानाडोंगरी ख.क्रं. 87,88,89 आणि 91 प.ह.नं.46 तह.-हिंगणा, जिल्हा-नागपूर या शेतजमीनीवर पाडलेल्या इंजिनिअर्स कॉलनी या लेआऊट मधील भुखंड क्रं. 14 एकुण क्षेत्रफळ 1775 चौ.फुट,रुपये 350/-प्रती चौ.फुट दराने एकुण रुपये 6,21,250/- इतक्या रक्कमेत विकत घेण्‍याचा तोंडी करार वि.प.शी केला व त्यापोटी तक्रारदाराने वि.प.ला धनादेशाव्दारे एकुण रुपये 2,11,000/- वेळोवेळी अदा केले. तक्रारदाराने वि.प.ला विक्रीपत्र करारनाम्याबाबत विचारण केली असता वि.प.ने काही दस्तऐवज तयार व्हायचे असल्याचे सांगीतले व त्याची पूर्तता होताचा विक्रीपत्र करारनामा करुन देण्‍याचे आश्‍वासित केले.
  3. तक्रारकर्ता भुखंड खरेदीपोटी उर्वरित रक्कम अदा करण्‍यास तयार असुन सुध्‍दा वि.प. उर्वरित रक्कम स्वीकारुन विक्रीपत्र नोंदणी करुन देण्‍याचे टाळीत होता. तक्रारदाराने वि.प.ला विक्रीपत्रास लागणा-या आवश्‍यक दस्तऐवजांची पूर्तता तूर्तास होणे शक्य नसल्यास विक्रीपत्र करारनामा करण्‍याचे सुचविले परंतु वि.प.ने विक्रीपत्र करण्‍याची गरज नसुन विक्रीपत्र नोंदणी करुन देत असल्याचे सांगीतले. वि.प. ने भुखंड विक्रीपोटी केलेल्या तोंडी करारानुसार शर्ती व अटींचे पालन न केल्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 29.6.2021 ला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही. करिता तक्रारदाराने आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. 1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन वि.प.ने तक्रारदाराला अनुचित व्यापार पध्‍दीतीचा अवलंब केल्याचे घोषित करावे.तसेच वि.प.क्रं.1 व 2 यांनी तक्रारदाराकडुन उर्वरित रक्कम स्वीकारुन भारतरत्न अभियंता डॉ.मोकशागुड्डम विश्‍वेश्‍वरया इंजिनिअर्स कॉलनी ले-आऊटच्या दस्तऐवजांची पूर्तता करुन तक्रारदाराला भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे. किंवा वि.प.ला निर्देशीत करण्‍यात यावे की, वि.प.ने तक्रारदाराकडुन भुखंड विक्रीपोटी घेतलेली रक्कम रुपये 2,11,000/- तक्रारदाराला द.सा.द.शे  24टक्के व्याजासह रक्कम स्वीकारल्याचे तारखेपासुन परत करावे. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी खर्च व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  4. वि.प.क्रं.1 ला स्थानिक वर्तमानपत्रातुन दिनांक 15.2.2022 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली. परंतु नोटीस मिळुनही वि.प.क्रं.1 तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचेविरुध्‍द दिनांक 23.3.2022 रोजी तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  5. विरुध्द पक्ष क्रं.2 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविण्यात आली परंतु सदर नोटीस मिळूनही वि.प.क्रं.2आयोगा समक्ष हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार त्यांच्या विरुध्‍द एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 10.11.2021.
  6. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

                 मुद्दे                                                                    उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिल काय ?                 होय
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय?            होय
  4. काय आदेश                                                                अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तकारदाराने वि.प. यांचे मौजा-वानाडोंगरी येथील खसरा क्रं. 87,88,89 आणि 91 प.ह.नं.46 तह.-हिंगणा, जिल्हा-नागपूर या शेतजमीनीवर पाडलेल्या इंजिनिअर्स कॉलनी या लेआऊट मधील भुखंड क्रं. 14, एकुण क्षेत्रफळ 1775 चौ.फुट,रुपये 350/- प्रती चौ.फुट दराने एकुण रुपये 6,21,250/-इतक्या रक्कमेत विकत घेतण्‍याचा तोंडी करार वि.प.शी केला व त्यापोटी तक्रारदाराने वि.प.ला धनादेशाव्दारे एकुण रुपये 2,11,000/- वेळोवेळी अदा केल्याचे नि.क्रं.2 वरील दस्तऐवजावरुन स्पष्‍ट होते. तसेच तक्रारदाराने दिनांक 13.4.2022 रोजी अभिलेखावर दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केल्यावर हे सिध्‍द होते की ,तक्रारकर्ता व वि.प. यांचेमधे भुखंड खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला आहे.वि.प.ने मौजा-वानाडोंगरी खसरा क्र. 87,88,89, व 91 या शेतजमीनीवर पाडलेल्या भारतरत्न अभियंता भारतरत्न अभियंता डॉ.मोकशागुड्डम विश्‍वेश्‍वरया इंजिनिअर्स कॉलनी, या ले-आऊटची शेतजमीन वि.प.चे नावावर नाही.  तसेच वि.प.ने तक्रारदाराशी केलेल्या तोंडी करारानुसार भुखंड विक्रीपोटी रुपये 2,11,000/- एवढी रक्कम स्वीकारुन आवश्‍यक शासकीय मंजूरात घेतली नाही व दस्तऐवजाची पुर्तता न करता तक्रारदाराला भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही किंवा तक्रारदाराचे मागणी नुसार तक्रारदाराकडुन भुखंड विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कमही परत केली नाही ही वि.प.ची तक्रारदाराचे प्रती त्रुटीपूर्ण सेवा आहे आणि असुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब असल्याचे स्पष्‍ट होते. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी मिळकतीचे विकसन करुन भूखंड तयार करण्याचे वचन दिलेले आहे आणि त्यासाठी प्रस्तावित ले-आऊटचा नकाशा तक्रारदाराला दिलेला आहे. म्हणुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या M/s. Narne Construction P.Ltd. Etc. Union of India and Ors. II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्तुत प्रकरण चा‍लविण्याचे अधिकार आहे. मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्या न्यायनिवाडयातील Soumitra Kumar Shaw  Vs. Lokhandwala Kataria Constructions Pvt.Ltd. ,2019 NCJ 517(NC) व Pratima Rajpal and Anr. Parsvnath Developers Ltd. 2019  NCJ  903 (NC)या न्यायनिवडयातील वस्तुस्थीती सदर प्रकरणात लागू होते.सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.1 व 2 ला आदेशीत करण्‍यात येते, त्यांनी तक्रारदाराकडुन भुखंडाचे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 2,11,000/-, दिनांक 12.7.2012 पासुन द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो परत करावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रं.1 व 2 ने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.