जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर तक्रार क्र. 634/2009 दाखल दिनांक - 22/09/2009 निकालपञ दिनांक - 28/07/2010 कालावधी - 10 महिने 06 दिवस श्री. मोहम्मद अंसारी इब्राहिम अंसार साईबाबा नगर, सतरस्ता, धोबी घाट, मुंबई 400 011. .. तक्रारकर्ता विरूध्द मे. शिव साई ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शन शॉप नं.8, वाडेकर चाळ, शिवाजी नगर, सिंपोली, बोरीवली(पश्चिम), मुंबई 400 692 .. विरुध्द पक्षकार समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्री.पी.एन.शिरसाट - मा. सदस्य उपस्थिती - उभयपक्षकार हजर आदेश (दिः 28/07/2010 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकर्त्याचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणेः- नालासोपारा येथे विरुध्द पक्ष विकसीत करणार असलेल्या इमारतीतील एक खोली रक्कम रु.1,00,000/- ला विकत घेण्याचे तक्रारकर्त्यानी निश्चित केले. दि.27/05/2009 रोजी रक्कम रु.40,000/- विरुध्द पक्षाला दिले. त्या तारखेची पावती विरुध्द पक्षानी दिली. मागणी करुनही करारनामा नोंदवुन दिला नाही. राहिलेली रक्कम देण्यास तक्रारकर्ता तैयार होता. जागेचा ताबा विरुध्द पक्षाने त्याला दिला नाही. पुलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आली. त्यावेळेस विरुध्द पक्षानी रक्कम रु.40,000/- परत करण्याचे कबुल केले व तक्रारकर्त्याच्या सासुच्या नावाने या रकमेचा धनादेश दिला. मात्र 'स्टॉप पेमेंट' अशा शे-यासह हा धनादेश वटला नाही हि बाब विरुध्द पक्षाच्या निदर्शनास आनुनही त्याने रक्कम परत केले नसल्याने प्रार्थनेत नमुद केल्याप्रमाणे 24%व्याजासह रक्कम परत मिळावी तसेच नुकसान भरपाई व न्यायीक खर्च मिळावे या उद्देशाने हि तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या समर्थनार्थ निशाणी 2 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. निशाणी 3(1) व 3(2) अन्वये कागदपत्र दाखल करण्यात आले आहे. या दि.27/05/2009 रोजीची पावती पुलीस ठाण्याला पाठविलेली प्रत व नवटता परत आलेला धनादेश यांचा समावेश आहे.
2. मंचाने विरुध्द पक्षाला हजेरीसाठी व जबाब दाखल करण्यासाठी नोटिस पाठविली. विरुध्द पक्ष दिलेल्या पत्यावर रहात नाही अशा शे-यासह नोटिस परत आली त्यामुळे निशाणी 8 अन्वये कोकण सकाळच्या वृत्तापत्रात नोटिस प्रसिध्द करण्यात आली. विरुध्द पक्ष हा गैरहजर राहिल्याने ग्राहक कायद्याचे 13(2)(ब)(II) .. 2 .. (त.क्र.634/2009) अन्वये सदर प्रकरण एकतर्फी सुनावणीच्या आधाराने निकाली काढण्याचे मंचाने निश्चित केले.
3. मंचाने तक्रारकर्त्याचे म्हणणे प्रतिज्ञापत्र तसेच त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार केला त्या आधारे खाली प्रमुख मुद्दे विचारात घेण्यात आले. 1.विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याला पुरविलेल्या सेवेतील त्रृटीसाठी जबाबदार आहेत काय? उत्तर - होय. 2.तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडुन परतावा रक्कम व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे काय? उत्तर - होय. 3.तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडुन नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहे काय? उत्तर - होय स्पटीकरणाचा मुद्दा क्र. 1 चे संदर्भातः- मुद्दा क्र. 1 चे संदर्भात विचार केले असता असे येते की तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष बांधकाम करणार असलेल्या नालासोपारा येथील इमारतीतील खोली विकत घेण्यासाठी तोंडी करार केला. त्याचे प्रतिज्ञापत्राच्या आधारे असे स्पष्ट होते की रु.1,00,000/- किंमत ठरली होती त्यापैकी रक्कम रु.40,000/- रकमेची पावती दि.27/05/2009 रोजी विरुध्द पक्षाने त्याला दिलेली आहे. उरलेली रक्कम द्यावयास तो तैयार होता मात्र विरुध्द पक्षाने जागेचा करारनामा त्याचे नावाने करुन दिला नाही अथवा राहिलेली रक्कम देऊन त्याला ताबाही दिलेला नाही त्यामुळे विरुध्द पक्ष हा ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कलम 2(1)(ग) अन्वये सदोष सेवेसाठी जबाबदार ठरतो. स्पटीकरणाचा मुद्दा क्र. 2 चे संदर्भातः- मुद्दा क्र. 2 चे संदर्भात विचार केले असता मंचाच्या निदर्शनास येते की रक्कम रु.40,000/- ही रक्कम त्याने विरुध्द पक्षाला खोली विकत घेण्यासाठी दिली. दि.27/05/2009 पासुन हि रक्कम विरुध्द पक्षाकडे कोणत्याही संयुक्तिक कारणामुळे अडकुन पडलेली आहे व ताबा हि दिला नाही. अश्या स्थितीत न्यायाचे दृष्टिने विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला घेतलेली रक्कम परत करणे आवश्यक होते सबब मंचाच्या मते विरुध्द पक्षाकडुन रक्कम रु.40,000/- परतावा रक्कम 18 % व्याजासह मिळण्यास पात्र आहे. स्पटीकरणाचा मुद्दा क्र.3 चे संदर्भातः- मुद्दा क्र.3 चे संदर्भात विचार केले असता असे स्पष्ट होते की, विरुध्दपक्षाच्या दोषपुर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसानच झाले नसुन मोठया प्रमाणात मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. रक्कम रु.40,000/- त्यांनी ज्या उद्देशाने दिली तो उद्देश पुर्ण होऊ शकलेला नाही. सबब तक्रारकर्ता हा रक्कम रु.40,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तसेच त्याच्या योग्य मागणीची दखल न घेता रु.2,000/-न्यायिक खर्च मिळाण्यास पात्र आहेत. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो-
.. 3 .. (त.क्र.634/2009) अंतीम आदेश 1 तक्रार क्र. 634/2009 हि मंजुर करण्यात येत आहे. 2.आदेश पारित तारखेपासुन 45 दिवसाचे आत विरुध्द पक्षकाराने तक्रारर्त्याला रक्कम रु.40,000/- (रु. चाळीस हजार फक्त) हि रक्क्म दि.27/05/2009 पासुन ते आदेश तारखेपर्यंत 18 % व्याजासह परत करावी असुविधा व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 4,000/-(रु.चार हजार फक्त) द्यावे. 3.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास रु.2,000/- (रु.दोन हजार फक्त) न्यायीक खर्च द्यावा. 4.विहित मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालण विरुध्द पक्षकाराने न केल्यास उपरोक्त सर्व रक्कमेवर तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडुन आदेश पारित तारखेपासुन रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे 18% व्याज वसुल करण्यास पात्र राहतील.
दिनांक – 28/07/2010 ठिकाण - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (श्री.एम.जी.रहाटगावकर) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|