Complaint Case No. CC/217/2020 | ( Date of Filing : 06 Jul 2020 ) |
| | 1. SMT USHADEVI PUSARAM BALDUVA | DR AMBEDKAR CHOWK, C.A. ROAD, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S SEVEN HILS REAL ESTATE PVT LTD THROUGH DIRECTOR MANAGER SMT SHAKUNTALA S.S. URFA SHYAMSUNDER SHARMA | PLOT NO 145, AJANI LAYOUT, HINDUSTHAN COLONY, NAGPUR PLOT NO 145, NEAR MADHAV NETRALAYA, WARDHA ROAD, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष हा "सेवन हिल्स रिअल इस्टेट प्रा.लि." या नावाने व्यवसाय करतो. तक्रारकर्तीचा पती पुसाराम हरनारायण बल्दुवा याने विरुध्द पक्षाच्या मौजा – भरतवाडा, प.ह.नं. 17, खसरा क्रं. 26, तह. जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 10 , सप्तगिरी जनरल मार्केट या नावांने बांधलेल्या अपार्टमेंट मधील दुकान क्रं. 21, एकूण रक्कम रुपये 1,08,500/- मध्ये विकत घेण्याकरिता अग्रिम राशी म्हणून रुपये 5,000/- दिनांक 25.12.1989 रोजी अदा केले होते आणि उर्वरित रक्कम हप्त्याने देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे तक्रारकर्तीच्या पतीने विरुध्द पक्षाकडे रक्कम जमा केल्यानंतर वि.प.ने दि. 19.12.1990 रोजी सह दुय्यम निबंधक, नागपूर शहर क्रं. 1 यांच्या समक्ष अनु.क्रं. 15590 प्रमाणे रजिस्टर्ड विक्रीचा करारनामा व अनु.क्रं. 15591 प्रमाणे अॅग्रीमेंट ऑफ बिल्डींग कन्स्ट्रक्शन (इमारत बांधकामाचा करारनामा) रजिस्टर्ड करुन दिला आहे.
- तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, तिने विरुध्द पक्षाकडे अनेक वेळा उपरोक्त दुकानाचे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्याची विनंती केली असता शासकीय अडचणीमुळे विक्रीपत्र करुन देऊ शकत नसल्याचे विरुध्द पक्षाने सांगितले. या दरम्यान तक्रारकर्तीच्या पतीचे हृदयविकाराने दि. 23.09.2007 रोजी निधन झाल्यामुळे तक्रारकर्ती वारसदार या नात्याने तिने विरुध्द पक्षाकडे पुनश्च विक्रीपत्र करुन देण्याकरिता विनंती केली होती. परंतु विरुध्द पक्षाने आजतागायत तक्रारकर्तीच्या नांवे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही व दुकानाचा प्रत्यक्ष ताबा सुध्दा दिलेला नाही. परंतु विरुध्द पक्षाने त्याच अपार्टमेंट मधील इतर काही खरेदीदारांच्या नांवे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून त्यांना दुकानाचा प्रत्यक्ष ताबा दिलेला आहे. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या नांवे दुकानाचे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून दिले नाही किंवा दि. 19.12.1990 रोजी करण्यात आलेले दोन्ही करार सुध्दा रद्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला दि. 01.06.2020 रोजी वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती, परंतु विरुध्द पक्षाने सदरची नोटीस घेण्यास नकार दिल्यामुळे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन तक्रारीत मागणी केली की, विरुध्द पक्ष यांनी दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्याचे घोषित करावे. त्याचप्रमाणे विरुध्द पक्षाने उपरोक्त दुकान क्रं. 21 चे तक्रारकर्तीच्या नांवे कायदेशीररित्या विक्रीपत्र नोंदवून द्यावे व दुकानाचा प्रत्यक्ष ताबा द्यावा. अथवा उपरोक्त दुकानाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास कायदेशीर / तांत्रिक दृष्टया अडचण असल्यास विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्या पतीकडून दुकाना पोटी स्वीकारलेली रक्कम आजच्या बाजारभावाप्रमाणे परत करावी आणि शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्याचा ही आदेश द्यावा.
- विरुध्द पक्ष यांनी आपल्या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्ती ही कधीही विरुध्द पक्षाला भेटली नाही व ती पुसाराम हरनारायण बल्दुवा यांची पत्नी असल्याबाबतचा कुठलाही कागदोपत्री पुरावा तिने दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक नाही. तसेच पुसाराम बल्दुवा यांनी एक ही मासिक किस्त भरलेली नसल्याने त्यांच्या नांवे दुकानाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याचे अथवा दुकानाचा ताबा देण्याचा प्रश्नच उद्ध्भवत नाही. त्याचप्रमाणे पुसाराम बल्दुवा यांनी त्यांच्या हयातीत कधीही दुकानाचे कायदेशीर विक्रीपत्र नोंदवून देण्याची मागणी केली नाही. तसेच तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला दि. 01.04.2020 रोजी नोटीस पाठविली असल्याची बाब नाकारली आहे. परंतु दि. 01.06.2020 रोजी पाठविलेली नोटीस दि. 13.06.2020 ला प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्षाने सदरच्या नोटीसला दि.29.06.2020 ला उत्तर दिले आहे व ही बाब तक्रारकर्तीने आयोगापासून लपविली आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडून पैसे उगळण्याच्या उद्देशाने खोटी तक्रार दाखल केली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला कुठलीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तसेच पुसाराम बल्दुवा यांनी दुकान क्रं. 21 हा व्यवसाय करण्याकरिता विकत घेण्याचा करार केला होता, त्यामुळे सदरचा व्यवहार हा वाणिज्य स्वरुपाचा असल्यामुळे ग्राहक या संज्ञेत येत नाही. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार विहीत मुदतीत दाखल केली नसून ती मुदतबाहय असल्याने खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- उभय पक्षाने दाखल केलेले दस्तावेज, त्यांच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतले असता आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
1 तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय - विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित
व्यापार पध्दतीचा अवलंब केला काय? होय - काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्तीच्या पतीने विरुध्द पक्षाच्या मौजा – भरतवाडा, प.ह.नं. 17, खसरा क्रं. 26, तह. जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 10 , सप्तगिरी जनरल मार्केट या नावांने बांधलेल्या अपार्टमेंट मधील दुकान क्रं. 21 G+M हा एकूण किंमत रुपये 1,08,500/- मध्ये विकत घेण्याचा दिनांक दि. 19.12.1990 रोजी सह दुय्यम निबंधक, नागपूर शहर क्रं. 1 यांच्याकडे अनु.क्रं. 15590 प्रमाणे रजिस्टर्ड विक्रीचा करारनामा व अनु.क्रं. 15591 प्रमाणे अॅग्रीमेंट ऑफ बिल्डींग कन्स्ट्रक्शन (इमारत बांधकामाचा करारनामा) करण्यात आला होता हे नि.क्रं. 2 (1 व 2 ) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्तीच्या पतीने विरुध्द पक्षाकडे रक्कम जमा केली होती व उभय पक्षात सदरच्या दुकानाबाबतचा करार झालेला होता हे दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्तीच्या वकिलांनी दाखल केलेले तक्रारकर्तीच्या आधार कार्डवर तिचे नांव उषा देवी पुसाराम बल्दुआ असे नमूद असल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारकर्ती पुसाराम हरनारायण बल्दुआ याची विधवा या नात्याने वारसदार असल्याने तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक असल्याचे सिध्द होते.
- विरुध्द पक्षाने आपल्या कथनाच्या समर्थनार्थ तक्रारकर्ती ही पुसाराम हरनारायण बल्दुवा यांची पत्नी नसल्याबाबतचा कुठलाही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या पतीकडून दुकान विक्री पोटी एकूण रक्कम रुपये 12,000/- स्वीकारली असल्याची बाब अॅग्रीमेंटमध्ये नोंदविली असल्याचे दिसून येते. तक्रारकर्ती उर्वरित रक्कम देण्यास तयार असतांना सुध्दा वि.प. जाणूनबुजून टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते, अशा प्रकारे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असल्याचे स्पष्ट होते.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीकडून दुकाना पोटी उर्वरित असलेली रक्कम रुपये 96,500/- स्वीकारुन तक्रारकर्तीच्या नांवे मौजा – भरतवाडा, प.ह.नं. 17, खसरा क्रं. 26, तह. जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 10, सप्तगिरी जनरल मार्केट या नावांने बांधलेल्या अपार्टमेंट मधील दुकान क्रं. 21, G+M चे कायदेशीररित्या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन जागेचा प्रत्यक्ष ताबा द्यावा. तसेच दुकानाचे विक्रीपत्र नोंदणीचा खर्च तक्रारकर्तीने सोसावा.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्तीला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |