Maharashtra

DCF, South Mumbai

MA/22/26

MR SAGAR GAUTAM KAKADE - Complainant(s)

Versus

MS SERENE INFRATECH - Opp.Party(s)

KAPIL ZODGE MANOJ B JAISWAR

18 Jul 2022

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Miscellaneous Application No. MA/22/26
( Date of Filing : 11 Jul 2022 )
In
Complaint Case No. CC/22/5
 
1. MR SAGAR GAUTAM KAKADE
.
...........Appellant(s)
Versus
1. MS SERENE INFRATECH
.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 18 Jul 2022
Final Order / Judgement

द्वारा- श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

    तक्रारदार श्री. सागर काकडे त्‍यांचे वकील श्री.कपिल झोडगे यांचेसह हजर. सदर प्रकरणामध्ये तक्रारदारांनी मूळ तक्रार क्र.CC/22/05 मध्‍ये नमूद सदनिका क्र.714, सातवा मजला, Patel Signature, Type-‘A’ Wing, Near Jainam Residency, Shivmandir Road Village Pale, Ambarnath (East)  हिचा ताबा सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावा याकामी सामनेवाले यांच्‍या लाभात दिलेला इं‍डेम्निटी बॉण्‍ड दि. 03/06/2022 रोजी दाखल केला असून, दि. 11/07/2022 रोजी सामनेवाला यांनी त्‍यावर म्‍हणणे दाखल केले आहे. परंतु सदर इंडेम्निटी बॉण्‍डसह तक्रारदारांनी सदर सदनिकेचा ताबा मिळणेबाबतचा अर्ज दिलेला नसल्‍याने, सदर अर्ज तक्रारदाराचे वकीलांनी दि. 11/07/2022 रोजी MA/22/26 अन्‍वये दिला, त्‍यावर सामनेवाले  यांच्‍या वकीलांनी सदर अर्जाच्‍या खाली लेखी स्‍वरुपात त्‍यांचे म्‍हणणे दिले.  सदर म्‍हणण्‍यामध्‍ये सामनेवाले यांनी मुळ तक्रारीवर त्‍यांची कैफियत दाखल केली असून, तक्रारदाराने दाखल केलेल्‍या इंडेम्निटी बॉण्‍डवर देखील त्‍यांचे म्‍हणणे दिले आहे, असे नमूद करुन सामनेवाले यांच्‍या वकीलांनी सदर प्रकरणामध्‍ये दिलेली कैफियत व सदर अर्जावरील म्‍हणणे विचारात घेऊन आयोगाने योग्‍य ते आदेश पारीत करावेत व आयोगाने आदेश दिल्‍यास सदर सदनिकेचा ताबा तक्रारदारांना देण्‍यात येईल असे नमूद केले आहे.  सदर अर्जावर उभय पक्षाचा युक्तिवाद दि. 11/07/2022 रोजी ऐकण्‍यात आला असून तक्रारदारांनी तक्रारीसह जोडलेल्‍या कागदपत्रांचे तसेच तक्रारीत नमूद सदनिकेबाबत दि. 31/01/2018 रोजी स्‍वाक्षरीत केलेल्‍या व नोंदणीकृत केलेल्‍या करारनाम्‍याचे अवलोकन केले असता सदर सदनिकेचा करारनामा तक्रारदार यांचे वडिल गौतम कोंडीबा काकडे तक्रारदार सागर गौतम काकडे तसेच तक्रारदाराच्‍या पत्‍नी पल्‍लवी सागर काकडे यांनी स्‍वाक्षरीत केल्‍याचे दिसून येते.  सदर करारनाम्‍यात नमूद सदर सदनिकेच्‍या एकूण मोबदल्‍याच्‍या (1590095/-) या रकमेपैकी 13,49,167/- तक्रारदारांनी सामनेवाले यांना अदा केली असल्‍याबाबत नमूद केले असून उर्वरित रक्‍कम तक्रारदार सामनेवाले यांना अदा करण्‍यास तयार असल्‍याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. सदर सदनिकेबाबत तक्रारदार सागर काकडे यांचे वडिल गौतम कोंडीबा काकडे यांनी इंडिया बुल्‍स यांचेकडून तक्रारदाराच्‍या वडिलांचे  खाते संलग्‍न करुन कर्ज घेतले असून त्‍यामध्‍ये तक्रारदार व त्‍यांच्‍या पत्‍नी पल्‍लवी काकडे  या Co. Applicant म्‍हणून नमूद आहेत. सदर कर्ज घेताना तक्रारदाराचे इतर दोन भाऊ विनोद व मनोज काकडे यांनी ना हरकत दिल्‍याचे तक्रारीसह जोडलेल्‍या Exh. I वरुन दिसून येते.  परंतु सदर ना हरकत ही तक्रारदाराचे वडिल हयात असताना व त्‍यांनी सदर सदनिकेबाबत कर्ज घेताना इतर दोन भावांनी दिलेली आहे.  दरम्‍यानच्‍या काळात दि. 23/04/2021 रोजी तक्रारदाराचे वडिल गौ‍तम कोंडीबा काकडे यांचे निधन (Death Certificate Exh.-‘C’) झाले असून सामनेवाले यांनी सदर प्रकरणात दाखल केलेल्‍या कैफियतीमध्‍ये नमूद केल्‍यानुसार, तक्रारदाराचे भाऊ विनोद जी.काकडे यांनी सदर सदनिकेबाबत हक्‍क प्रस्‍थापित करणेकामी व सदर सदनिकेचा ताबा तक्रारदारांना देण्‍याकामी मज्‍जाव करण्‍यासाठी सामनेवाले यांना दि.21/05/2021 रोजी कायदेशीर नोटीस बजावली असल्‍याचे सामनेवाले यांनी कैफियतीमध्‍ये नमूद केले आहे.  तक्रारदारांनी दि. 03/06/2022 रोजी आयोगासमक्ष सादर केलेल्‍या इंडेम्निटी बॉण्‍डचे अवलोकन केले असता, सदर इंडेम्निटी बॉण्‍ड हा तक्रारदार सागर काकडे यांनी सामनेवाले यांच्‍या लाभात लिहून दिला असून, वर नमूद केल्‍याप्रमाणे सदर सदनिकेचा करारनामा हा तक्रारदाराचे वडिल गौतम काकडे, स्‍वतः तक्रारदार तसेच त्‍यांच्‍या पत्‍नी यांनी सामनेवाले यांचेशी स्‍वाक्षरीत केला असून, तक्रारदाराचे वडिलांचे निधन झाले असल्‍याने व सदर सदनिकेवर तक्रारदाराचे भाऊ हक्‍क सांगत असल्‍याने तक्रारदारांनी सदर प्रकरणात सामनेवाले यांना दयावयाचा इंडेम्निटी बॉण्‍ड हा स्‍वतः तसेच त्‍यांच्‍या पत्‍नी पल्‍लवी सागर काकडे यांच्‍या स्‍वाक्षरीसह देणे आवश्‍यक होते.  परंतु तक्रारदारांनी केवळ स्‍वतःच्‍या स्‍वाक्षरीचा इंडेम्निटी बॉण्‍ड अभिलेखावर सादर केला आहे.  सामनेवाले यांनी कैफियतीमध्‍ये तक्रारदाराच्‍या भावांनी दिलेल्‍या नोटीसचा उल्‍लेख करुन, सदर सदनिकेबाबतची रक्‍कम तक्रारदाराच्‍या वडिलांनी त्‍यांच्‍या सेवानिवृतीच्‍या रकमेतून तसेच कर्ज घेऊन सदर सदनिका खरेदी करणेकामी दिली असल्‍याचे नमूद केले आहे.  तक्रारदार व त्‍यांच्‍या पत्‍नीने वडिलांची सदर रक्‍कम रोख रकमेच्‍या स्‍वरुपात तक्रारदाराचे वडिलांना ते हयात असताना परत केली असल्‍याबाबत नमूद केले असले तरी त्‍याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी अदयाप अभिलेखावर दिलेला नाही तसेच HDFC Life Insurance यांचेकडून तक्रारदाराच्‍या वडिलांची इनश्‍युरन्‍सची रक्‍कम इंडिया बुल्‍सचे कर्ज फेडणेकामी वापरली असल्‍याचे नमूद आहे.  सदर पॉलिसीमध्‍ये तक्रारदार सागर काकडे हे नॉमिनी म्‍हणून नमूद आहेत. यावरुन सामनेवाला यांनी दिलेल्‍या कैफियतीमध्‍ये नमूद केल्‍यानुसार, सदर प्रकरण प्रथमदर्शनी दिवाणी स्‍वरुपाचे असल्‍याचे आयोगाचे मत आहे व सदर प्रकरण सध्‍या पुरावा शपथपत्र दाखल करण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर असून त्‍यामध्‍ये उभय पक्षाची बाजू ऐकून व उभय पक्षानी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करुन त्‍यानंतर प्रस्‍तूत प्रकरण गुणवत्‍तेवर निकाली काढणे योग्‍य असल्‍याचे आयोगाचे मत आहे. तक्रारदाराच्‍या इतर दोन भावांनी सदर सदनिकेबाबत इंडिया बुल्‍स यांचेकडून कर्ज घेताना त्‍यांची ना हरकत दिली असली तरी तेव्‍हा तक्रारदाराचे वडिल हयात होते व त्‍यानंतर सामनेवाले यांनी कैफियतीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदाराच्‍या वडिलांचे दि.23/04/2021 रोजी  निधन झाले असल्‍याने व वर नमूद तपशिलाप्रमाणे तक्रारदाराचे इतर दोन भाऊ सदर सदनिकेवर हक्‍क प्रस्‍थ‍ापित करण्‍याचा प्रयत्‍न करत असल्‍याने सध्‍यस्थितीला प्रस्‍तूत प्रकरणामध्‍ये तक्रारदारांनी सदर स‍दनिकेचा ताबा सामनेवाले यांनी तक्रारदारांना देण्‍याबाबत आदेश पारीत करावे याकामी दिलेला अर्ज मंजूर करणे न्‍यायतत्‍वाला धरुन नाही असे आयोगाचे मत आहे.  सबब वर नमूद कारणास्‍तव तक्रारदाराचा अंतरिम अर्ज फेटाळण्‍यात येतो. खर्चाबाबत आदेश नाहीत. अर्ज निकाली.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.