आदेश (दिः 11/04/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. दि.28/02/2011 रोजी तक्रारदाराने पुरसीस दाखल केली व नमुद केले की, उभय पक्षांमध्ये आपापसात झालेल्या चर्चेद्वारे वादाचे निराकरण झालेले आहे. तक्रारदाराला झालेल्या नुकसानीसाठी विरुध्द पक्षाने रु.75,000/- नुकसान भरपाई देण्याचे कबुल केलेले आहे. ही रक्कम तक्रारकर्त्याकडे असलेल्या रु.2,53,125/- रकमेत समायोजित करावयाचे ठरलेले आहे. या समायोजनानंतर राहिलेली रक्कम रु.1,78,125/- विरुध्द पक्षाला देण्याचे तक्रारकर्त्याने मान्य केलेले आहे. 2. कॉथलिक सीरल बँक वसई येथे मे. सारस इंजिनियरस यांच्या बँक खाते उता-याची प्रत मंचासमक्ष सादर करण्यात आली. त्यानुसार दि.18/03/2011 रोजी व दि.21/03/2011 या तारखांना अनुक्रमे रु.1,00,000/- व रु.78,125/- या रकमा खात्यात जमा केल्याचे आढळते. 3. उपरोक्त पार्श्वभुमी विचारात घेतली असता उभय पक्षाच्या वादाचे निराकरण झाल्याने सदर प्रकरण दि.186/2010 निकाली काढण्यात येते. दिनांक – 11/04/2011 ठिकाण - ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |