::निकालपत्र:: (पारीत द्वारा- श्रीमती गीता बडवाईक, मा.सदस्या) (पारीत दिनांक –14 ऑगस्ट, 2012 ) 1. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत विरुध्द पक्षाचे सेवेतील त्रृटी बाबत न्यायमंचा समक्ष दाखल केलेली आहे. 2. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तिने विरुध्दपक्षाच्या मौजा सुराबर्डी, तालुका जिल्हा नागपूर येथील खसरा नंबर-33, पटवारी हलका नंबर-27 येथील भूखंड क्रं-26, एकूण क्षेत्रफळ-1757 चौरसफूट भूखंड एकूण रुपये-43,925/- एवढया किंमतीत खरेदी करण्याचा सौद्या वि.प.सोबत केला. करारनामा करते वेळी रुपये-5000/- व उर्वरीत रक्कम दरमहा हप्ता रुपये-1067/- प्रमाणे एकूण-36 मासिक हप्त्यांमध्ये देण्याचे ठरले.
3. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने दि.07.03.2007 ला भूखंडाचे व्यवहारा संबधाने रुपये-500/- एवढी रक्कम टोकन म्हणून विरुध्दपक्षास दिली. दिनांक-13.03.2007 रोजी भूखंडा बाबत बयानापत्र तयार करण्यात आले त्यानंतर दि.14.03.2007 रोजी भूखंडापोटी रुपये-5000/- एवढी रक्कम वि.प.कडे जमा केली. तक्रारकर्तीने भूखंडापोटी दि.07.03.2007 ते 17.02.2010 या कालावधीत एकूण रक्कम रुपये-39,800/- विरुध्दपक्षाकडे जमा केली. त्यानंतर तक्रारकर्तीने भूखंडा संबधाने ले आऊटला अकृषक ग्राहक तक्रार क्रमांक : 39/2012 परवानगी प्राप्त झाली किंवा नाही? तसेच नगर रचनाकार विभागाची परवानगी मिळाली किंवा नाही? या बाबत विरुध्दपक्षाकडे चौकशी केली. नगर रचनाकार विभागाची परवानगी आणि भूखंडास अकृषक परवानगी मिळाल्याची माहिती वि.प.ने दिल्यास, उर्वरित शिल्लक रक्कम रुपये-4125/- देऊन भूखंडाची खरेदी करण्याची तयारी त.क. हिने दर्शविली. परंतु या संबधीची कोणतीही माहिती वि.प.ने दिली नाही व योग्य प्रतिसाद दिला नाही. 4. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, वि.प.ने योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारकर्तीने दि.19.03.2012 रोजी वकिला मार्फत वि.प.ला नोटीस पाठविली परंतु वि.प.ने तक्रारकर्तीस भूखंडाची विक्री करुन दिली नाही, परिणामी तक्रारकर्तीस शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच त.क. हिने भूखंडापोटी वि.प.कडे जमा केलेल्या रकमेचा बिनव्याजी वापर वि.प.करीत असल्याने तक्रारकर्तीस आर्थिक नुकसान सहन करावे लागले. वि.प.ने तक्रारकर्तीस भूखंडाची विक्री करुन दिली नाही, ही विरुध्दपक्षाचे सेवेतील त्रृटी असल्याचे तक्रारकर्तीने नमुद केले. 5. म्हणून शेवटी तक्रारकर्तीने वि.प. विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन, त्याद्वारे वि.प.ने करारा प्रमाणे मौजा सुराबर्डी, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-26 चे विक्रीपत्र त.क.ला करुन देण्याचे आदेशित व्हावे. भूखंडाची विक्री करुन देण्यास वि.प.असमर्थ असल्यास आजचे बाजारभावाने भूखंडाची रक्कम परत करण्याचे वि.प.ला आदेशित व्हावे. तक्रारकर्तीस ग्राहक तक्रार क्रमांक : 39/2012 झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्यल रुपये-75,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- वि.प.कडून मिळावा इत्यादी स्वरुपाच्या मागण्या तक्रारीत केल्यात. 6. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारी सोबत पान क्रंमाक-05 वरील यादी नुसार एकूण-06 दस्तऐवज दाखल केले असून, त्यामध्ये प्रामुख्याने बयानापत्र, वि.प.ला भूखंडापोटी दिलेल्या रकमेच्या पावत्या, खाते पुस्तकाची प्रत, ले आऊट नकाशा, वि.प.ला दिलेली नोटीस प्रत व पोस्टाची पावती इत्यादीचा समावेश आहे. 07. प्रस्तुत तक्रार मंचात दाखल करुन घेतल्या नंतर मंचा मार्फत यातील विरुध्दपक्षास रजिस्टर पोस्टाने नोटीसेस पाठविण्यात आल्या असता, वि.प.च्या नोटीसेस " नॉट क्लेम्ड " या पोस्टाचे शे-यासह परत आल्यात, म्हणून वि.प.क्रं 1 व 2 विरुध्द सदर तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक-07.08.2012 रोजी पारीत केला. अशाप्रकारे विरुध्दपक्षास सुचना मिळूनही शेवट पर्यंत वि.प.तर्फे कोणीही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही किंवा आपले उत्तरही न्यायमंचा समक्ष दाखल केले नाही.
08. मंचाने दि.07 ऑगस्ट, 2012 रोजी त.क.चे वकिलांचा युक्तीवाद ऐकला.
ग्राहक तक्रार क्रमांक : 39/2012 09. त.क.ची तक्रार, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज यावरुन मंचा समक्ष खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्या क्रं मुद्या उत्तर 01 त.क.ची तक्रार वि.प.विरुध्द होय मंजूर होण्यास पात्र आहे काय? 02 काय आदेश? अंतिम आदेशा नुसार :: कारण मिमांसा :: मुद्या क्रं-1 व 2 10. तक्रारकर्तीची वि.प.विरुध्दची प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल आहे. तसेच तक्रारकर्तीने तक्रारी सोबत वि.प. (यापुढे निकालपत्रात " वि.प." म्हणजे मे.संकल्प डेव्हलपर्स गृह निर्माण सहकारी संस्था, नागपूर तर्फे भागीदार क्रं-1 व 2 असे वाचण्यात यावे.) सोबत भूखंडा संबधाने केलेल्या बयानापत्राची प्रत दाखल केलेली आहे. सदर बयानापत्र हे दि.13.03.2007 रोजीचे असून त्यावर विरुध्दपक्ष संकल्प डेव्हलपर्स तर्फे तिचे भागीदार यांच्या स्वाक्ष-या आहेत. सदर बयानापत्रा वरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्तीने वि.प.सोबत दि.07.03.2007 रोजी मौजा सुराबर्डी, तालुका जिल्हा नागपूर येथील खसरा नं.-33 मधील भूखंड क्रमांक-26 एकूण क्षेत्रफळ 1757 चौरसफूट एकूण रुपये-43,925/- एवढया किंमतीत खरेदी करण्याचा सौद्या केला होता. त्याच दिवशी तक्रारकर्तीने भूखंडाचे बयाना दाखल टोकन अमाऊंट म्हणून वि.प. कडे रुपये-500/- जमा केले तसेच दि.14.03.2007 रोजी डाऊन पेमेंट म्हणून
ग्राहक तक्रार क्रमांक : 39/2012 रुपये-5000/- तक्रारकर्तीने वि.प.कडे नगदी स्वरुपात जमा केले व उर्वरीत रक्कम मासिक किस्ती मध्ये देण्याचे ठरले होते.
11. तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतीं वरुन, ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्तीने वि.प.कडे भूखंडापोटी मासिक किस्तीद्वारे एकूण रक्कम रुपये-39,800/- दि.17.02.2010 पर्यंत जमा केलेली आहे. सौद्या प्रमाणे उर्वरीत राहिलेली शिल्लक रक्कम रुपये-4125/- तक्रारकर्तीला वि.प.कडे जमा करावयाची होती. 12. तक्रारकर्तीचे तक्रारीचे अवलोकन केले असता असेही स्पष्ट होते की, सदर भूखंडाचे ले आऊटला शासना कडून अकृषक वापराची परवानगी प्राप्त झालेली नाही तसेच अकृषक वापरा संबधाने त्यास नगर रचना विभागाकडून नाहरकत परवानगी प्राप्त झालेली नाही. तक्रारकर्तीने आपले तक्रारीचे विनंती कलम क्रं 1 मध्ये भूखंड क्रमांक-26 चे विक्रीपत्र करुन देण्यास वि.प.ला आदेशित करावे अशी मंचास विनंती केलेली आहे परंतु ले आऊटला शासना कडून अकृषक वापराची परवानगी प्राप्त न झाल्याने त.क.ची सदरची मागणी न्यायमंचास मान्य करता येत नाही. मात्र त.क.ने भूखंडापोटी वि.प.कडे जमा केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यास त.क. पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक : 39/2012 13. त.क. हिने, विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटीची रक्कम जमा करुनही , वि.प.ने त.क.ला भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही किंवा ते शक्य न झाल्यामुळे त.क. हिने विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी जमा केलेली रक्कमही वि.प.ने त.क.ला परत केलेली नाही, ही विरुध्दपक्षाची कृती निश्चीतच त्यांचे सेवेतील त्रृटी दर्शविते, त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 14. तक्रारकर्ती ही 75 वर्षाची वयोवृध्द असून ती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. भूखंडाचे खरेदी संबधाने त.क. हिला वि.प.चे कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागल्यात, त्यामुळे त.क. हिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच त.क.ने भूखंडापोटी वि.प.कडे जमा केलेल्या रकमेचा वि.प.ने बिनव्याजी वापर केल्यामुळे त.क.चे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे त.क. ही वि.प.कडून शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसानी संबधाने नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 15. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, न्यायमंच प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष मे.संकल्प डेव्हलपर्स गृहनिर्माण सहकारी संस्थे तर्फे भागीदार क्रं 1 व 2 विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते. ग्राहक तक्रार क्रमांक : 39/2012 2) विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीस तिने भूखंडापोटी वि.प.कडे जमा केलेली रक्कम रुपये-39,800/- (अक्षरी एकोणचाळीस हजार आठशे फक्त ) दि.17.02.2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% व्याजासह परत करावी. 3) विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल व आर्थिक नुकसानी बाबत रुपये-10,000/-(अक्षरीरुपये दहाहजार फक्त ) एवढी नुकसान भरपाई द्यावी तसेच तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) द्यावेत. 4) विरुध्दपक्षाने सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क देण्यात यावी. (श्रीमती रोहीणी कुंडले) | (श्रीमती अलका पटेल) | (श्रीमती गीता बडवाईक) | प्रभारी अध्यक्षा | प्रभारी सदस्या | प्रभारी सदस्या | अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नागपूर |
र |