Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/73

Shri. Venkatrao Balchand Katre - Complainant(s)

Versus

M/S Sankalp Developers Gruha Nirman Sah Sanstha Through Partner - Opp.Party(s)

Uday Kshirsagar

11 Nov 2013

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/12/73
 
1. Shri. Venkatrao Balchand Katre
R/O Plot No. 29 Mahajan Layout Jaitala Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/S Sankalp Developers Gruha Nirman Sah Sanstha Through Partner
27/1 1 st Floor Behind Nilawar Sadi Stors Sanskruti Sankul Zashi Rani chouk sitabuldi Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri.Dharmendra Wanjari Partner of M/S Sankalp Developers
R/O Near Ata Chakki Nandanvan Main Road Jagnade Chouk Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Shri. Vandana Tarare Partner of M/S Sankalp Developers Gruha Nirman Sanstha
R/O Sambodhi Colony Maitrya Budha Vihar Near vithoba Dant Manjan Company Vaishali Nagar Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:Uday Kshirsagar, Advocate for the Complainant 1
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य)

(पारीत दिनांक 11 नोव्‍हेंबर, 2013 )

 

1.    तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षा कडून, मौजा सुराबर्डी, तालुका जिल्‍हा नागपूर येथील भूखंड क्रं 29 चे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन मिळण्‍यासाठी व अशी विक्री करुन देणे  विरुध्‍दपक्ष यांना शक्‍य नसल्‍यास, आजचे बाजारभावाने भूखंडाची किंमत परत मिळण्‍यासाठी  तसेच अन्‍य अनुषंगीक मागण्‍यांसाठी  ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

2.    तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात खालील प्रमाणे-

      विरुध्‍दपक्ष  मे. संकल्‍प डेव्‍हलपर्स गृह निर्माण सहकारी संस्‍था, नागपूर ही एक भागीदारी संस्‍था असून, वि.प.क्रं 2 व 3 हे तिचे भागीदार आहेत आणि विरुध्‍दपक्षाचा शासना कडून शेतीचे अकृषक वापरासाठी रुपांतरण करुन  निवासी भूखंड विक्रीचा व्‍यवसाय आहे.

      तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षाशी, मौजा सुराबर्डी, तालुका जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रं 27, पटवारी हलका नं.26, भूखंड क्रं 29, क्षेत्रफळ 2323.19 चौरसफूट खरेदी करण्‍याचा करारनामा दि.30.03.2007 रोजी केला. करारनाम्‍या नुसार सदर भूखंडाची एकूण किंमत रुपये-69,695/- एवढी निश्‍चीत करण्‍यात आली होती. पैकी करारनाम्‍याचे दिवशी म्‍हणजे दि.30.03.2007 रोजी तक्रारकर्त्‍याने टोकन राशी म्‍हणून रुपये-17,423/- नगदी विरुध्‍दपक्षास दिले. उर्वरीत भूखंडाची रक्‍कम रुपये-52,263/- प्रतीमाह रुपये-2177/- प्रमाणे एकूण 24 महिन्‍यात दि.30.03.2007 ते 28.03.2009 या कालावधीत भरावयाची होती. संपूर्ण मासिक हप्‍त्‍याची रक्‍कम भरल्‍या नंतर भूखंडाची विक्री विरुध्‍दपक्ष करुन देणार होते. विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास असेही सांगितले की, शेतजमीनीस शासनाकडून अकृषक परवानगी प्राप्‍त करण्‍याची कारवाई सुरु आहे तसेच नगर रचना विभागा कडून परवानगी सुध्‍दा प्राप्‍त करावयाची आहे.

 

 

 

 

      तक्रारकर्त्‍याने करारातील भूखंडाचे पोटी दि.28.03.2009 पर्यंत एकूण रुपये-69,695/- भरलेत. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने संबधित भूखंडास शासना कडून अकृषक वापराची परवानगी प्राप्‍त झाली किंवा कसे? तसेच नगर रचना विभागाकडून परवानगी मिळाली किंवा कसे? या बद्दल विरुध्‍दपक्षाकडे चौकशी केली परंतु त्‍यास विरुध्‍दपक्षाने प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने अधिवक्‍ता यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्षास दि.24/05/2012 रोजी नोटीस पाठविली व सदर नोटीस व्‍दारे शासना कडून संबधित भूखंडास अकृषक वापराची परवानगी व  नगर रचना विभागाची परवानगी प्राप्‍त झाली असल्‍यास तक्रारकर्ता विक्रीपत्र करुन घेण्‍यास तयार आहे व त्‍या संबधाने दिनांक, वेळ कळवावी असे विरुध्‍दपक्षास कळविले. त्‍यानंतरही वारंवार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचे कार्यालयास वेळोवेळी भेटी देऊन भूखंडाचे विक्री संबधाने पाठपुरावा केला परंतु विरुध्‍दपक्षाचे कर्मचा-यांनी त्‍यास योग्‍य ती वागणूक दिली नाही व विरुध्‍दपक्षाने योग्‍य तो प्रतिसाद दिला नाही. वस्‍तुतः तक्रारकर्ता विक्रीखर्च करण्‍यास तयार होता व आहे परंतु विरुध्‍दपक्षाने करारातील भूखंडापोटी योग्‍य तो मोबदला तक्रारकर्त्‍या कडून स्विकारुनही, भूखंडाची विक्री करुन दिली नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला. विरुध्‍दपक्षाचे सदरचे कृतीमुळे तक्रारकर्त्‍याचे आर्थिक नुकसान झाले आणि शारीरीक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.  

      म्‍हणन तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली आणि त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा विरुध्‍द खालील प्रकारे मागणी केली.

      विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍याचे नावे मौजा सुराबर्डी, तालुका जिल्‍हा नागपूर येथील योजनेतील भूखंड क्रं 29 चे विक्रीपत्र करुन देण्‍याचे आदेशित व्‍हावे आणि असे करण्‍यास विरुध्‍दपक्ष असमर्थ असल्‍यास आजचे बाजारभावाने भूखंडाची किंमत परत करण्‍यास विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानी बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-75,000/-  आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-10,000/- देण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे.

 

3.    प्रस्‍तुत न्‍यायमंचाचे मार्फतीने यामधील विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्‍यात आली.

 

 

 

 

 

 

 

 

अ)    विरुध्‍दपक्ष क्रं-1 मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स गृहनिर्माण सहकारी संस्‍था, सिताबर्डी, नागपूर या भागीदारी संस्‍थेच्‍या नाव आणि संपूर्ण पत्‍त्‍यावर नोटीस पाठविली असता, “ Door Closed- Ist Intimation-05/11/2012” &“ Door Closed- IInd  Intimation-06/11/2012” “Return to Sender 14/11/12” या पोस्‍टाचे शे-यासह नोटीसचे पॉकीट परत आले व ते निशाणी क्रं-06 वर अभिलेखावर दाखल आहे.

 

ब)     विरुध्‍दपक्ष क्रं-2 मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स गृह निमार्ण सहकारी संस्‍था तर्फे भागीदार धमेंद्र वंजारी यांचे नाव आणि पत्‍त्‍यावर पाठविलेली रजिस्‍टर नोटीस मिळाल्‍या बद्दलची रजिस्‍टर पोच निशाणी क्रं -08 वर दाखल आहे.

 

क)      तर विरुध्‍दपक्ष क्रं-3 मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स गृह निमार्ण सहकारी संस्‍था तर्फे भागीदार श्रीमती वंदना तरारे यांचे नाव आणि पत्‍त्‍यावर पाठविलेली रजिस्‍टर नोटीस मिळाल्‍या बद्दल रजिस्‍टर पोच निशाणी क्रं-07 वर दाखल आहे.

 

ड)     अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं-1 मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स गृह निमार्ण सहकारी संस्‍था या भागीदारी संस्‍थे तर्फे भागीदार क्रं-2 व 3 यांना अनुक्रमे निशाणी  क्रं-08 व निशाणी क्रं-07 अनुसार रजिस्‍टर नोटीस तामील होऊनही ते न्‍यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्‍यांनी आपले लेखी उत्‍तरही दाखल केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 2 व 3 विरुध्‍द प्रस्‍तुत प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने निशाणी क्रं-1 वर दि.07.03.2013 रोजी प्रकरणात पारीत केला.

 

4.    तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत  निशाणी क्रं 3 वरील दाखल दस्‍तऐवजांचे यादी नुसार एकूण 05 दस्‍तऐवज दाखल केलेत, ज्‍यामध्‍ये उभय पक्षांमधील भूखंडा संबधीचे बयाणापत्र, विरुध्‍दपक्षाचा ले-आऊट नकाशा, विरुध्‍दपक्ष संस्‍थेचे पैसे जमा करण्‍याचे पुस्‍तक, तक्रारकर्त्‍याने भूखंडापोटी जमा केलेल्‍या रकमेच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती , तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास पाठविलेली नोटीस, पोस्‍टाची पावती, परत आलेल्‍या लिफाफ्याच्‍या झेरॉक्‍स प्रती अशा दस्‍तऐवजाचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने निशाणी क्रं-9 वर पुरसिस दाखल करुन त्‍याची तक्रार हाच लेखी युक्‍तीवाद समजावा असे कळविले.

 

5.   तक्रारकर्त्‍याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार,  आणि  अभिलेखावर दाखल दस्‍तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले.  

 

 

 

 

6.   प्रस्‍तुत‍ प्रकरणात न्‍यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालील प्रमाणे नोंदविलेले आहेत.

             

        मुद्दा                                    उत्‍तर

(1)  करारा नुसार विरुध्‍दपक्षाने भूखंडा पोटी त.क.

     कडून मोबदला स्विकारुनही, भूखंडाचे विक्रीपत्र

     त.क.चे नावे करुन न दिल्‍याने, विरुध्‍दपक्षाने

     त.क.ला दिलेल्‍या सेवेत कमतरता सिध्‍द होते

     काय? ………………........................................होय.

(2)  काय आदेश? ………………………………….... ..अंतीम आदेशा प्रमाणे

                                              

::  कारण मीमांसा    ::

मुद्दा क्रं 1 व 2

7.   तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर, तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष गृहनिर्माण संस्‍था यांचे मध्‍ये  ( विरुध्‍दपक्ष म्‍हणजे क्रं-1 मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स गृहनिर्माण सहकारी संस्‍था, सिताबर्डी नागपूर आणि तिचे भागीदार विरुध्‍दपक्ष क्रं-2 धमेंद्र वंजारी व विरुध्‍दपक्ष क्रं-3 श्रीमती वंदना तरारे असे वाचण्‍यात      यावे) दि.13.03.2007 रोजी भूखंडाचे खरेदी संबधाने झालेल्‍या बयाणापत्र (करारनामा) प्रत पान क्रं 09 ते 10 वर दाखल केली.

 

8.    सदर करारनाम्‍यामध्‍ये उल्‍लेखित दि.13.03.2007 चुकीचा दिसून येतो, कारण ज्‍या 100/- रुपयाचे स्‍टॅम्‍पपेपरवर सदर करारनामा केलेला आहे, तोच मूळात दि.28 मार्च, 2007 रोजीचा असल्‍यामुळे, तक्रारकर्त्‍याचे तक्रारी नुसार सदर करारनामा दि.30 मार्च, 2007 रोजी झाला असल्‍याची बाब हे मंच ग्राहय धरत आहे. करारनाम्‍यावर 13.03.2007 आणि 30.03.2007 अशा दोन्‍ही तारखा नमुद आहेत.

 

9.   सदर करारनाम्‍या नुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाच्‍या मौजा सुराबर्डी, पटवारी हलका नं.26, तालुका जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रं 27 मधील

भूखंड क्रं 29 एकूण क्षेत्रफळ 2323.19 एकूण रुपये-69,695/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा करार केला आणि करारनाम्‍याचे दिवशी म्‍हणजे दि.30.03.2007 रोजी बयाणा दाखल रक्‍कम रुपये-17,423/- नगदी दिल्‍याचा सुध्‍दा उल्‍लेख आहे. उर्वरीत रक्‍कम रुपये-52,263/- प्रतीमाह रुपये-2177/- प्रमाणे एकूण 24


 

मासिक किस्‍तीमध्‍ये दि.13.03.2007 (सदर तारीख 13.03.2007 ही चुकीची असून त्‍याऐवजी ती 30.03.2007 अशी वाचण्‍यात यावी)  ते 13.03.2009 या कालावधीत भरावयाची होती असे करारनाम्‍यात नमुद आहे. विहित मुदतीत भूखंडाची पूर्ण रक्‍कम जमा केल्‍यास भूखंडाची विक्री लावून देण्‍यात येईल आणि विक्रीचा पूर्ण खर्च घेणा-याकडे राहिल असे करारात नमुद केले आहे.

 

10.    तक्रारकर्त्‍याने पान क्रं 12 आणि 13 वर विरुध्‍दपक्षाने भूखंडा पोटी प्राप्‍त झालेल्‍या रकमे बद्दलची नोंद केल्‍या बद्दलचा दस्‍तऐवज दाखल आहे, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने दि.17.04.2007 ते दि.28.03.2009 या कालावधीत विरुध्‍दपक्षाकडे एकूण 24 मासिक किस्‍तीमध्‍ये भूखंडापोटी रकमा भरल्‍याच्‍या नोंदी नमुद आहेत.

 

11.     तक्रारकर्त्‍याने पान क्रं 14 ते 26 वर विरुध्‍दपक्ष संकल्‍प डेव्‍हलपर्स यांचेकडे करारातील नमुद भूखंडापोटी रकमा जमा केल्‍या बद्दल पावत्‍यांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत, त्‍याचे विवरण खालील प्रमाणे आहे-

 

अक्रं

पावती क्रं

पावती दिनांक

जमा केलेली रक्‍कम

शेरा

1

378

17/04/07

1800/-

मासिक किस्‍त

2

528

10/05/07

1800/-

मासिक किस्‍त

3

881

15/06/07

1800/-

मासिक किस्‍त

4

1149

12/07/07

1800/-

मासिक किस्‍त

5

1461

11/08/07

2700/-

मासिक किस्‍त

6

1905

18/09/07

1800/-

मासिक किस्‍त

7

 

16/10/07

1800/-

मासिक किस्‍त

8

210

19/11/07

1800/-

मासिक किस्‍त

9

3410

19/12/07

1800/-

मासिक किस्‍त

10

 

21/01/08

1800/-

मासिक किस्‍त

11

 

23/02/08

1800/-

मासिक किस्‍त

12

 

27/03/08

1800/-

मासिक किस्‍त

13

 

25/04/08

1800/-

मासिक किस्‍त

14

 

31/05/08

1800/-

मासिक किस्‍त

15

 

28/06/08

1800/-

मासिक किस्‍त

16

 

28/07/08

1800/-

मासिक किस्‍त

17

 

29/08/08

1800/-

मासिक किस्‍त

18

5521

30/09/08

1800/-

मासिक किस्‍त

19

6267

03/11/08

1800/-

मासिक किस्‍त

20

6817

29/11/08

1800/-

मासिक किस्‍त

21

7507

02/01/09

1800/-

मासिक किस्‍त

22

8088

02/02/09

1800/-

मासिक किस्‍त

23

8663

03/03/09

1800/-

मासिक किस्‍त

24

 

28/03/09

1800/-

मासिक किस्‍त

 

 

एकूण

44,100/-

 

 

 

 

 

 

 

या व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्त्‍याने करारनाम्‍या पूर्वी टोकन अमाऊंट आणि डाऊन पेमेंट पोटी भरलेल्‍या रकमेचा तपशिल खालील प्रमाणे देण्‍यात येत आहे.

 

अक्रं

पावती क्रं

पावती दिनांक

जमा केलेली रक्‍कम

शेरा

1

077

13/03/07

2000/-

टोकन अमाऊंट

2

245

29/03/07

12500/-

डाऊन पेमेंट

 

 

एकूण रक्‍कम

14500/-

 

 

  तक्रारकर्त्‍याचे प्रतिज्ञालेखावरील तक्रारी नुसार त्‍याने करारनाम्‍यापोटी, कराराचे दिवशी म्‍हणजे दि.30.03.2007 रोजी  रुपये-17,423/- विरुध्‍दपक्षाकडे नगदी बयाना दाखल जमा केलेत असे नमुद आहे. परंतु त्‍यापैकी टोकन अमाऊंट रक्‍कम रुपये-2000/- आणि डाऊन पेमेंट म्‍हणून रुपये-12,500/- एवढयाच पावत्‍या अभिलेखावर दाखल आहेत आणि त्‍याची बेरीज रुपये-14,500/- एवढी येते. परंतु करारनाम्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्षाने बयाना दाखल रुपये-17,423/- मिळाल्‍याचे लिहून दिल्‍यामुळे कराराचे दिवशी तक्रारकर्त्‍याने रुपये-17,423/- एवढी रक्‍कम विरुध्‍दपक्षास दिल्‍याची बाब मंच ग्राहय धरीत आहे.

 

12.  अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने करारनामा दि.30.03.2007 रोजी                 रुपये-17,423/- भगदी भरलेत व मासिक किस्‍तीची रक्‍कम रुपये-44,100/- असे मिळून एकूण रुपये-61,523/- विरुध्‍दपक्षाकडे भूखंडापोटी भरल्‍याची बाब दाखल करारनामा आणि उपलब्‍ध पावत्‍यांच्‍या प्रतीं वरुन पूर्णतः सिध्‍द होते.     तक्रारकर्त्‍याची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल आहे तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी  सुध्‍दा न्‍यायमंचा समक्ष उपस्थित होऊन त्‍यांचा प्रतिवाद दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षाकडे, भूखंडा पोटी एकूण रक्‍कम  रुपये-61,523/- चा भरणा केल्‍याची मान्‍य करण्‍यास हरकत नाही, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

13.   तक्रारकर्त्‍याने  करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र त्‍याचे नावे नोंदवून मिळण्‍याची मागणी आपले तक्रारीत केलेली आहे व असे करणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास आजचे बाजारभावाने भूखंडाची किंमत परत मिळण्‍यास तसेच  त्‍या संबधाने अन्‍य अनुषंगीक मागण्‍या केलेल्‍या आहेत.

 

14.   उपरोक्‍त नमुद परिस्थितीत, विरुध्‍दपक्षाने भूखंडाची उर्वरीत‍ रक्‍कम तक्रारकर्त्‍या कडून स्विकारुन, तक्रारकर्त्‍याचे नावे उर्वरीत रक्‍कम रुपये-8172/-  स्विकारुन भूखंडाचे  नोंदणीकृत खरेदीखत नोंदवून द्दावे. नोंदणीचा खर्च करारा


 

 

नुसार तक्रारकर्त्‍याने करावा.  काही कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदणीकृत खरेदीखत नोंदविणे, विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास, भूखंडापोटी तक्रारकर्त्‍या कडून वेळोवेळी स्विकारलेली रक्‍कम  रुपये-61,523/- भूखंडापोटी शेवटची मासिक किस्‍त स्विकारल्‍याचा दिनांक-28.03.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्‍याजासह,तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्षाने परत करावी,असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच तक्रारकर्त्‍यास  झालेल्‍या  शारिरीक   मानसिक त्रास व आर्थिक नुकसानी बद्दल रुपये-7000/- व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-3000/- विरुध्‍दपक्षाकडून नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र ठरतो, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

15.   वरील वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

          

                    ::आदेश::

 

1)     तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं-1 ते 3 यांचे विरुध्‍द वैयक्तिक

       आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)     विरुध्‍दपक्ष यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी भूखंडाचे खरेदी

       बाबत नोंदणीकृत करार अनुसार मौजा सुराबर्डी, तालुका जिल्‍हा नागपूर

       येथील योजनेनुसार भूखंड क्रं-29 चे नोंदणीकृत खरेदीखत, तक्रारकर्त्‍या

       कडून उर्वरीत रक्‍कम रुपये-8172/- (अक्षरी रुपये आठ हजार एकशे-

       बहात्‍तर फक्‍त ) स्विकारुन तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून द्दावे. असे

       करणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास,  तक्रारकर्त्‍याने, वि.प.कडे भूखंडा

       पोटी जमा केलेली रक्‍कम रुपये-61,523/-(अक्षरी रु. एकसष्‍ठ हजार -

       पाचशे तेवीस फक्‍त) भूखंडापोटी शेवटची मासिक किस्‍त स्विकारल्‍याचा

       दि.- 28.03.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो

       द.सा.द.शे. 12% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास परत

       करावी.

3)     विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रास व

       आर्थिक नुकसानी  बद्दल रु.-7000/-(अक्षरी रु. सात हजार फक्‍त)

       आणि तक्रारखर्च म्‍हणून रु.-3000/-(अक्षरी रु. तीन हजार फक्‍त)

       द्दावेत.

 

 

 

 

 

 

4)     सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्‍त

       झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

5)     तक्रारकर्त्‍याच्‍या अन्‍य मागण्‍या या नामंजूर करण्‍यात येत आहेत.

6)     निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

       देण्‍यात यावी.

          

 

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.