निकालपत्र :- (दि.14/02/2011) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 हे त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 यांना नोटीस पोहचलेची पोच पावती सदर कामी दाखल आहे. सामनेवाला क्र.1 हे सदर कामी नोटीस लागू होऊनही हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. अंतिम युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदारचे वकील व सामनेवाला क्र.2 चे वकीलांनी यांनी युक्तीवाद केलेला आहे. सदरची तक्रार तक्रारदाराचा सामनेवाला यांनी मोबाईल हॅन्डसेट बाबत विक्री पश्चात सेवा न दिलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) यातील सामनेवाला क्र.1 हे दुकानदार असून सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 यांचे ऑथोराईज्ड सॅमसंग सर्व्हीस सेंटर आहे. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून दि.10/07/2010 रोजी सॅमसंग कंपनीचा मॉडेल नं.5212 चा मोबाईल बील नं.10652 ने रक्कम रु.4,600/- ला खरेदी केलेला आहे. सदरचे मोबाईलचा गॅरंटी व वॉरंटी कालावधी अदयाप आहे. सदरचा तक्रारदार यांचा मोबाईल दि.12/11/2010 रोजी अचानकपणे बंद पडला. त्यामुळे तक्रारदार यांना सदर मोबाइ्रलवरुन ऐकू येणे बंद झाले. ब) तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना सदर मोबाईल दाखविला असता सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे दुरुस्तीस देणेस सांगितले म्हणून तक्रारदार यांनी दि.20/11/010 रोजी सामनेवाला क्र.2 यांचेकडे सदर मोबाईल दुरुस्तीसाठी दिला असता त्यांनी मोबाईल दुरुस्त न करता Handset Liquid Loged SPK Problem(EST For PBH) अशा प्रकारचा दोष असलेचे सांगून दि.23/11/2010 रोजी रु.3,010/- इतका खर्च असलेचे सांगून तसे इस्टिमेट काढून दिले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांना सदरचा मोबाईल गॅरंटी-वॉरंटी कालावधीमध्ये असलेचे सांगून दुरुस्ती करुन मिळणेबाबत विनंती केली. परंतु सामनेवाला क्र.2 यांनी मोबाईल दुरुस्त करणेचे नाकारुन रोख रक्कम रु.3,010/- भरलेशिवाय मोबाईल दुरुस्त करता येणार नाही असे सांगितले. क) तक्रारदार यांचा नमुद सॅमसंग कंपनीचा मॉडेल नं.5212 चा मोबाईल गॅरंटी वॉरंटी कालावधीमध्ये असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदाराचा मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी आपले वकील श्री मोहन एच.पाटील रा. कागल यांचेमार्फत दि.26/11/2010 रोजी सामनेवालांना नोटीस पाठवली. सदर नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी तक्रारदाराचा मोबाईल दुरुस्त करुन दिलेला नाही किंवा दुसरा मोबाईल बदलून दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदारास मे. मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन सामनेवाला क्र.1 यांचेकडून खरेदी केलेला मोबाईल विनामोबदला त्वरीत दुरुस्ती करुन अथवा बदलून देणेबाबतचा आदेश व्हावा. तसेच नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च सामनेवालांकडून वसुल होऊन मिळणेबाबतची विनंती सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 कडून नमुद मोबाईल खरेदी केलेल्या बीलाची प्रत, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास मोबाईलच्या खर्चाचा तपशीलासह पावती, सामनेवाला क्र.2 यांचेकडे मोबाईल दुरुस्तीकरिता दिलेली पावती, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांना मिळालेची पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा,चुकीचा, रचनात्मक, लबाडीचा,बेकायदेशीर असून सामनेवाला यांना तो मान्य नाही. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूर हा कायदयाचा भाग आहे त्यावर सामनेवाला काहीही भाष्य करु इच्छित नाहीत. तक्रार अर्ज कलम 2 मधील मजकूर खरा व बरोबर नाही. तक्रारदार खरी वस्तुस्थिती मे.कोर्टापासून लपवून ठेवलेली असून मे; कोर्टाची दिशाभूल करीत आहेत. तक्रारदार यांचा मोबाईल हा पाण्यात पडल्यामुळे मोबाईलमध्ये पाणी गेलेने त्यामध्ये बिघाड निर्माण झालेला आहे. तक्रारदाराने वॉरंटीमध्ये नमुद केलेल्या अटींचे अवलोकन केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने चुकीचा अर्ज दाखल केला आहे. तक्रार अर्ज कलम 3 मधील मजकूरदेखील साफ चुकीचा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दि.23/10/2010 रोजी दुरुसतीबद्दल खर्च दिलेला आहे व त्यामध्ये Handset Liquid Loged SPK Problem(EST For PBH) हे कारण नमुद केलेले आहे. या कारणासाठी वॉंरंटी कालावधीत हॅन्डसेट विना मोबदला दुरुस्त करुन मिळत नाही. ब) तक्रार अर्ज कलम 4 मधील सर्व मजकूर खोटा, चुकीचा, लबाडीचा, रचनात्मक व मे. कोर्टाची दिशाभूल करणारा आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार व त्यांचे वकील श्री मोहन पाटील यांना फोन करुन मोबाईल पाण्यात पडल्यामुळे त्याच्यामध्ये दोष निर्माण झालेला आहे व ही बाब वॉरंटी कालावधीत मोफत दुरुस्त करुन देता येत नाही असे कथन केले. परंतु तक्रारदार यांनी सामनेवालांना स्वत: वकील आहोत व आम्ही तुम्हाला कायदा दाखवितो अशा शब्दात सुनावले. तक्रारदाराची ही कृती न विसरण्यासारखी व अक्षम्य अशी आहे. एवढेच नव्हे तर सामनेवाला कंपनी आपल्या कंपनीच्या नावासाठी मोफत मोबाईल दुरुस्त करुन देणेस तयार होती व आहे. तक्रारदाराचे मोबाईलमध्ये कोणताही निर्मित दोष (Manufacturing Defect) नाही. त्यामुळे तक्रारदारास नुकसान भरपाई देणेचा प्रश्नच निर्माण होत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर व्हावी व तक्रारदाराकडून सामनेवालांना रक्कम रु.5,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ सामनेवाला क्र.1 यांनी मोबाईल ग्राहकास दिलेले वॉरंटी कार्ड दाखल केले आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? ---शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- अ) तक्रारदाराने दाखल केलेल्या कॅश मेमो क्र.10652 नुसार सामनेवाला क्र.1 यांचेकडून दि.10/07/2010 रोजी सॅमसंग कंपनीचा मॉडेल नं.5212 IMEI No.353350035627381 Battery No. 518Y54B Charger No.614A55G रक्कम रु.4,600/- ला खरेदी केलेला आहे. प्रस्तुत हॅन्डसेटला 12 महिन्याची वॉरंटी बॅटरी व चार्जर याला 6 महिन्याची गॅरंटी दिलेली होती. सामनेवाला क्र.2 यांनी प्रस्तुतचा मोबाईल बंद पडल्याने दि.23/11/2010 रोजी सदर हॅन्डसेट हा Handset Liquid Loged SPK Problem(EST For PBH) हे कारण नमुद करुन रक्कम रु.3,010/- इतक्या खर्चाचे इस्टीमेट दिलेले दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. तसेच प्रस्तुतचा मोबाईल दि.20/11/2010 रोजी दुरुस्तीसाठी दिलेबाबतची पावती प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. प्रस्तूत मोबाईलमधून अचानकपणे आवाज येणे बंद झालेने दुरुस्तीसाठी दिलेचे प्रस्तुत पावतीवर नमुद आहे. प्रस्तुत मोबाईल हा दि.10/07/2010 रोजी खरेदी केलेला होता व तो दि.12/11/2010 रोजी अचानकपणे बंद पडलेला आहे. सदरचा मोबाईल घेतलेपासून 4 महिन्यातच बंद पडलेला आहे. सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार मोबाईल पाण्यात पडल्यामुळे त्यामध्ये दोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे वॉरंटी कालावधीत तो मोफत दुरुस्त करुन देता येत नसलेचे प्रतिपादन केल. त्यामुळे दुरुस्तीसाठी येणा-या खर्चाचे एस्टीमेट दिलेले आहे. तसेच वॉरंटीच्या अटीचे अवलोकन न करताच चुकीचा अर्ज तक्रारदाराने दाखल केलेला आहे. प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला क्र.2 यांनी वॉरंटी कार्डाचा नमुना दाखल केलेला आहे. प्रस्तुत वॉंरंटी कार्डमधील कलम 8 प्रमाणे पार्टची दुरुस्ती अथवा नवीन पार्ट बसवणे इथपर्यंत मर्यादित आहे. अथवा जास्तीत जास्त त्याच्या किरकोळ किंमत अथवा खरेदी किंमतपैकी जी कमी असेल ती राहील. प्रस्तुत वॉरंटी कार्डचे मागील बाजूस 1) वॉरंटी कार्ड भरुन जवळचे सर्व्हीस सेंटरकडे खरेदी केल्यापासून 2 आठवडयाच्या आत जमा करणे जरुरीचे आहे. तसे न केल्यास वॉरंटी लागू होणार नाही. तसेच अट क्र.5-नुसार इम्प्रॉपर वापरामुळे दोष निर्माण झालेस वॉरंटी राहणार नसलेचे नमुद केले आहे. वरील बाबींचा विचार करता वस्तुत: ज्या दिवशी मालाची विक्री केली जाते त्याचदिवशी सहीशिक्क्यानिशी वॉरंटी-गॅरंटी कार्ड दिली जातात. प्रस्तुत प्रकरणी असे झालेले नाही. वादाकरिता अशी अट गृहीत जरी धरली तरी प्रस्तुतचे वॉरंटी कार्ड हे सॅमसंग या कंपनीच्या विविध उत्पादनासाठी एकत्रित काढलेले आहे. वस्तुत: ज्या वस्तुची विक्रकी केलेली आहे. त्या संदर्भातच वॉरंटी कार्ड देणे अपेक्षित आहे. असे न करता सर्व प्रॉडक्टसाठी एकच वॉरंटी कार्ड दिसून येते. तसेच अट क्र.5 चा विचार करता इम्प्रॉपर युज म्हणजे काय याचे कुठेही स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रस्तुत तक्रारीतील मोबाईल हा पाण्यात पडून दोष निर्माण झालेने वॉटर लॉग्ड असून त्यास वॉरंटी राहणार नाही; कारण इम्प्रॉपर युज झालेला आहे हे सामनेवाला क्र.2 यांचे प्रतिपादनाचा विचार करता नमुद मोबाईल विक्री वेळी अशी स्पष्ट अट नमुद वॉरंटी कार्डमध्ये नसलेचे दिसून येते. तसेच वॉटर लॉग्ड मोबाईलमध्ये संपूर्ण मोबाईलचा खराब होऊन जातो व तो वापरण्यायोग्य राहत नाही. त्यामध्ये कोणतेही फंक्शन होत नाही. मात्र प्रस्तुत प्रकरणी सामनेवालांनी दाखल केलेल्या पावतीमध्ये पीबीए रक्कम रु.2,760/- चा हा पार्ट बदलावा लागेल असे एस्टीमेट दिले व तो पार्ट मोबाईलमध्ये घालणेसाठीचे इतर चार्जेस मिळून रक्कम रु.3,010/-चे एस्टीमेट दिलेले आहे. मात्र सदरचा मोबाईल हा वॉटर लॉग्ड होऊन आवाज येणे बंद झालेबाबत तज्ञांचे मत व तसा अहवाल व शपथपत्र दाखल केलेले नाही. तसेच प्रस्तत मोबाईलमध्ये उत्पादित दोष नसलेबाबत नमुद केले आहे. सबब सामनेवालांचे नुसत्या कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. सामनेवालांनी प्रस्तुत मोबाईल हा वॉरंटी कालावधीत मोफत दुरुस्त करुन दयावयास हवा होता. तो दुरुस्त करुन दिलेला दिसून येत नाही. तसेच प्रस्तुत मोबाईल खरेदीकरतेवेळी तक्रारदाराचा सामनेवाला कंपनीची थेट संबंध येत नाही. थेट संबंध हा वितरकाशी येतो. सबब सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारदारने मोबाईल खरेदी केलेला आहे. सामनेवाला क्र.1 हे प्रस्तुत प्रकरणी नोटीस लागू होऊनही हजर झालेले नाहीत. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले नाही अथवा युक्तीवादही केलेला नाही. सबब प्रस्तुत तक्रारीबाबत त्यांना सांगावयाचे नसलेचे त्यांना प्रस्तुतची तक्रार त्यांना मान्य आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही. ग्राहकास विक्री पश्चात सेवा देणे ही एकप्रकारची जबाबदारी आहे ही त्यांनी पार पाडलेली दिसून येत नाही. सबब सामनेवाला क्र.1 व 2 हे सदर सेवात्रुटीसाठी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदाराने दि.10/07/2010 रोजी रक्कम रु.4,600/- इतकी किंमत देऊन नमुद मोबाईल खरेदी केलेला आहे. सदरचा मोबाईल चार महिन्यातच बंद पडलेने दुरुस्तीसाठी रक्कम रु.3,010/- चे एस्टीमेट दिलेले आहे. याचा विचार करता नमुद मोबाईलचे खरेदीपोटी भरीव रक्कम देऊन त्याला नमुद मोबाईलचा उपभोग घेता आलेला नाही. तसेच त्याला विक्री पश्चात योग्य ती सेवा मिळालेली नाही याचा विचार करता सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रास झालेला असलेमुळे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदाराचा नमुद मोबाईल विना मोबदला त्वरीत दुरुस्त करुन दयावा अथवा ता बदलून त्याच मॉडेलचा नवीन दोषरहीत मोबाईल हॅन्डसेट दयावा. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |