(आदेश पारित व्दारा – श्रीमती चंद्रिका बैस, मा. सदस्या ) अंतीम आदेश - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्या खसरा नंबर 29/3, मौजा वाघदरा पटवारी हलका नंबर 46 येथील ‘रॉयल गायञी पार्क 2’ या योजनेच्या ‘सफायर’ या इमारतीच्या दुस-या मजल्यावरील 3 बी.एच.के. सदनिका क्रं. 201, विकत घेण्याचे ठरविले होते. या सदनिकाचे एकून चटई क्षेञफळ 75.635 चौ.मी. तसेच अवभिाजीत हिस्सा 0.6747 चौ.मी. असून सदरहू योजना ही तालुका हिंगना, जिल्हा नागपूर येथे स्थित आहे. उपरोक्त सदनिका क्रमांक 201 तक्रारकर्त्याने एकूण रक्कम 38,09,830/- रुपयात घेण्याचा करार दिनांक 26/08/2015 केला होता. त्याकरीता तक्रारकर्त्याने रुपये 1,00,000/- रुपयाचा धनादेश क्रमांक 094303, दिनांक 25/7/2015 रोजी विरुध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांना दिला होता. त्याकरीता विरुध्द पक्ष याने तक्रारकर्त्यास पावती क्रमांक 2184 दिली होती. त्यानंतर तक्रारकर्त्याने जमा केले व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नावे करारपञ करुन दिले. तक्रारकर्त्यास सदरहु गाळ्याकरीता टप्याटप्याने पैसे विरुध्द पक्षाला द्यावयास होते. परंतू विरुध्द पक्षाने आजतागायत ‘गायञी पार्क 2’ या योजनेमधील ‘सफायर’ या इमारतीचे बांधकाम चालु केले नाही व त्यासंबंधी विरुध्द पक्षास विचारणा केली असता ते टाळाटाळीचे उत्तर देतात. तक्रारकर्त्याचे सध्या कोणत्याही प्रकारचे कमार्इचे साधन नाही व तो संपूर्णपणे निवृत्तीवेतन वर अवलंबुन आहे व त्याने आपल्या आयुष्यभराच्या कमाईमधुन मिळालेली रक्कम रुपये 8,30,000/- विरुध्द पक्षाकडे जमा केलेली होती. त्यानंतर दिनांक 30/4/2017 रोजी तक्रारकर्ता विरुध्द पक्षाच्या अजनी चौकातील कार्यालयात त्यांच्याशी भेटले असता त्यांनी तक्रारकर्त्यास सांगीतले की या इमारतीचे बांधकाम काही कारणास्तव करणे शक्य नाही. त्यामुळे विरुदध पक्षाने तक्रारकर्त्यास त्याची एकूण जमा रक्कम रुपये 8,30,000/- दोन महिण्यात वापस करण्यात येईल असे सांगीतले. परंतू आजतागायत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास घेतलेली रक्कम वापस केली नाही. यावरुन विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करुन सेवेत ञुटी केली असल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्त्याच्या मागणीनूसार त्यांनी खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
- तक्रारकर्त्याची जमा रक्कम रुपये 8,30,000/- द.शा.द.शे. 24 टक्के व्याज दराने तक्रारकर्त्यास, विरुध्द पक्षाकडे जमा केल्याच्या तारखेपासून ते प्रत्यक्ष अदायगी पर्यंत मिळावे.
- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास मानसिक, शारीरीक व आर्थिक ञासाकरीता तसेच तक्रारीचा खर्च एकूण रक्कम रुपये 2,00,000/- देण्यात यावे.
- तक्रारीचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थीत होतात.
मुद्दे निष्कर्ष - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने आपल्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
- आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा - तक्रारकर्त्याने निशानी क्रमांक 2 वरील दाखल केलेले दस्तावेज जसे माहिती पुस्तीका, करारपञाची प्रत, विरुध्द पक्षाकडे जमा केलेल्या रसिदांची प्रत, तक्रारदाराचे बँक स्टेअमेंट, वकीलाने पाठविलेली नोटीस ची प्रत व विरुध्द पक्षाला मंचाकडून पाठविलेल्या नोटीस मिळाल्याची पोच पावत्या इत्यादींचे अवलोकन केल्यानंतर व त्याचप्रमाणे तक्रारदाराच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हे स्पष्ट होते की, विरुध्द पक्ष यांनी 8,30,000/- रुपये मिळाल्यानंतर तक्रारकर्त्याच्या नावे उपरोक्त ‘गायञी पार्क 2’ या इमारतीमधील गाळा क्रमांक 201 चा विक्रीचा करार दिनांक 26/8/2015 ला करुन दिला. परंतु विरुध्द पक्षाने सदर जागेवर कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले नाही व आजतागायत विरुध्द पक्षाने दिनांक 26/08/2015 च्या करारपञाप्रमाणे कुठल्याही शर्ती व अटींचे पालन केले नाही व तक्रारकर्त्यास आश्वासीत केल्याप्रमाणे दोन महिन्यात त्यांची जमा रक्कम रुपये 8,30,000/- परत केली नाही. सबब विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला असून आपल्या सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने ग्राहक न्यायालयात दिनांक 27/7/2018 रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार मंचातर्फे विरुध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांना नोटीस पाठविण्यात आली. त्यांना नोटीस मिळुनही विरुध्द पक्ष मंचात उपस्थित राहीले नाही. त्यामुळे दिनांक 3/12/2018 रोजी विरुध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. व तक्रारकर्त्याने निशानी क्रमांक 2 वर दाखल केलेल्या सर्व दस्तावेजांचे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 हे सदरहू रक्कम तक्रारकर्त्यास परत करण्यास जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारकर्ता सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळण्यास पात्र आहे व तक्रारकर्त्याची मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 5,000/- ची मागणी योग्य आहे असे मंचाचे मत आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-// अंतीम आदेश // - - तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्द पक्ष क्रमांक 1, 2 व 3 यांचेविरुध्द वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अंशतःहा मंजूर करण्यात येते.
- वि.प.ने तक्रारकर्त्याला 3 बेडरुम गाळ्याकरीता त्याने जमा केलेली रक्कम रुपये 8,30,000/- (अक्षरी रुपये आठ लाख तीस हजार) शेवटचा हप्ता भरल्याचा दिनांक 5/8/2015 पासून ते प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरिक, मानसिक व आर्थीक त्रासापोटी रुपये 20,000/- (रुपये वीस हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
- वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
|