Maharashtra

Additional DCF, Thane

CC/19/170

MR. NACHIKET MEHTA - Complainant(s)

Versus

M/S RELLIANE RETAIL LIMITED RELLIANCE DIGHITAL - Opp.Party(s)

ADV. VIJAY SHINDE

19 Sep 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/19/170
( Date of Filing : 09 Jul 2019 )
 
1. MR. NACHIKET MEHTA
E 0201, CASA RIO, PALAVA, KALYAN SHIL ROAD, DOMBIVALI (E), KALYAN NILJE THANE 421204
THANE
MAH
...........Complainant(s)
Versus
1. M/S RELLIANE RETAIL LIMITED RELLIANCE DIGHITAL
AT- MAITILI SIGNET , PLOT NO 30 4E, NEAR VASHI RAILWAY STATION NAVI MUMBAI 400705
THANE
MAH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 19 Sep 2019
Final Order / Judgement

तक्रारदार वकीलांसह हजर.

सदरची तक्रार स्विकृतीपूर्व युक्‍तीवादासाठी आहे. मागिल तारखेस सामनेवाले हे कंपनी किंवा भागीदार संस्‍था असल्‍याबद्दल कंपनी कायद्याप्रमाणे किंवा भागीदारी संस्‍थेच्‍या नोंदणी कार्यालयातून त्‍यांच्‍या प्रबंधकानी दिलेल्या  उता-याच्‍या आधारावर सामनेवाले ही कंपनी आहे किंवा भागीदारी संस्‍था  आहे याचा बोध होईल, त्‍यांचा पत्‍ता मिळेल, तसेच त्‍यांचे संचालक किंवा भागीदार कोण आहेत याची माहिती मिळेल त्‍या अनुषंगाने ते कागदपत्र दाखल करण्‍याचा आदेश केला होता. त्‍याप्रमाणे इंटरनेटवरुन काढलेली प्रत अर्जासोबत दाखल केली. त्‍यात सामनेवाले यांचा पत्‍ता एल.टी मार्ग, धोबी तलाव, मुंबई 000002 असा आहे.  तक्रारदाराच्‍या वकीलांना तक्रार दाखल करणेस कारण या मंचाच्‍या भौगोलिक कार्यक्षेत्रात कसे घडले याबाबतीत युक्‍तीवाद करणेस सांगितले असता त्‍यांनी तक्रारीतील परिच्‍छेद क्रमांक 1 उद्घोषित केला. सदर कथनाप्रमाणे सामनेवाले यांचे कार्यालय वाशी, नवी मुंबई येथे असल्‍याने तक्रार दाखल करण्‍यास नवी मुंबई येथे कारण घडले असल्‍याचे कथन केले आहे.

ग्राहक कायद्याच्‍या तरतुदी अत्‍यंत सोप्‍या आहेत, जेणेकरुन अडाणी माणसाला सुध्‍दा त्‍याचा बोध व्‍हावा, त्‍यामुळे सदर कायद्याचे कलम 11/2 (अ)(ब)(क) यांचे अवलोकन केल्‍यानंतर सामनेवाले यांच्‍यासोबत झालेला व्‍यवहार जर या मंचाच्‍या भौगोलिक कार्यक्षेत्रात असलेल्‍या कार्यालयात झाला, किंवा ते तेथून व्‍यवसाय करतात, किंवा तक्रार दाखल करणेकामी पूर्णतया किंवा अंशतः कारण या मंचाच्‍या भौगोलिक कार्यक्षेत्रात घडले असेल तरच तक्रार स्विकृत करण्‍याचा अधिकार या मंचास येतो. परंतु वरील कलमाप्रमाणे एका शब्‍दानेही कथन तक्रारीत केलेले नाही त्‍यामुळे तक्रार या मंचाच्‍या भौगोलिक कार्यक्षेत्रात (Territorial Jurisdiction) येत नसल्‍याचे इतर कागदपत्रांवरुनही स्‍पष्‍ट झाले. 

तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी पाणी शुध्‍दी करणाचे यंत्राची (अॅक्‍वा गार्डची) दुरुस्ती सामनेवाले यांचेकडून करुन घेतली, त्‍याबाबतीत त्‍याची छायांकित प्रत कच्‍ची  निशाणी ब, पान क्रमांक 18 वर दाखल केली आहे. तिचे अवलोकन केले असता सामनेवाले यांचा पत्‍ता डोंबिवली, जि. ठाण्‍याचा आहे. या कारणास्‍तवही तक्रार या मंचास  चालविण्‍याचे अधिकार नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. वरील सर्व गोंधळ तक्रारदाराच्‍या वकीलांनी कायद्याचा व्‍यवस्थित अभ्‍यास न करता तक्रार घाई गडबडीने केल्‍याने तक्रारदाराचे नुकसान होत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍यामुळे तक्रारदारास त्‍यांच्‍या वकिलांविरुध्‍द वरीलकामी झालेल्‍या नुकसानीची रक्‍कम वसूल करण्‍याचा हक्‍क अबाधित ठेवून तक्रार दाखल करुन घेण्‍यास या मंचास वरीलप्रमणे अधिकार नसल्‍याने सदर तक्रार निकाली काढण्‍यात आली. तक्रारीचे कागदपत्र अभिलेख कक्षात पाठविण्‍यात यावेत.

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.