Maharashtra

Chandrapur

CC/10/148

Shri. Ravi Suryabhan Parise,Warora - Complainant(s)

Versus

M/s Rasoya Proteins Ltd,Through Manufacturer ,Wanjari Tah Wani - Opp.Party(s)

Adv. V.A.Dhawas

12 May 2011

ORDER


Arange sequence number in year 2009 confo-ch-mh@nic.in
Complaint Case No. CC/10/148
1. Shri. Ravi Suryabhan Parise,WaroraAge 34 Occ-Persanal.R/o Abhyankaar Ward Warora Tah Warora.ChandrapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. M/s Rasoya Proteins Ltd,Through Manufacturer ,Wanjari Tah WaniAt Village WanjariTah Wani Dist- YeotmalYeotmalMaharashtra2. M/s Govind Traders Warora Through Govind Sitaram WarghaneHanuman Ward Warora.Tah Warora Dist - ChandrapurChandrapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri Anil. N.Kamble ,PRESIDENTHONABLE MR. Sadik M. Zaveri ,MEMBERHONABLE MRS. Adv. Varsha Jamdar ,MEMBER
PRESENT :

Dated : 12 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

::: नि का ल  प ञ   :::

          (मंचाचे निर्णयान्वये, अधि. वर्षा जामदार, मा. सदस्या)

                  (पारीत दिनांक :12.05.2011)

 

1.           अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. अर्जदाराचा भ्रमणध्‍वनी विक्री व दुरुस्‍तीचा व्‍यवसाय आहे.  गै.अ.क्र. 1 ही सोयाबीन खाद्यतेल निर्माती कंपनी असून सदर कंपनीचा रासोया प्रोटीन्‍स लि. या नावाने मौजा वांजरी, तह.वणी, जि.यवतमाळ या ठिकाणी तेल निर्मीतीचा कारखाना आहे. गै.अ.क्र.2 हे मेसर्स गोवींद ट्रेडर्स या नावाने गै.अ.क्र.1 ने निर्मीत मालाची ठोक विक्री वरोरा येथे करतात.  दि.13.7.10 रोजी अर्जदाराचे घरी पाळण्‍याचा कार्यक्रम असल्‍यामुळे अर्जदाराने रासोया सोयाबीन तेलाचा 15 लिटरचा डब्‍बा रुपये 670/- ला खरेदी केला. तो डब्‍बा घरी आणून उघडला असता, त्‍यामध्‍ये 4 मृत उंदीर तेलावर सडलेल्‍या अवस्‍थेत तरंगतांना आढळले.  तसेच, डब्‍यामध्‍ये प्‍लास्‍टीक दो-या व पिशवी अश्‍या वस्‍तू आढळल्‍या.  सदर तेलाला वास लागल्‍याचे लक्षात आले तेंव्‍हा आजु-बाजूचे नागरीक ही गोळा झाले व हे तेल खाण्‍या योग्‍य नसून आरोग्‍यास हानीकारक असल्‍याचा सल्‍ला दिला. अर्जदाराने गै.अ.क्र.2 च्‍या ही बाब लक्षात आणून दिली, त्‍यावेळी गै.अ.क्र.2 नी सर्व आरोप फेटाळून लावले व आम्‍हाला सील बंद डब्‍बे येतात, तेच डब्‍बे आम्‍ही विकतो असे त्‍यांनी सांगितले.  गै.अ.क्र.2 ने तेलात भेसळ असल्‍याचे लक्षात आल्‍यावरही जबाबदारी घेण्‍यास नकार दिला व याची तक्रार अन्‍न, औषध प्रशासनाकडे करा असे उध्‍दटपणे अर्जदाराला सांगितले.  अर्जदाराने सदर बाबीची तक्रार अन्‍न व औषध प्रशासन चंद्रपूर यांचेकडे केली असता दि.14.7.10 रोजी अन्‍न व औषध प्रशासन चंद्रपूर यांनी सदर प्रकरणाची दखल घेवून तेलाचे नमूने तपासाकरीता घेतले.  त्‍यानंतर, रितसर तपासणी करण्‍याकरीता ते प्रयोग शाळेत पाठविण्‍यात आले.  गै.अ.नी अर्जदारास खाण्‍यास अयोग्‍य, हानीकारक वस्‍तूची विक्री करुन ग्राहक तक्रार कायद्याच्‍या तरतुदीचे उल्‍लंघन केले आहे.  गै.अ.च्‍या ञुटीपूर्ण वस्‍तुच्‍या विक्रीमुळे अर्जदाराला मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसान झाले व झालेल्‍या प्रकारामुळे अपमानीत व्‍हावे लागले. त्‍यामुळे, गै.अ. नुकसान भरपाईपोटी अर्जदारास रुपये 3,00,000/- देण्‍यास पाञ आहे.  अर्जदाराने दि.26.7.10 रोजी गै.अ.ना नोटीस बजावली व नुकसान भरपाईची मागणी केली.  गै.अ.क्र.1 ने नोटीसचे खोटे उत्‍तर दिले व गै.अ.क्र.2 ला दि.29.7.10 ला नोटीस मिळूनही नोटीसची कुठलीही दखल घेतली नाही.  त्‍यामुळे, अर्जदारांनी सदर तक्रार दाखल करुन गै.अ.क्र.1 व 2 ला ञुटीपूर्ण व सदोष वस्‍तुची विक्री केल्‍याबद्दल दोषी ठरविण्‍यात यावे व नुकसान भरपाई व मानसिक ञासापोटी रुपये 3,00,000/- गै.अ.नी अर्जदाराला द्यावे, असा आदेश पारीत करावा, ही विनंती केली आहे.  अर्जदाराने नि.18 अन्‍वये 10 मुळ दस्‍ताऐवज व नि.13 नुसार 2 दस्‍ताऐवज दाखल केलेले आहे. 

 

2.          अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ.ना नोटीस काढण्‍यात आले.  गै.अ.क्र.1 ने हजर होऊन नि.5 नुसार आपले लेखी बयान दाखल केले.  गै.अ.क्र.1 चे म्‍हणणे नुसार त्‍याचा अर्जदाराशी काहीही संबंध नाही व तो अर्जदाराला ओळखत देखील नाही.  गै.अ.क्र.1 ही रिफाईंड सोयाबीन तेलाची निर्मीती करते व तिचा कारखाना वांजरी, ता.वणी येथे असून, गै.अ.क्र.2 गोविंद ट्रेडर्स हे इतर तेला सोबतच गै.अ.क्र.1 चा माल सुध्‍दा ठेवतात ही बाब गै.अ.क्र.1 ने मान्‍य केली आहे.  गै.अ.क्र.1 ने अर्जदाराचे इतर कथन अमान्‍य केले आहे.  गै.अ.क्र.1 चे म्‍हणण्‍यानुसार अर्जदाराने पैसे घेण्‍यासाठी खोटी केस केलेली आहे.  अर्जदारा जवळ गै.अ.क्र.1 चा तेलाचा पिपा घेतल्‍याबद्दल कोणतेही बिल नाही व तसे दाखल केलेले ही नाही, त्‍यामुळे गै.अ.क्र.1 अर्जदारास कोणतीही रक्‍कम देण्‍यास तयार नाही व अर्जदाराला हे मागण्‍याचा अधिकार नाही. अर्जदार हा गै.अ.चा ग्राहक नसल्‍यामुळे अर्जदाराची केस खारीज करण्‍यात यावी व गै.अ.ची बदनामी केल्‍याबद्दल अर्जदारावर रुपये 10,000/- दंड लावून खर्चाची रक्‍कम गै.अ.क्र.1 ला द्यावी, अशी विनंती गै.अ.क्र.1 ने केली आहे. 

 

3.          गै.अ.क्र.2 ने हजर होऊन नि.9 नुसार आपले लेखी बयान दाखल केले. गै.अ.क्र.2 चे म्‍हणणे नुसार अर्जदाराचे तक्रारीतील संपूर्ण कथन खोटे आहे म्‍हणून अमान्‍य केले आहे.  अर्जदाराने गै.अ.क्र.2 कडून दि.13.7.10 रोजी रासोया सोयाबीन तेलाचा 15 लिटरचा डब्‍बा रुपये 670/- खरेदी केला नाही.  अर्जदाराने सदर डब्‍बा कुठून खरेदी केला याची माहिती गै.अ.क्र.2 ला नाही.  मेसर्स गोविंद ट्रेडर्स हे दुकान राजेंद्र प्रसाद वार्ड वरोरा येथे असून त्‍या दुकानाचा मालक गोविंद सिताराम वरघने नाही.  अर्जदाराने दाखल केलेली कागदपञ खोटे व बनावटी असून निव्‍वळ गै.अ.कडून मोठी रक्‍कम उकळण्‍याच्‍या हेतुने गै.अ.क्र.2 वर खोटे आरोप लावून सदर तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्‍या अर्जात नमूद केलेला मजकूर आणि दाखल दस्‍ताऐवज यामध्‍ये तफावत आहे, त्‍यावरुन दिसून येते की, अर्जदार हा बनावटी व खोटे आरोप करीत आहे.  अर्जदाराने अर्जामध्‍ये त्‍याचे काय नुकसान झाले याबाबत काहीही नमूद केलेले नाही.  अर्जदाराने 15 लिटर तेलाचा डब्‍बा हा सिलबंद परिस्थितीत खरेदी केलेला आहे.  त्‍यामुळे, फक्‍त गै.अ.क्र.1 विरुध्‍द सदरची केस दाखल करायला हवी होती.  गै.अ.क्र.2 चा सदर केसशी काहीही संबंध नाही, तसेच अर्जदार हा गै.अ.क्र.2 चा ग्राहक ही नाही.  त्‍यामुळे, अर्जदाराने विनाकारण गै.अ.क्र.2 ला पक्ष म्‍हणून जोडले आहे.  अर्जदाराचा अर्ज खारीज करण्‍यात यावा अशी मागणी गै.अ.क्र.2 ने केलेली आहे.  गै.अ.क्र.2 ने आपल्‍या लेखी बयानासोबत नि.10 नुसार 1 दस्‍ताऐवज दाखल केलेले आहे.  

 

4.          अर्जदाराने नि.10 नुसार शपथपञ दाखल केले, तसेच गै.अ.क्र.1 ने नि.16 नुसार शपथपञ दाखल केलेले आहे. गै.अ.क्र.2 ने त्‍यांचे लेखी बयान हेच पुरावा समजण्‍यात यावे अशी पुरसीस नि.17 वर दाखल केलेली आहे.

 

5.          अर्जदाराने नि.13 नुसार अन्‍न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांनी परिक्षण केलेल्‍या नमुन्‍याचा रिपोर्ट दाखल करण्‍याबाबत परवानगी मागीतली, त्‍यावर मा.मंचानी आदेश करुन अन्‍न निरिक्षक श्रीमती एस.व्‍ही.बाभरे, अन्‍न व औषध प्रशासन चंद्रपूर यांना मुळ रेकॉर्ड घेवून पुराव्‍यासाठी मंचात हजर राहण्‍याचा आदेश दिला.  त्‍यानुसार, नि.24, 25 हा रिपोर्ट दाखल करण्‍यात आला.  श्रीमती एस.व्‍ही.बाभरे यांचा दि.19.4.11 रोजी शपथेवर पुरावा घेण्‍यात आला व गै.अ. चे वकीलांमार्फत उलटतपासणी घेण्‍यात आली.  अर्जदाराने व गै.अ.नी दाखल केलेले शपथपञ, दस्‍ताऐवज व सर्व पक्षाच्‍या युक्‍तीवादावरुन  खालील कारणे व निष्‍कर्ष काढण्‍यात येत आहेत. 

 

                        @@ कारणे व निष्‍कर्ष @@

 

6.          अर्जदाराने नि.21 अ-1 नुसार मे.गोविंद  सिताराम वरघने यांच्‍या दुकानाची रासोया सोयाबिन तेल रुपये 670/- ची 15 लिटर तेलाच्‍या डब्‍याची पावती दाखल केली आहे.  अर्जदाराने, गै.अ.क्र.2 म्‍हणून मे.गोविंद ट्रेडर्स वरोरा तर्फे श्री गोविंद सिताराम वरघने यांना जोडले आहे.  सदर तक्रार, दाखल करण्‍यापूर्वी अर्जदाराने नि.21 अ-6 नुसार गै.अ.क्र.2 ला नोटीस पाठविली होती.  नोटीस दि.20.7.10  गै.अ.क्र.2 ला नि.21 अ-9 प्रमाणे 29.7.10 ला मिळाली असून त्‍याची पोच पावती दाखल केली आहे.  अर्जदाराने तक्रार दि.1.10.10 रोजी दाखल केली असून नोटीस व तक्रारी मध्‍ये 2 महिन्‍याच्‍या वर काळ उलटला आहे.  अर्जदाराने तक्ररी मध्‍ये गै.अ.क्र.2 ला मे.गोविंद ट्रेडर्स वरोरा तर्फे श्री गोविंद सिताराम वरघने यांना जोडले आहे.  म्‍हणजे पत्‍यामध्‍ये कुठलाही बदल झालेला नसतांना गै.अ.क्र.2 ने पुन्‍हा तक्रारीची नोटीस स्विकारली आहे.  मधल्‍या काळात गै.अ.क्र.2 ने कधीही मे.गोविंद ट्रेडर्स चे ते मालक नसल्‍याचे म्‍हटले नाही.  परंतु, सदर तक्रारी मध्‍ये हजर होऊन पहिल्‍यांदाच नि.9 वरील लेखी बयानात गोविंद सिताराम वरघने हे मे.गोविंद ट्रेडर्सचे मालक नसल्‍याचे म्‍हटले आहे. गै.अ.क्र.2 ने नि.10 ब-1 नुसार गोविंद ट्रेडर्स ह्या नावाच्‍या दुकानाचे नोंदणी प्रमाणपञ दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये मालकाचे नाव श्री शंभुनाथ गोविंद वरघने असल्‍याचे नमुद असले तरी गोविंद सिताराम वरघने ह्याचा गोविंद ट्रेडर्सच्‍या व्‍यवहाराशी संबंध असल्‍याचे स्विकारलेल्‍या नोटीस आणि त्‍यांचे कडेच असलेल्‍या नोंदणी प्रमाणपञा वरुन स्‍पष्‍ट आहे.  ह्यावरुन, स्‍पष्‍ट होते कि, गै.अ.क्र.2 ने फक्‍त जवाबदारी टाळण्‍यासाठी ही बाब समोर आणली.  गै.अ.क्र.2 ने अर्जदाराने पाठविलेला नोटीस व कोर्टाचा नोटीस स्विकारला असल्‍यामुळे गै.अ.क्र.2 ला त्‍यातून पलायन करता येणार नाही.  ह्याउलट, गै.अ.क्र.1 ने रासोया सोयाबिन तेलाची निर्मीती करीत असल्‍याचे मान्‍य करुन गै.अ.क्र.2 गोविंद ट्रेडर्स हे इतर तेलासोबत गै.अ.क्र.1 चा माल ठेवतात असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे.  त्‍यामुळे, अर्जदाराने नि.21 अ-1 वर दाखल केलेली पावती खोटी असल्‍याचे कारण नाही.  एकंदर, परिस्थितीवरुन गै.अ.क्र.2 कडून अर्जदाराने रासोया सोयाबीन तेलाचा 15 लिटरचा डब्‍बा घेतला, ही बाब सिध्‍द होते.

 

7.          अर्जदाराने, नि.25 नुसार अन्‍न निरीक्षक, अन्‍न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांचा रासोया रिफाईन्‍ड तेलाचा घेतलेल्‍या नमुन्‍याचा परिक्षण रिपोर्ट दाखल केला आहे.  त्‍यामध्‍ये, त्‍यांनी अर्जदाराकडून गोळा केलेल्‍या नमुन्‍याच्‍या परिक्षणा नंतर तेलाला किळसवाणा वास असून मेलेल्‍या उंदीराचा वास असल्‍याचे म्‍हटले आहे.  त्‍यामुळे, हे तेल मानवी उपयोगासाठी योग्‍य नाही असा रिपोर्ट दिला आहे.  गै.अ.क्र.1 व 2 नी अन्‍न निरीक्षक श्रीमती स्मिता विवेक बाभरे यांची उलटतपासणी घेतली. ती नि.33 वर आहे.  उलटतपासणीमध्‍ये श्रीमती बाभरे यांनी सांगितले कि, अर्जदाराने घेतलेल्‍या तेलाच्‍या डब्‍याच्‍या बॅच नंबरचा माल गै.अ.क्र.2 कडे नव्‍हता. असे जरी असले तरी त्‍या बॅचचा माल का नव्‍हता, गै.अ.क्र.1 ने गै.अ.क्र.2 ला त्‍या बॅच चा माल दिला होता किंवा नाही, ह्याचा पुराव्‍या मध्‍ये स्‍पष्‍ट खुलासा झालेला नाही. त्‍यामुळे, फक्‍त अर्जदाराने घेतलेल्‍या तेलाचा बॅच नंबर चा माल गै.अ.क्र.2 कडे उपलब्‍ध नसल्‍या कारणाने अर्जदाराने तेलाचा डबा गै.अ.क्र.2 कडून न घेतल्‍याचे सिध्‍द होत नाही.  परंतु, प्राथमिक दृष्‍टया हे स्‍पष्‍ट आहे कि, अर्जदाराच्‍या घेतलेल्‍या डब्‍या मध्‍ये बाहेरील जन्‍तु (Forign Body)  होते आणि ते तेल उपयोगा योग्‍य नव्‍हते.  अन्‍न निरीक्षकाने दिलेल्‍या रिपोर्ट वरुन ही बाब पुरेशी सिध्‍द होते.  अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.35 वरील अन्‍न निरिक्षक यांनी घेतलेल्‍या बयाना मध्‍ये तेलाच्‍या डब्‍यात मेलेल्‍या उंदिराचे पिल्‍ले, दोरीचे तुकडे व इतर वस्‍तु निघाल्‍याचे म्‍हटले आहे.  तसेच, श्री मनोज मोहनराव राऊत यांनीही अर्जदाराच्‍या कथनाला दुजोरा दिला आहे.  गै.अ. नी कुठेही अर्जदाराचे त्‍याचे विरुध्‍द खोटी केस करण्‍याचे कारण सांगितले नाही.  फक्‍त पैसे उकळण्‍याच्‍या हेतुने ही तक्रार गै.अ. विरुध्‍द टाकल्‍याचे म्‍हटले आहे.  परंतु, तक्रारीतील दस्‍तऐवज नि.13 अ-2, अन्‍न निरिक्षक यांनी दिलेला रिपोर्ट ह्यांनी गै.अ.विरुध्‍द बोलल्‍याचे कोणतेही कारण स्‍पष्‍ट झालेले नाही.  इतकेच नव्‍हेतर अर्जदाराने फक्‍त रुपेय 670/- च्‍या तेलाच्‍या डब्‍यासाठी गै.अ.विरुध्‍द खोटी तक्रार करण्‍याचे कोणतेही कारण समोर आले नाही.  उलटपक्षी, अर्जदाराने डब्‍या मध्‍ये अवांच्छित वस्‍तु दिसल्‍या बरोबर ताबडतोब गै.अ.कडे जाऊन सांगितले.  पण, गै.अ.क्र.2 ने जवाबदारी टाळली.  त्‍यामुळे, गै.अ.विरुध्‍द खोटी तक्रार करण्‍याचे कुठलेही संयुक्‍तीक व ठोस कारण नसतांना एका जागरुक ग्राहकाच्‍या भुमिकेतून अर्जदाराने तक्रार केली असून अर्जदाराचे कथन ग्राह्य धरण्‍यासारखे आहे.  किंबहुना त्‍यावर अविश्‍वास कारण्‍यासारखे सबल कारण गै.अ.नी समोर आणले नाही.  इतकेच नव्‍हेतर गै.अ.क्र.1 व 2 नी वर्तमान पञात त्‍यांचे विरुध्‍द बातमी छापून आल्‍यावरही कोणतीही कार्यवाही केली नाही. गै.अ. जर धुतल्‍या तांदळासारखे असते तर त्‍यांना अर्जदाराने खोटे-नाटे छापून आणल्‍या बाबत कार्यवाही करण्‍याची पूर्ण संधी उपलब्‍ध होती.  परंतु, गै.अ. यांनी जुलै 2010 ते दि.1.10.10 (तक्रारीची तारीख) पर्यंत कुठलिही हालचाल केली नाही व त्‍यांचे वर केलेले आरोप ही नाकारले नाही.  इतकेच नव्‍हे तर गै.अ.क्र.1 सारख्‍या प्रसिध्‍द कंपनीची बदनामी झाल्‍याबद्दल मानहानीचा दावाही केला नाही.  गै.अ. ची शांतता (Silence) वरुन हे स्‍पष्‍ट होते कि, गै.अ. हे ञुटीपूर्ण कृतीत गुंतले आहेत. ग्राहकाला मानवी उपयोगासाठी आरोग्‍याला योग्‍य माल विकणे ही प्रत्‍येक विक्रेत्‍याची कायदेशीर जबाबदारी आहे.  तसेच, उत्‍पादकाने माल विक्रीसाठी पाठवितांना त्‍यामध्‍ये हानिकारक जन्‍तु, वस्‍तुची भेसळ झालेली नाही ह्याची सील बंद पॅकिंग करण्‍यापूर्वी काळजी घेणे ही कायदेशीर जवाबदारी आहे.  सदर प्रकरणामध्‍ये गै.अ.क्र.1 कडून सिल बंद तेलाचा डबा गै.अ.क्र.2 ला विक्रीसाठी पाठविण्‍यात आला.  गै.अ.क्र.2 ने सिल बंद डब्‍याची विक्री अर्जदाराला केलेली आहे.  त्‍यामुळे, गै.अ.क्र.1 हे निर्माते म्‍हणून झालेल्‍या ञुटीपूर्ण सेवा व अनुचित व्‍यापार पध्‍दतीसाठी जवाबदार आहेत.  गै.अ.क्र.1 ने अवलंबिलेल्‍या अनुचित व्‍यापार पध्‍दतीमुळे अर्जदाराला नाहक मानसिक, शारिरीक व आर्थिक ञास सोसावा लागला.  अर्जदाराने ही बाब गै.अ.क्र.2 च्‍या निदर्शनात आणून दिल्‍यावर गै.अ.क्र.2 ने विक्रेता म्‍हणून असलेली त्‍याची जवाबदारी झटकून दिली.  गै.अ.क्र.2 ने अर्जदाराला योग्‍य वेळी योग्‍य मार्गदर्शन व मदत केली असती तर अर्जदाराला ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्‍याची वेळ आली नसती.  परंतु, गै.अ.क्र.2 ने आपली जवाबदारी झटकल्‍यामुळे अर्जदाराला वेळ व पैसा खर्ची घालून ग्राहक मंचात तक्रार करुन दाद मागावी लागली.  ह्यासाठी, गै.अ.क्र.2 हे जवाबदार आहेत. 

 

8.          अर्जदाराने, मा. राज्‍य आयोग, मुंबई यांनी दिलेल्‍या निर्णयाचा दाखला दिलेला आहे.

What is pertinent to note is that fact that sample was yellowish coloured liquid along with dead  insect and fragments and said sample was contravening rule 32(e) and (f) of Prevention of Food Adulteration Rules, 1955 and was also unfit for human consumption.  It was a drink hazardous to health and when it was packed bottle, the manufacturer of the drink can not escape its liability if consumer finds dead insect in the drink.

 

                        Pepsico India Holdings Private Limited & other

                        -Vs.- Shri. Murlidhar Ramdas Patil & other

                        First Appeal No.431/2008, Date of Order – 31/3/2009.

 

            ह्या अपील मध्‍ये मा.राज्‍य आयोग यांनी दिलेले मत या प्रकरणालाही लागु पडते.

9.          मा.राज्‍य आयोग, पश्चिम बंगाल, कलकत्‍ता ह्यांनी दिलेल्‍या निर्णयाचा दाखला अर्जदाराने दिलेला आहे.

 

Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(c) – Defective goods – Soft drink Limca found containing foreign article – Complainant claiming compensation of Rs. Ten lacs – Laboratory analysis could not make clear whether any sterilization was made at the time of filling of bottle or whether content of bottle was spurious – Presence of foreign substance by it –self was a defect in goods – Opp. Parties were guilty of selling soft drink defective in nature – Nothing to show that complainant suffered loss to the tune of Rs.10 lakhs – Compensation of Rs.5,000/- awarded.

 

Tarun Kumar Acharyya & Anr.-Vs.-Calcutta Soft Drinks Pvt. Ltd.& Ors.

1998 (1) CPR 608

 

            अर्जदाराच्‍या तक्रारीत ही Forign substance आढळल्‍याचा रिपोर्ट प्राप्‍त झाला आहे. त्‍यामुळे, ह्या प्रकरणात दिलेला निर्णय अर्जदाराच्‍या तक्रारीला लागु होतो.

 

10.         मा.राष्‍ट्रीय आयोग, न्‍यु दिल्‍ली यांनी Revision Petition No.3566/2006, Cadbury India Ltd. –Vs.- L.Niranjan  मधील कथन खालील प्रमाणे आहे.

Before a Consumer Forum, question which is required to be decided is why a small person, who  purchased a birthday gift, would file a false complaint against a multi-national company and litigate for a small amount not only before the Consumer Fora but before the Apex Court. In our view, there is no reason to disbelieve the complainant who immediately approached the Consumer Fora with the chocolate which was infested with worms.  Public Analyst’s report is a subsequent aspect.

 

11.          वरील दाखल्‍यातील निर्णय आणि माननीय राज्‍य आयोग आणि राष्‍ट्रीय आयोगाने दिलेल्‍या मता नुसार अर्जदाराला मिळालेली सेवा ही ञुटीपूर्ण सेवा असून सदोष मालाची विक्री गै.अ.नी करुन अर्जदाराच्‍या संदर्भात अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा वापर केला आहे. त्‍यामुळे, गै.अ. त्‍याबाबत नुकसान भरपाई देण्‍यास पाञ आहे, ह्या निर्णया प्रत हे न्‍यायमंच आले असून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                        // अंतिम आदेश //

      (1)       अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.

(2)   गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये 5000/- व गैरअर्जदार क्र.2 ने रुपये 2000/- अर्जदाराला द्यावे.

(3)   गैरअर्जदार क्र.1 व 2 नी तक्रारीचा खर्च रुपये 2000/- एकञीतपणे अर्जदाराला द्यावे.

(4)   आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आंत करावे. तसे न केल्‍यास नुकसान भरपाईच्‍या रकमेवर 30 दिवसानंतर 9 % प्रमाणे व्‍याज आकारणी करावी.

      (5)   आदेशाची प्रत सर्व पक्षांना देण्‍यात यावी.   

 

चंद्रपूर,

‌दिनांक :12/05/2011.

           

 

 


[HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER