Maharashtra

Nagpur

CC/169/2018

MILIND MANOHARRAO SAWARKAR - Complainant(s)

Versus

M/S RAM AGRO SERVICES, THROUGH PROPRIETOR-MR. PRAKASH LOKHANDE - Opp.Party(s)

ADV. JAYESH A. VORA

26 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/169/2018
( Date of Filing : 15 Feb 2018 )
 
1. MILIND MANOHARRAO SAWARKAR
R/O. PLOT NO. 160, TELEOM COLONY, RANAPRATAP NAGAR, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S RAM AGRO SERVICES, THROUGH PROPRIETOR-MR. PRAKASH LOKHANDE
H.O. YENDE COMPLEX, 1ST FLOOR, MAHDA COLONY ROAD, ARVI NAKA, WARDHA-442001
WARDHA
MAHARASHTRA
2. M/S RAM AGRO SERVICES, THROUGH PROPRIETOR-MR. PRAKASH LOKHANDE
BRANCH OFF. AT, BESIDES VAIDYA NURSING HOME ORANGE CITY HOSPITAL SQUARE, RING ROAD, NAGPUR-440015
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 26 Feb 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ ही भागीदारी फर्म असुन बि बियाने विक्रीचा व्‍यवसाय करते. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे खसरा नंबर २०८ ब, खापरी (मोरेश्‍वर) टाकळघाट, तह. हिंगना, जि. नागपूर येथील त्‍याचे स्‍वतःचे शेत जमिनीत थायलंड जातीचे लिंबाचे १०० कलम (रोपे) लावण्‍याचे ठरले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक २ यांचेकडुन रुपये १८० प्रती कलम (रोपे) प्रमाणे विकत घेण्‍याचे ठरविले. विरुध्‍द पक्षाने ऑर्डर चे तारखेपासुन १५ दिवसाच्‍या आत कलम (रोपे) पुरवठा करण्‍याचे आश्‍वासीत केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला १०० लिंबाचे कलम (रोपे) खरेदीपोटी धनादेश क्रमांक ०००७९६, रुपये १८,०००/-, बॅंक ऑफ इंडिया, टाकळघाट व्‍दारे अदा केले. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍यापोटी पावती अदा केली. कबुलीप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला १०० लिंबाची रोपांचा दिनांक २३/०६/२०१७ रोजी किंवा त्‍यापूर्वी पुरवठा करावयास पाहिजे होता.
  3. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे १०० थायलंड लिंबाची रोपांचा (कलम)  ऑर्डर दिल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने त्‍याचे एक एकर शेत जमिनीत कापूस व मसुर दाळ ची पेरणी केली नाही. तक्रारकर्त्‍याने दिनांक १५/६/२०१७ ते दिनांक १७/६/२०१७ या कालावधीत लेबर लावुन शेतजमिनीत १०० लिंबाची रोपे लावण्‍याकरीता १०० लहान खड्डे तयार केले व त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याला रुपये ७,५००/- एवढा खर्च आला. विरुध्‍दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला दिनांक २३/६/२०१७ पर्यंत थायलंड जातीची लिंबाचा रोपाचा पुरवठा केला नाही. तक्रारकर्त्‍याने लिंबाची रोपाची उतरण करण्‍याकरीता दिनांक २२/६/२०१७ ते दिनांक २३/६/२०१७ पर्यंत दोन लेबर ची नियुक्‍ती   केली व त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याला रुपये १,८००/- लेबरला मजुरी द्यावी लागली. तक्रारकर्त्‍याने दिनांक २३/६/२०१७ नंतर दिनांक १०/०७/२०१७ पर्यंत कामाचे दिवशी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे बरेचदा भेट दिली व त्‍याचा काही उपयोग झाला नाही. विरुध्‍द पक्षाचे वागणूकीमुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ११/७/२०१७ रोजी विरुध्‍द पक्षाशी पञव्‍यवहार केला व त्‍याव्‍दारे ऑर्डर रद्द केला आणि रुपये १८,०००/- ची मागणी केली. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी ऑर्डर रद्द झाल्‍याची प्रत प्राप्‍त झाल्‍यावर विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍याला रुपये १८,०००/- परत करण्‍यास नकार दिला. तक्रारकर्त्‍याने पोस्‍ट डेटेड धनादेश देण्‍याची विरुध्‍द पक्षाला ऑफर दिल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी धनादेश क्रमांक ०७१७२८, दिनांक १०/८/२०१७, रुपये १८,०००/-, एक्‍सीस बॅंक वर्धा चा धनादेश तक्रारकर्त्‍याला दिला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक २ यांचेकडुन प्राप्‍त धनादेश बॅंक ऑफ इंडिया, राणाप्रताप नगर नागपूर या शाखेत जमा केला असता सदरचा धनादेश Not Sufficient Fund  या रिटर्ण मेमोसह परत आला व त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यामधुन क्‍लीअरींग चार्जेस पोटी रुपये २९५ डेबीट करण्‍यात आले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे दिनांक १२/१३/८/२०१७ ला भेट दिली त्‍यावेळी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी क्षमा मागितली व तक्रारकर्त्‍याला रुपये १८,०००/- लवकर देण्‍याबाबत आश्‍वासीत केले. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍यानी दिलेला धनादेश पुनःश्‍य बॅंकेत वटविण्‍याकरीता विनंती केली. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने बॅंकेत वटविण्‍याकरीता धनादेश सादर केला असता सदरचा धनादेश दिनांक ३/१०/२०१७ रोजी Insufficient Fund  या शे-यासह रिटर्ण मेमो बॅंकेने तक्रारकर्त्‍याला दिला व तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातुन रुपये २९५/- डेबीट करण्‍यात आले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत विरुध्‍दपक्ष क्रमांक १ व २ ला दिनांक १६/१०/२०१७ रोजी कायदेशीर नोटीस बजावली व त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षाला रुपये १८,०००/- व धनादेश न वटविण्‍यापोटी त्‍याचे खात्‍यातुन खर्ची घातलेली रुपये ५९०/- ची मागणी केली. विरुध्‍द पक्षाला नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍याने त्‍याची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला रुपये १८,०००/- द.सा.द.शे. १८ टक्‍के व्‍याजासह दिनांक ९/६/२०१७ पासुन व्‍याज आकारुन तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष मिळेपर्यंत देण्‍याचे आदेशीत करावे.
  3. तसेच रुपये ५९०/- द.सा.द.शे. १८ टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याचे आदेशीत करावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना मानसिक व शारिरीक ञासापोटी व नुकसान भरपाई म्‍हणून रुपये ५०,०००/- परत करण्‍याचे आदेशीत करावे व तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- देण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली व ती प्राप्‍त होऊनही ते मंचासमक्ष हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक २९/६/२०१८ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन तसेच तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.  

      अ.क्र.                            मुद्दे                                                             उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                           अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

 

  1. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे खसरा नंबर २०८ ब, खापरी (मोरेश्‍वर) टाकळघाट, तह. हिंगना, जि. नागपूर येथील त्‍याचे स्‍वतःचे शेत जमिनीत थायलंड जातीचे लिंबाचे १०० कलम (रोपे) लावण्‍याचे ठरले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक २ यांचेकडुन रुपये १८० प्रती कलम (रोपे) प्रमाणे विकत घेण्‍याचे ठरविले. विरुध्‍द पक्षाने ऑर्डर चे तारखेपासुन १५ दिवसाच्‍या आत कलम (रोपे) पुरवठा करण्‍याचे आश्‍वासीत केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला १०० लिंबाचे कलम (रोपे) खरेदीपोटी धनादेश क्रमांक ०००७९६, रुपये १८,०००/-, बॅंक ऑफ इंडिया, टाकळघाट व्‍दारे अदा केले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍याकडुन लिंबाचे रोपे विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त होऊनही तक्रारकर्त्‍यास लिंबाची रोपांचा पुरवठा केला नाही. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट  मत आहे. तक्रारकर्त्‍याने लिंबाच्‍या रोपाच्‍या लावण करण्‍याकरीता १०० लहान गड्डे तयार केली होती तसेच विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला लिंबाची रोपे न पुरविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या १ एकर जमिनीत पेरणी करता आली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे आर्थिक नुकसान झाले तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे त्‍याने दिलेल्‍या लिंबाचा रोपाचे खरेदीपोटी दिलेली रक्‍कम रुपये १८,०००/- परत मिळण्‍याची मागणी केली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला धनादेश क्रमांक ०७१७२८, दिनांक १०/०८/२०१७ दिला. सदरचा धनादेश अनुक्रमे  दिनांक ११/०८/२०१७ तसेच दिनांक ३/१०/२०१७ रोजी Insufficient Fund या शे-यासह बॅंकेकडुन तक्रारकर्त्‍याला परत करण्‍यात आला व त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याला प्रत्‍येकी २९५/- इतके सेवा चार्ज बॅंकेकडुन लावण्‍यात आले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन लिंबाच्‍या रोपाचे विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम रुपये १८,०००/- प्राप्‍त होऊनही तक्रारकर्त्‍याला लिंबाचा रोपाचा पुरवठा केला नाही तसेच अनेकवेळा विनंती करुनही विक्रीपोटी घेतलेली रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत केली नाही. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला रुपये १८,०००/- अदा करावे व त्‍यावर द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याज दिनांक ९/६/२०१७ पासुन तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍दपक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे रुपये ५९०/- तक्रारकर्त्‍याला अदा करावे व त्‍यावर द.सा.द.शे. १० टक्‍के  व्‍याज दिनांक ३/१०/२०१७ पासुन तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
  4.  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक तसेच नुकसान भरपाईपोटी रुपये २०,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावे तसेच तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.