नि.16 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 104/2010 नोंदणी तारीख – 9/4/2010 निकाल तारीख – 9/7/2010 निकाल कालावधी - 90 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ सौ मंदाकिनी सुभाष देशमुख रा.पुसेसावळी, ता.खटाव जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री बी.बी.जाधव) विरुध्द मे. पुष्कराज बिल्डर्स तर्फे भागीदार 1. प्रकाश मारुती वत्रे 2. अनिल नामदेव सोनवणे रा. प्रकाशनगर, ता. कराड जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांना मतिमंद मुलगी आहे. तिला दररोज कराड येथील मतिमंद मुलांचे शाळेत तिचे वडील घेवून येतात. हा त्रास व खर्च वाचावा म्हणून अर्जदारांनी त्यांचे प्रॉव्हिडंड फंडाचे रकमेवर कर्ज घेवून फलॅट घेणेचे ठरविले. त्यानुसार जाबदार यांचेबरोबर करार झाला. सदरचे सदनिकेची किंमत रु.6 लाख ठरली व कराराचे वेळी अर्जदार यांनी जाबदार यांना रु.10,000/- रोख दिलेले आहेत. तदनंतर अर्जदार यांनी रु.2,80,000/- जाबदार यांना दिले. उर्वरीत रक्कम रु.3,20,000/- अर्जदार जाबदार यांना देणेस तयार होते व आहेत. परंतु जाबदार यांनी करारानुसार एक वर्षाचे आत सदनिकेचा ताबा दिलेला नाही व कराराचा भंग केला आहे. सबब अर्जदार यांना रक्कम रु.2,80,000/- व्याजासह मिळावेत तसेच भाडयाचे खर्चापोटी, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.1 यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोचपावती नि. 10 ला दाखल आहे. जाबदार क्र.2 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा नि.11 ला दाखल आहेत. जाबदार क्र.1 व 2 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदारतर्फे वकील श्री जाधव यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. 4. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि.5 सोबतची कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 6. अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली असता नि.6 ला अर्जदार व जाबदार यांचेमध्ये सदनिका खरेदी बाबत झालेला मूळ करार दाखल आहे. त्यामध्ये सदनिकेचा सविस्तर तपशील तसेच सदनिकेचे मोबदल्यात अर्जदार यांनी जाबदार यांना द्यावयाच्या रकमांचा तपशील नमूद आहे. नि.5/1 व 5/1 ला अर्जदार यांनी जाबदार यांना रोख दिलेल्या रकमांच्या पावत्या दाखल आहेत. सदरच्या पावत्यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार यांना सदनिकेच्या किंमतीपोटी एकूण रु.2,80,500/- दिल्याचे दिसून येते. नि.5/3 ला अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस दाखल आहे. सदरच्या नोटीशीमध्ये अर्जदार यांना जाबदार यांना असे स्पष्ट कळविले आहे की जाबदार यांनी सदनिकेचे किंमतीपोटी उर्वरीत किंमत रु.3,20,000/- अर्जदार यांचेकडून घेवून 15 दिवसांचे आत खरेदीखत करुन द्यावे व कब्जा द्यावा. परंतु जाबदार यांनी सदरचे नोटीसीस कोणतेही उत्तर दिल्याचे दिसून येत नाही, अगर जाबदार यांनी अर्जदार यांना सदनिकेचा ताबा दिल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन किंवा दाखल केलेली कागदपत्रे जाबदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल करुन नाकारलेली नाही. 7. वरील सर्व कारणांचा विचार करता अर्जदार यांनी जाबदार यांना सदनिकेचे किंमतीपोटी रु.2,80,500/- अदा केलेले आहेत परंतु जाबदार यांनी अर्जदार यांचेकडून सदनिकेचे किंमतीपोटी उर्वरीत रक्कम घेवून सदनिकेचा कब्जा अर्जदार यांना देण्याबाबत पुढील कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यावरुन जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे हे स्पष्ट होत आहे. सबब अर्जदार हे जाबदार क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या रक्कम रु.2,80,500/- व्याजासह परत मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. रक्कम रु.2,80,500/- तक्रारअर्ज दाखल ता.9/4/2010 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने देय होणा-या व्याजासह द्यावेत. 2. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 9/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | HONABLE MR. Mr. S. K. Kapse, MEMBER | |