अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/211/08
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 28/12/2005
तक्रार निकाल दिनांक : 02/01/2012
मे. रमेश बिल्डर्स (पुणे) ..)
हर्मस् हेल्थ क्लब, ..)
फलॅट नं. 8/9, हर्मस् हाऊस, 1988 ..)
कॉनव्हेंट स्ट्रीट, कॅम्प, पुणे – 411 001. ..)
तर्फे श्री. रमेश नंजी ठक्कर, ..).. तक्रारदार
विरुध्द
मे. पायोनियर स्पोर्टस्, ..)
अशियाना पार्क, कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रोड, ..)
पुणे – 411 001. ..)
तर्फे श्री. सचिन सिंग ..)... जाबदार
*******************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 2005 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/431/2005 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/211/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांना काढलेल्या नोटीसेस बिनाबताया घर छोड गए या शे-यासह परत आलेले आहेत. या नोटीसेस परत आल्यानंतर तक्रारदार दि.04/01/2011 पासून सातत्याने मंचापुढे गैरहजर आहेत. त्यांनी जाबदारांच्या नोटीसीच्या बजावणीबाबत एक वर्षाच्या कालावधीपर्यंत काहीही तजवीज केलेली नाही याचा विचार करता सदरहू प्रकरण चालविण्यामध्ये त्यांना स्वारस्य नाही या निष्कर्षाअंती प्रस्तूतचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –02/01/2012