ग्राहक तक्रार क्रमांकः-656/2009 तक्रार दाखल दिनांकः-05/10/2009 निकाल तारीखः-25/02/2010 कालावधीः-0वर्ष04महिने20दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.व्हेलेंटीना रॉनी रोझारीयो, जय साईकृपा सोसायटी,तळमजला, रुम नं.101,जेली गल्ली,सिव्हिल हॉस्पीटलसमोर,ठाणे(प)400 603 ...तक्रारकर्ता विरुध्द मेसर्स.फोन अॅन्ड फन, सोनी इरेक्शन,शॉप नं.6,लिली अपार्टमेंट,टेंभी नाका,ठाणे(प) ...वि.प.(एकतर्फा) उपस्थितीः-तक्रारकर्ताः-स्वतःहजर विरुध्दपक्षः-गैरहजर (एकतर्फा) गणपूर्तीः- 1.सौ.भावना पिसाळ, मा.प्रभारी अध्यक्षा 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-25/02/2010) सौ.भावना पिसाळ, मा.प्रभारी अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1)सदरहु तक्रार श्री.व्हेलेंटीना रॉनी रोझारीयो यांनी मे.फोन आणि फन सोनी इरेक्शन, दुकान नं.6,यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्दपक्षकाराकडे दोषयुक्त मोबाईलच्या बदल्यात नविन मोबाईल किंवा त्याची अदा केलेली किंमत रुपये 13,000/- नुकसान भरपाईसकट मागितली आहे. तक्रारदार यांनी त्यांचा मोबाईल मॉडेल नं.डब्ल्यु760आय, सोनी इरेक्शन कंपनीचा त्याची किंमत रुपये 13,000/- विरुध्दपक्षकार यांना देऊन एक वर्षाच्या वॉरंटीवर विकत घेतला. परंतु त्यानंतर सतत चार्जींग होत नसल्याची अडचण निर्माण झाली. त्याच वेळेस तक्रारदार यांनी सदर मोबाईल त्यांच्या सर्व्हीस सेंटरकडे पाठविला. दुरुस्ती केल्यावर वॉरंटीचा काळ असतांनाही त्यांनी तक्रारदारकडून रुपये 500/- दुरुस्ती चार्जेस घेतले. परंतु त्यानंतरही मोबाईल 2/- मध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ लागला व मोबाईल आपोआप चालु बंद होऊ लागला. म्हणून त्यांनी पुन्हा दि.24/09/2009 रोजी सदर दोषयुक्त मोबाईल सोनी एरिक्सन सर्व्हीस सेंटरमध्ये दिला. सदर मोबाईल वॉरंटीच्या काळात असतानाही दुरुस्तीची फी दिल्याशिवाय मोबाईल दिला नाही. व सद्या परिस्थितीत सदर मोबाईल व त्याची भरलेली किंमत रुपये 13,000/- अशा दोन्ही गोष्टी विरुध्दपक्षकार यांचे ताब्यात आहेत. म्हणून तक्रारदार यांनी सदर मोबाईलची किंमत रुपये 13,000/- परत मिळावी. म्हणून तक्रार दाखल केली आहे. विरुध्दपक्षकार यांना मंचाने नोटीस बजावूनही ते मंचापुढे हजर राहीले नाहीत म्हणून त्यांचे विरुध्द दि.03/12/2009 रोजी ''नो डब्ल्यु.एस.'' आदेश झाला. व तदनंतर ''एकतर्फा चौकशी'' करुन या मंचाने पुढील ''एकतर्फा आदेश'' पारीत करीत आहे. आदेश 1)तक्रार क्रमांक.656/2009 अंशतः मजुर करण्यात येत असून सदर तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षकार यांनी रुपये 1,000/-(रुपये एक हजार फक्त) व मानसिक त्रासापोटी रुपये 500/- (रुपये पाचशे फक्त)दयावेत. 2)तक्रारदार यांचा सदर दोषयुक्त मोबाईल विरुध्दपक्षकाराकडेच आहे. त्यामुळे त्याची किंमत रुपये 13,000/-(रुपये तेरा हजार फक्त) त्यांनी तक्रारदारास परत करावी. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासून दोन महिन्याचे आत करावे. अन्यथा तदनतंर वरील रकमेवर 6 टक्के व्याज दयावे लागेल. 3)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 4)तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-25/02/2010 ठिकाणः-ठाणे (श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) सदस्य प्रभारी अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|