Maharashtra

Nagpur

CC/439/2018

SHRI. GANESH SHRIRAM BOPCHE - Complainant(s)

Versus

M/S PAWANSUT REAL ESTATE & LAND DEVELOPERS, THROUGH PROPRIETOR, SHRI. SANTOSH BUREWAR, SURESH BUREWA - Opp.Party(s)

ADV. NANDESHWAR

17 Oct 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/439/2018
( Date of Filing : 29 Jun 2018 )
 
1. SHRI. GANESH SHRIRAM BOPCHE
R/O. NILDOH, MIDC HINGNA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S PAWANSUT REAL ESTATE & LAND DEVELOPERS, THROUGH PROPRIETOR, SHRI. SANTOSH BUREWAR, SURESH BUREWAR
PRINCE COMPLEX, 3th FLOOR, CHATRAPATI CHOWK, WARDHA ROAD, NAGPUR-440025
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. NANDESHWAR, Advocate
For the Opp. Party:
Dated : 17 Oct 2019
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून तक्रारीत असे कथन केले आहे की, विरुध्‍द पक्ष हे शेत जमीन विकत घेऊन ती विकसित करुन त्‍यावर बांधकाम करण्‍याचा व्‍यवसाय करतात. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा- घोटी, शेत सर्व्‍हे नं. 100, प.ह.नं. 75 ता.जि.नागपूर येथील भूखंड क्रं. 63, एकूण क्षेत्रफळ 1614 चौ.फु. हा रुपये 35/- प्रति. स्‍के. फुट प्रमाणे एकूण रक्‍कम रुपये 56,490/- मध्‍ये दिनांक 07.02.2007 रोजी खरेदी करण्‍याचा करार केला. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला भूखंडाच्‍या बुकिंग पोटी अग्रिम राशी म्‍हणून रुपये 5000/- रुपये नगदी स्‍वरुपात  अदा केले व करारानुसार उर्वरित रक्‍कम रुपये 1,000/- प्रतिमाह प्रमाणे अदा करावयाचे ठरले. तसेच करारानुसार सदरच्‍या भूखंडाची विक्रीपत्र दि. 07.02.2007 ते 07.02.2009 पर्यंत करुन देण्‍याचे ठरले होते.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि.  02.08.2009 पर्यंत भूखंड खरेदी पोटी एकूण रक्‍कम रुपये 56,000/- अदा केले व त्‍याच्‍या पावत्‍याही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास निर्गमित केल्‍या. तक्रारकर्त्‍याने करारातील शर्ती व अटीनुसार 50 टक्‍के पेक्षा जास्‍त रक्‍कम अदा केलेली असतांना ही विरुध्‍द पक्षाने प्‍लॉटचे कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारकर्त्‍याने प्‍लॉटची विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता अनेक वेळा विनंती करुन ही त्‍याने दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 19.12.2017 रोजी पोलिस स्‍टेशन राणाप्रतातनगर, नागपूर येथे तक्रार दाखल केली. तरी देखील विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटचे विक्रीपत्र करुन दिले नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मागणी केली की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून वादग्रस्‍त प्‍लॉट पोटी उर्वरित असलेली रक्‍कम स्‍वीकृत करुन तक्रारकर्त्‍याला  वादग्रस्‍त प्‍लॉट क्रं. 63 चे कायदेशीर विक्रीपत्र करुन द्यावे किंवा विरुध्‍द पक्षाने  प्‍लॉट पोटी घेतलेली रक्‍कम रुपये 56,000/-, 24 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

  1.      मंचामार्फत विरुध्‍द पक्षाला पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 01.12.2018 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.       तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार,  दस्‍तावेज, व तोंडी युक्तिवाद ऐकून मंचाने खालील मुद्दे विचारा‍र्थ घेऊन त्‍यावर खालीलप्रमाणे निष्‍कर्ष नोंदविले.

मुद्दे                                     उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे कायॽ           होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ  होय
  3. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे   

              

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा- घोटी, शेत सर्व्‍हे नं. 100, प.ह.नं. 75 ता.जि.नागपूर येथील भूखंड क्रं. 63, एकूण क्षेत्रफळ 1614 चौ.फु. हा रुपये 35/- प्रति. स्‍के. फुट प्रमाणे एकूण रक्‍कम रुपये 56,490/- मध्‍ये दिनांक 07.02.2007 रोजी खरेदी करण्‍याचा करार केला होता व दिनांक 02.08.2009 पर्यंत रुपये 56,000/- अदा केले असल्‍याचे नि.क्रं. 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजावरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या .M/s. Narne Construction P. Ltd. Etc.  Vs. Union of India and ors. Etc.  II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे. तक्रारकर्ता प्‍लॉट खरेदी पोटी देय असलेली उर्वरित रक्‍कम देण्‍यास तयार असतांना ही विरुध्‍द पक्षाने करारानुसार तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट विक्रीपत्र करुन दिले नाही व प्‍लॉट विक्रीपोटी स्‍वीकारलेली रक्‍कम ही परत केली नाही, ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे.  

                    सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून वादग्रस्‍त प्‍लॉट क्रं. 63 ची उर्वरित असलेली रक्‍कम रुपये 490/- स्‍वीकारुन तक्रारकर्त्‍याला वादग्रस्‍त प्‍लॉट क्रं. 63 चे  कायदेशीर विक्रीपत्र नोंदवून द्यावे व प्रत्‍यक्ष प्‍लॉटचा ताबा त्‍वरित द्यावा. तसेच प्‍लॉट विक्रीपत्रकरिता लागणारा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

 

  •    किंवा

 

विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍यास वरील नमूद भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍यास कायदेशी‍ररित्‍या अडचण असल्‍यास विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून  वादग्रस्‍त प्‍लॉटच्‍या विक्रीपोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 56,000/- द.सा.द.शे. 14 टक्‍के दराने व्‍याजासह दिनांक 02.08.2009 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत तक्रारकर्त्‍याला द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारेखपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क  फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.