आदेश (पारीत दिनांक : 29.02.2012) सौ.सुषमा प्र. जोशी, मा. सदस्या यांचे कथनानुसार. तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी की, 1. त.क.यांचा झेरॉक्स मशिन चालविण्याचा व्यवसाय असून, तो त्यांचे उपजिवीकेचे साध आहे. वि.प.यांचा झेरॉक्स मशिन विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त.क.यांनी वि.प. यांचेकडून कॅनन कंपनीची 400(आर.सी)डिजीटल झेरॉक्स मशिन दि.12.04.2011 रोजी रु.75,000/- मध्ये खरेदी केली. वि.प.यांचे मार्केटिंग संचालक यांनी मशिनची योग्यता व
CC-117/2011 आधुनिकतेबाबत सांगीतले होते. वि.प.यांनी दि.13.04.2011 रोजी सदर मशिन त.क.यांचे कडे पाठविली, त्यावेळेश त.क.यांना तीन महिन्याची वारंटी दिली होती. वि.प.यांनी सदर मशिन संबंधी इतर सर्व कागदपत्रे 7 दिवसाचे आंत पोष्टाद्वारे पाठवू असे सांगीतले होते, परंतु आजतागायत पाठविले नाही. दि.15.04.2011 रोजी सदर मशिनमध्ये बिघाड आला. म्हणून त.क.यांनी वारंवार कळविले होते, परंतु वि.प. यांनी सदर मशिन दुरुस्त करुन दिली नाही.त.क. यांची मशिन 18 दिवस बंद राहीली. वि.प.यांनी पुरविलेली झेरॉक्स मशिन योग्य नसल्यामुळे त.क.यांना बराच त्रास सहन करावा लागला आहे, त्यामुळे त.क.यांचे व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. 2. त.क. यांना वि.प.यांनी सदर मशिन दुरुस्त करुन दयावी, म्हणून दि.20.08.2011 रोजी नोटीस पाठविलेले होते त्याचे उत्तर दिले नाही, अशा प्रकारे वि.प.यांनी त.क.च्या सेवेमध्ये त्रृटी केली आहे. वि.प.यांनी सदर मशिन हिंगणघाट येथे झेरॉक्स मशिन सेंटरवर आणून दिली, असल्यामुळे वि.मंचाला सदरची तक्रार चालविण्याचा अधिकार आहे आणि मंचास विनंती की वि.प.यांनी कॅनन कंपनीची 400(आर.सी)डिजीटल झेरॉक्स मशिन पोटी स्विकारलेले रक्कम रु.45,000/- 15 टक्के जून्या मशिन करीता विनिमय केलेले रु.30,000/- व्याजासह परत करावे. जून्या मशिन ऐवजी नविन मशिन वारंटी व ग्यारंटी कागदपत्रासह त्वरीत द्यावी, त.क.ला झालेल्या नुकसानाबाबत रु.60,000/- 9 टक्के दराने व्याज दयावे आणि मानसिक,शारीरीक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरीता रु.5,000/- दयावी, अशी विनंती केली आहे. 3. वि.प. यांनी दि.09.01.2012 रोजी आपले लेखीजबाब दाखल केला असून, सदर त.क.च्या तक्रारीतील कारण पहाता सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. त.क. हे व्यवसायाच्या हेतूने कॅनन कंपनीची 400(आर.सी)डिजीटल झेरॉक्स मशिनचा वापर करण्यात आला होता, म्हणून ग्राहक सरंक्षण कायदा अंतर्गत ग्राहक ठरत नाही तसेच त.क.यांचे सदर तक्रारीमध्ये साक्षी पुराव्याची आवश्यकता आहे असा प्राथमिक आक्षेप केला आहे. वि.प. यांनी त.क.यांचे तक्रारीतील कथने अमान्य केले असून, त.क.यांनी कॅनन कंपनीची 400(आर.सी)डिजीटल झेरॉक्स मशिन ही Rr-constructed (पुननिर्मीत) असते, परदेशातून पूर्वीच्या वापरलेल्या मशिन भारतामध्ये आयात करुन मशिनी वितरकांचे गोडाऊन पर्यंत पोहचविण्यांत येतात व मशिन यथायोग्य बदल व दुरुस्ती करुन त्या मशिन एजंटद्वारे/मॅकेनिक द्वारे विक्री केल्या जातात. सदर मशिनचे मुल्य जास्तीत-जास्त चालविलेल्या मशिनचे मुल्य कमी या पध्दतीने ठरविण्यांत येते. या विषयीची संपूर्ण कल्पना ग्राहकाला देण्यांत येते, अशी कल्पना त.क.यांनी दिली होती. त.क.यांचे
CC-117/2011 तक्रारीनुसार वि.प.यांनी मॅकेनिक पाठवून त्या कॅनन कंपनीची 400(आर.सी)डिजीटल झेरॉक्स मशिन दुरुस्त करुन दिली आहे, त्यामुळे वि.प. यांनी त.क.यांना कोणतीही सेवा पूरविली नाही हे म्हणणे खोटे आहे. वि.प.यांनी सदर मशिन 3 महिन्याची वारंटी दिली होती हे म्हणणे सुध्दा खोटे आहे. 4. सदर मशिन ही ग्यारंटी व वारंटीसह विक्री करण्यांत येते. वि.प.यांनी त.क.च्या मशिन मध्ये जो बिघाड होता तो पूर्णपणे दुरुस्त करुन दिल्यामुळे त.क.ला कोणतीही कमतरता केली नाही, म्हणून त.क.ची तक्रार ही खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली आहे. 5. त.क.यांनी दाखल केलेला अर्ज, वि.प. व उभय पक्षांनी दाखल केलेले, शपथपत्र तसेच उभय यांचे तोंडी युक्तीवाद ऐकण्यांत आला असता, मंचाद्वारे निर्णयान्वीत करण्यांकरीता खालील मुद्दे उपस्थित झाले. 1. त.क.हे वि.प.चे ग्राहक आहे काय ? ............... होय 2. वि.प.यांनी त.क.ला दोषपूर्ण सेवा प्रदान केली आहे काय ? ............ नाही 3. त.क.हे नुकसान भरपाई व तक्रारखर्च घेण्यांस पात्र आहेत काय ? .. अंतिम आदेशाप्रमाणे
कारणे व निष्कर्ष 6. त.क.यांनी सदरहू कॅनन कंपनीची 400(आर.सी)डिजीटल झेरॉक्स मशिन त्यांचे उपजिवीकेसाठी खरेदी केली आहे असे त.क.ने तक्रारीत नमूद केले आहे. त.क.यांनी सदर मशिनचा वापर व्यवसाय कारण्याकरीता उपयोग करीत असत या करीता कोणताही पूरावा वि.प.ने दाखल केलेला नाही, जेणे करुन सिध्द होईल की, त.क. हा मोठा व्यवसायिक आहे व सदर झेरॉक्सचा व्यवसाय उपजिविकेसाठी नसून त्यावर मुनाफा (Profit) कमविण्याचा आहे तसेच त.क.ने स्वत-चे उदरनिर्वाहासाठी प्रस्तुत झेरॉक्स मशीन विकत घेतली आहे, असे शपथेवर नमुद केले आहे म्हणून त.क. हे मंचाचे मते वि.प.यांचे ग्राहक आहेत. त.क.यांनी जरी मशिन नागपूर येथे खरेदी केली तरी त.क.ला, वि.प.नी सदर मशिन स्थापन करुन त्याचा वापर हिंगणघाट येथे करीत असल्यामुळे सदरची तक्रार ही, मंचाचे कार्यक्षेत्रात कारण घडलेले आहे, म्हणून सदर तक्रार या न्यायमंचात चालविण्याचा अधिकार आहे. CC-117/2011 7. त.क.यांनी वि.प. यांचेकडून कॅनन कंपनीची 400(आर.सी)डिजीटल झेरॉक्स मशिन खरेदी केली व आर.सी याचा अर्थ Re-constructed (पुननिर्मीत) आहे. त.क. यांना मंचाने विचारले असता, मान्य आहे असे मंचास सांगीतले असल्याने सदर मशिन ही जूनी असून, त्यामध्ये त्याचा वापरावरुन त्याची किंमत ठरते, याची कल्पना त.क.यांना आहे व त.क. यांचा ब-याच वर्षापासून झेरॉक्स मशिनचा व्यवसाय आहे.
8. त.क.यांनी नमूद केले, की वि.प.यांनी संपूर्ण मशिनला वारंटी व ग्यारंटी दिली होती, असे नमूद केले आहे, त्याबाबतचा कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे मंचाचे मते त.क. हे त्यांचेकडून कोणत्या कागदपत्राच्या आधारे कोणती सवलत घेण्यास पात्र नाही. वि.प.यांनी त.क.यांने केलेल्या तक्रारीची त्वरीत दखल घेवून त्याकरीता मॅकेनिक पाठविला व मशिन दुरुस्त करुन दिली ही बाब त.क. यांनी मान्य केले आहे, त्यामुळे वि.प.यांनी सेवेमध्ये त्रृटी केली आहे असे म्हणता येणार नाही असे असले तरी त.क.यांचे झेरॉक्स मशिनमध्ये 2-3 दिवस बिघाड झाला आहे ही बाब वि.प.यांनी मान्य केली आहे व त्यानुसार वि.प.यांनी मॅकेनिक पाठविला होता. त.क.यांना त्यांची मशिन योग्य ती दुरुस्त करुन देणे आवश्यक आहे. 9. मॅकेनिकने मशिन दुरुस्त करुन दिल्यानंतर त्यामध्ये व्यवस्थितरित्या झेरॉक्स प्रत येत नव्हती अशी परिस्थिती उदभवत असल्यामुळे वि.प.ने त.क.ची झेरॉक्स मशिन दुरुस्त करुन वापरण्या योग्य द्यावी, असे आदेशित करणे न्यायोचीत, कायदेशीर व संयुक्तीक राहील असे न्यायमंचाचे स्पष्ट मत झालेले आहे, तसेच सदर प्रकरणांत त.क.यांची झेरॉक्स मशिन बंद राहीली असल्याने त्याला शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे, म्हणून त.क.ला मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रुपये 1,000/- तसेच तक्रारीचा खर्च रु.1,000/- वि.प.यांनी त.क.ला देय करण्याचे आदेशीत करणे आवश्यक आहे, म्हणून म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -//आदेश//- 1) त.क.ची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2)अ) वि.प.यांनी त.क.यांच्या हिंगणघाट येथील झेरॉक्स सेंटरवर जावून त्यांची कॅनन कंपनीची 400(आर.सी)डिजीटल झेरॉक्स मशिन Rr-constructed (पुननिर्मीत) ही विना मुल्य दुरुस्त करुन दयावी. ब) सदर मशिन मध्ये काही आवश्यक सुटे पार्टची गरज पडल्यास त्याचा खर्च त.क.यांनी सोसावा व तसे इस्टीमेट वि.प.यांनी त.क.यांना दयावे. CC-117/2011 3) वि.प.यांनी त.क. यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रुपये 1,000/- तसेच तक्रारीचा खर्च रु.1,000/- वि.प.यांनी त.क.ला देय करावा. 4) वरील आदेशाची पुर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळल्यापासून 15 दिवसांचे आंत करावी. 5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित सत्यप्रती निःशुल्क देण्यात याव्या. 6) त.क.ने मंचात मा.सदस्यांकरीता दिलेल्या ‘ब’ व ‘क’ प्रती परत घेऊन जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | (सौ.सुषमा प्र.जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |