Dated the 11 Dec 2015
(द्वारा मा. अध्यक्षा सौ. स्नेहा एस. म्हात्रे)
तक्रारदारांचे वकील माखिजानी हजर. त्यांनी सदर प्रकरण आजचे वादसूचीवर घेणेचा अर्ज दिला.
प्रकरण आजचे वादसूचीवर घेणेत आले.
तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून तक्रारदारांना दि. 21/11/2015 रोजी तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिलेली रक्कम रु. 20,00,000/- फोरफिट करण्यात येईल असे पत्र प्राप्त झाले आहे असा युक्तीवाद केला व पत्राची प्रत दाखल केली.
तक्रारदारांचे वकीलांनी तक्रारीत आवश्यक त्या दुरुस्त्या करुन तक्रार दाखल करुन घेणेकामी युक्तीवाद केला तसेच त्यांना MA/120/2015 मधील क्लॉज नं. 5 वर तक्रारीप्रमाणेच दुरुस्त्या करण्यासाठी लेखी परवानगी मागितली व सदनिका क्र. ए विंग, 201, दुसरा मजला, जयकुंज एनक्लेव्ह, प्लॉट नं. 4, सर्व्हे नं. 377-बी विरार पश्चिम या सदनिकेवर पुढील आदेश होईपावेतो अन्य त्रयस्थ व्यक्तीचा कायदेशीर हक्क प्रस्थावित करु नये असा आदेश पारीत करणेत यावा अशी विनंती केली.
सदर विनंती मान्य करणेत येते. तक्रारदारांनी MA/120/2015 मध्ये त्यानुसार आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात तसेच तक्रारदारांचे सदनिका क्र. ए विंग, 201, दुसरा मजला, जयकुंज, प्लॉट नं. 4 सर्व्हे नं. 377-बी विरार पश्चिम या सदनिकेवर पुढील आदेश होईपावेतो अन्य त्रयस्थ व्यक्तीचा कायदेशीर हक्क प्रस्थावित करु नये असा आदेश पारीत करणेत येतो.
प्रस्तुत अंतरीम आदेशाची प्रत तक्रारीचे नोटीससोबत सामनेवाले यांना पाठवावी.
MA/120/2015 वादसूचीतून काढून टाकणेत यावा.