Maharashtra

Thane

CC/673/2016

MR. ANKUSH KUMAR NARENDRA SINGH - Complainant(s)

Versus

M/S PACL INDIA LTD - Opp.Party(s)

SHINDE & CO

29 Sep 2017

ORDER

THANE DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room No.214, 2nd Floor, Collector Office Building, Thane-400 601
 
Complaint Case No. CC/673/2016
 
1. MR. ANKUSH KUMAR NARENDRA SINGH
105,A WING,SHANTI OM LODHA HEAVE,NILJE,DOMBIVALI EAST
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/S PACL INDIA LTD
201,SURAJ ARCADE & FLOOR,NAUPADA,THANE
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 29 Sep 2017
Final Order / Judgement

Dated the 29 Sep 2017

तक्रार दाखल कामी आदेश      

           द्वारा- सौ.स्‍नेहा एस.म्‍हात्रे...................मा.अध्यक्षा.       

1.    प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून दोन पॉलिसीज, पॉलिसी क्रमांक-यु.ओ.622‍06107 पॉलिसी कमेन्‍समेंट ता.10.10.2012 पॉलिसीची एक्‍सपायरी डेट 10.10.2024 रक्‍कम रु.1,00,000/- (टर्म 12 वर्षे) व पॉलिसी क्रमांक-यु.ओ.62184171 कमेन्‍समेंट ता.26.08.2011 पॉलिसीची एक्‍सपायरी डेट 26.08.2017, रक्‍कम रु.2,00,000/- (टर्म-06 वर्षे) घेतली असल्‍याचे नमुद केले आहे, व तक्रारदार म्‍हणतात त्‍याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर पॉलिसीच्‍या रजिस्‍ट्रेशनबाबत रजिस्‍ट्रेशन लेटर ता.10.10.2012 व ता.26.08.2011 रोजी दिले आहे.  तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक-5 मध्‍ये तक्रारदार यांनी सदर पॉलिसींच्‍या एकूण मोबदल्‍याची रक्‍कम रु.3,00,000/- असल्‍याचा उल्‍लेख केला आहे.  तक्रारदार म्‍हणतात, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर पॉलिसीच्‍या एक्‍सपायरी नंतर सदर पॉलिसीबाबतची तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून देय असलेली रक्‍कम (मॅच्‍युरिटी अमाऊंट) दिली नसुन त्‍याबाबत तक्रारदार सामनेवाले यांच्‍या कार्यालयात ता.30.08.2016 रोजी गेले असता, त्‍याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर पॉलिसीबाबत कोर्टामध्‍ये केस प्रलंबीत असल्‍याचे तक्रारदार यांना सांगितले, व सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर पॉलिसीची मॅच्‍युरिटी अमाऊंट दिली नसल्‍याने, तक्रारीचे कारण ता.30.08.2016 रोजी उदभवले असल्‍याचे तक्रारदार यांनी नमुद करुन तक्रारीच्‍या प्रार्थना कलम-12 (ए) ते 12 (डी) मध्‍ये नमुद केल्‍यानुसार सामनेवाले यांचेकडून मागण्‍या केल्‍या आहेत.  परंतु यु.ओ.62184171 याबाबतच्‍या रजिस्‍ट्रेशन लेटरमध्‍ये करारनाम्‍याची एक्‍सपायरी डेट 26.08.2017 असल्‍याचा उल्‍लेख दिसुन येतो, व दुस-या रजिस्‍ट्रेशन लेटरबाबत करारनाम्‍याची एक्‍सपायटरी डेट 10.10.2024 असल्‍याची दिसुन येते, त्‍यामुळे ता.30.08.2016 रोजी सदर तक्रारीस तक्रार दाखल करण्‍याचे कारण उदभवले असल्‍याचा प्रश्‍न उपस्थित होत नाही, (तक्रार परिच्‍छेद क्रमांक-6) तक्रारदार यांनी सदर तक्रारीमध्‍ये केवळ पी.ए.सी.एल. इंडिया लि., यांनी तक्रारदार यांच्‍या नांवे ता.10.10.2012 रोजी, तसेच ता.26.08.2011 रोजी दिलेल्‍या रजिस्‍ट्रेशन लेटरची छायांकितप्रत दाखल केलेली आहे त्‍या व्‍यतिरिक्‍त तक्रारदार यांनी तक्रारीत अन्‍य कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत, तसेच वर नमुद रजिस्‍ट्रेशन लेटर ता.10.10.2012 व ता.26.08.2011 यांचे अवलोकन केले असता, सदर रजिस्‍ट्रेशन लेटरमध्‍ये खालील प्रमाणे नमुद करण्‍यात आलेले आहे. 

In response to your application, we are pleased to inform you that you have been registered for the PLOT (S) booked by you as per details furnished hereunder.  The terms of booking and allotment shall be governed by the terms of Agreement and General Terms and Conditions printed overleaf.

Expected value of land at the end of the agreement Rs.4, 81,800/- (approx) Subject to clause No.8 overleaf.       

 

तसेच वर नमुद तपशिलानुसार सदर प्‍लॉटच्‍या खरेदीबाबत रजिस्‍ट्रेशन नंबर, डेट ऑफ कमेन्‍समेंट, पेमेंट प्‍लॅन नंबर, कन्‍सीडरेशन, प्‍लॉट साईज, मोड ऑफ पेमेंट, एक्‍पायरी डेट ऑफ अँग्रिमेंट, नॉमिनीबाबतचे नांव व इतर तपशिल इत्‍यादि बाबी नमुद आहेत.  यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून प्‍लॉटच्‍या खरेदीबाबत सामनेवाले यांच्‍या प्‍लॉट खरेदी विषयक असलेल्‍या स्किममध्‍ये पैसे गुंतविल्‍याचे दिसुन येते.  परंतु तक्रारदार यांनी त्‍याबाबत तक्रारीत उल्‍लेख न करता, सामनेवाले यांचेकडून पॉलिसी घेतल्‍याचे निवेदन केले आहे, तसेच तक्रारीच्‍या कॉज टायटलमध्‍ये तक्रारदार यांनी सामनेवाले यांचा पत्‍ता-नौपाडा,ठाणे असा दिला असुन सदर रजिस्‍ट्रेशनबाबत दिलेल्‍या सामनेवाले यांच्‍या पत्रावर नवी दिल्‍ली येथील पत्‍ता दिसुन येतो.  तक्रारदार यांनी सदर तक्रार मंचाच्‍या भौगोलिक कार्यक्षेत्रातील असल्‍याबाबत कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही, तसेच प्रस्‍तुत तक्रार अतिशय मोघम स्‍वरुपात व तांत्रिक त्रुटींसह दाखल केल्‍याचे दिसुन येते.  सामनेवाले पी.ए.सी.एल. लि., नौपाडा ठाणे यांचा प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये नक्‍की काय संबंध आहे ?  याचा उहापोह तक्रारदार यांनी केलेला नाही, व तक्रारीमधील प्रार्थना कलमामध्‍ये देखील स्‍पष्‍ट प्रार्थना/मागण्‍या वर नमुद तक्रारीतील आशयाशी सुसंगत असल्‍याचे दिसुन येत नाही.  सबब प्रस्‍तुत तक्रार ही अपु-या कागदपत्रांसह अतिशय मोघमपणे दाखल करण्‍यासाठी सादर केली असल्‍याने, तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून नक्‍की कोणत्‍या मागण्‍या करावयाच्‍या आहेत, व तक्रारदार यांची तक्रार नक्‍की काय आहे याचा अर्थबोध होत नाही.  सबब तक्रारदार यांनी सदर तांत्रिक त्रुटी दुर करुन प्रस्‍तुत तक्रार त्‍यासंबंधातील आवश्‍यक कागदपत्रांसह योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाखल करण्‍याची तक्रारदार यांना मुभा देऊन प्रस्‍तुत तक्रार वर नमुद तपशिलानुसार दाखल करुन घेण्‍याच्‍या टप्‍यावर निकाली काढण्‍यात येते.                  

                         - आदेश -

1. तक्रार क्रमांक-673/2016 तक्रारदार यांनी सदर तांत्रिक त्रुटी दुर करुन प्रस्‍तुत तक्रार

   त्‍यासंबंधातील आवश्‍यक कागदपत्रांसह योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाखल करण्‍याची तक्रारदार

   यांना मुभा देऊन प्रस्‍तुत तक्रार वर नमुद तपशिलानुसार दाखल करुन घेण्‍याच्‍या टप्‍यावर

   निकाली काढण्‍यात येते.                   

2. खर्चाबाबत आदेश नाहीत.

3. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्‍य व विनाविलंब पोस्‍टाने पाठविण्‍यात याव्‍यात.

4. तक्रारीचे अतिरिक्‍त संच असल्‍यास तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.

ता.29.09.2017

जरवा/

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.