Maharashtra

Thane

CC/09/312

SADANAND PUNIA MUDAD - Complainant(s)

Versus

M/S OM SAI CONSTRUCTION - Opp.Party(s)

25 Feb 2010

ORDER


CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE
CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE DISTRICT THANE Room No.214, 2nd Floor, Collector office
consumer case(CC) No. CC/09/312

SADANAND PUNIA MUDAD
...........Appellant(s)

Vs.

M/S OM SAI CONSTRUCTION
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

तक्रार क्रमांक – 312/2009

तक्रार दाखल दिनांक – 14/05/2009

निकालपञ दिनांक – 04/02/2010

कालावधी - 00वर्ष 09 महिने 10 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर

श्री. सदानंदा पुनीया मुदाद

लवल डिपोट समोर, डॉ. अंबेडकर रोड,

नौपाडा, विद्या विहार रोड,

कुर्ला(पुर्व). .. तक्रारदार

विरूध्‍द

    मे. ओम साई कन्‍सट्रक्‍शन

    तर्फे पार्टनर श्रीमती.मालदवी राम‍‍ब्रिज चव्‍हान

    कविता कॅलनी, चाळ नं. 4,

    रुम नं.5, काटेमानिवली, कल्‍याण(पुर्व). .. विरुध्‍दपक्ष

समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र.अध्‍यक्षा

श्री. पी. एन. शिरसाट - सदस्‍य

उपस्थितीः- .‍क तर्फे वकिल अमीत सिंग

वि.प एकतर्फा

एकतर्फा आदेश

(पारित दिः 04/02/2010)

मा. प्र.अध्‍यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार

1. सदरहु तक्रार श्री.सदानंद मुदाद यांनी मे.ओम साई कन्‍सट्रक्‍शन तर्फे भागिदार श्रीमती मालादेवी चव्‍हाण यांचे विरुध्‍द दाखल केली आहे. यामध्‍ये तक्रारदार यांनी रु.नं.1, चाळ नं.3, नांदिवली गाव, कल्‍याण येथील त्‍यांनी बुकिंग केलेली सदनीका विरुध्‍द पक्षकाराकडुन मिळण्‍याची मागणी केली आहे. किंवा त्‍यांनी भरलेल्‍या रु.1,70,000/- एवढी रक्‍कम 21% व्‍याजाने नुकसान भरपाई सकट परत मागितली आहे.


 

2. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्षकाराबरोबर मार्च 2008 मध्‍ये नोंदणिकृत करारनामा करुन विरुध्‍द पक्षकार यांनी बांधलेल्‍या रु.नं.1, चाळ नं. 3, ओम साई कन्‍स्‍ट्रक्‍शन सर्व्‍हे नं.29 हिस्‍सा नं. 1 गाव– नांदिवली, कल्‍याण, जिल्‍हा-ठाणे येथील 300चौ.फु.सदनिका त्‍याची रु.2,40,000/- किंमत ठरवुन व त्‍यापैकी रु.1,70,000/-एवढी रक्‍कम सुरवातिला विरुध्‍द पक्षकाराला देवुन उरलेली रु.70,000/- रक्‍कम सदनिकेचा प्रत्‍यक्ष ताबा देतांना भरण्‍याचे ठरले होते. व त्‍याप्रमाणे रु.9,000/- नोंदणी शूल्‍क भरुन करारनामा नोंदणीकृत करुन घेतला. परंतु तदनंतर ठरवलेल्‍या मुदतीत विरुध्‍द पक्षकार हे सदर सदनिका पुर्ण करुन ताबा तक्रारदार यांचे कडे देण्‍यास असर्मथ ठरले. विरुध्‍द पक्षकार त्‍यांच्‍या तथाकथीत सेवा देण्‍यामध्‍ये निष्‍काळजी ठरले.

.. 2 ..

3. तक्रारदार सदर सदनिकेचा ताबा विरुध्‍द पक्षकाराने द‍िल्‍यास उरलेली रु.70,000/- रक्‍कम लगेच देण्‍यास तयार आहेत परंतु तोपर्यंत त्‍यांना भाडयाच्‍या घरात रहावे लागत आहे व भाडे भरण्‍याचा बोझा तक्रारदार यांना उचलावा लागत आहे.


 

4. मंचाने विरुध्‍द पक्षकार यांना नोटिस बजावनी करुनही ते मंचासमोर हजर राहिले नाहीत व त्‍यांची लेखी कैफीयत दाखल केली नाही म्‍हणुन मंचाने दि.26/11/2009 रोजी 'नो डब्‍ल्‍यु एस' आदेश पारित केला व तद्दनंतर एकतर्फा चौकशी करुन हे मंच पुढील अंतीम आदेश पारित करीत आहेत.

    अंतीम आदेश

    1.तक्रार क्र.312/2009 हि अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे व या तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु. एक हजार) विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारदारास द्यावा.

    2.विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारदार यास त्‍यांनी बुक करुन दि.28/05/2008 रोजी करारनामा नोंदणीकृत केलेली रु..1, चाळ नं.3, ओम साई कन्‍सट्रक्‍शन हि 300 चौ.फु सदनिकेचा प्रत्‍यक्ष ताबा या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 2 महिन्‍याच्‍या आत द्यावा व त्‍याच वेळेस तक्रारदार यांनी राहिलेली रक्‍कम रु.70,000/-(रु. सत्‍तर हजार फक्‍त) विरुध्‍द पक्षकार यांना द्यावेत.

    3.विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारदारास हि तक्रार दाखल केल्‍यापासून प्रतिमाह रु.2000/- (रु. दोन हजार फक्‍त) प्रमाणे रक्‍कम वरील सदनिकेचा ताबा देईपर्यंत तक्रारदारास द्यावी, कारण तक्रारदारास भाडयाच्‍या घरात रहावे लागत आहे.

    4.विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रु. पाच हजार फक्‍त) द्यावेत.

    5.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍‍यात यावी.

    6.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्‍यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्‍वरित परत घ्‍याव्‍‍यात, मुदतीनंतर मंचाची जबाबदारी नाही.

    दिनांक – 04/02/2009

    ठिकान - ठाणे


 


 

(सौ. भावना पिसाळ ) (श्री.पी.एन.शिरसाट )

    प्र.अध्‍यक्षा सदस्‍य

    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे