तक्रार क्रमांक – 124/2008 तक्रार दाखल दिनांक – 04/03/2008 निकालपञ दिनांक – 01/09/2008 कालावधी - 5 महिने 28 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर एस. पी. सिंग इ-53 एअर फोर्स स्टेशन, ठाणे. पी. ओ. सांडोज बाग, ठाणे. .. तक्रारदार
विरूध्द
मे. नेक्स रिटेल इंडिया मोहन मिल कंपाऊंड घेडबंदर रोड , ठाणे (पश्चिम ) .. सामनेवाला
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः - त.क तर्फे वकिल वि.प तर्फे वकिल निकालप'त्र (आदेश पारित दिः 01/09/2008)
मा. सौ. पाटील शशिकला यांचे आदेशानुसार 1. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला अर्ज विरूध्दपक्षकार यांचे कागदपत्रे प्रतिज्ञालेख, लेखी युक्तिवाद यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व आदेश पारित करणेत आले. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षकार यांचे कडून 21 फेब्रुवारी 2008 मध्ये एक कलर टि.व्ही फिलीप्स मॉडेल वरदान कंपनीचा बुक करुन आय.सी.आय.सी.आय बँके मार्फत क्रेडीट कार्ड वरुन रक्कम देय केली. त्यांची पावती निशाण 'बी' वर दाखल आहे. म्हणुन रक्कमेबाबत उभयतांना कोणताही वाद नाही. .. 2 .. विरुध्दपक्षकार यांनी 22 फेब्रुवारी 2008 रोजी टी.व्ही सेट घरी पाठविला परंतु बॉक्स उघडुन पाहिला असता कोणताही सेट व्यवस्थितरीत्या, योग्य त्या पध्दतीत मुळस्वरुपात बंदीस्त, सिलबंद (पॉकिंग) केलेला नव्हता. रिमोट उघडा व मधुन तुटलेला दिसला. गॅरंन्टी, वॉरन्टी कार्ड देण्यात आले नव्हते. सेट खराब असले बाबत त्वरित दुरध्वनीवरुन विरुध्दपक्षकार यांना कळविले परंतु प्रथम पासुन अखेरपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारकर्ता हे प्रत्यक्षरित्या 3 वेळा विरुध्दपक्षकारांना भेटणेस गेले पण त्याचीही दखल घेतली नाही. सेट परत घेतला पण रक्कम परत केली नाही. यामुळे तक्रारकर्ता यांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास व नुकसान झाले म्हणुन सदर तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रार मुदतीत असुन तक्रारदार हे विरुध्दपक्षकार यांचे ग्राहक आहेत. विरुध्दपक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना निशाण 'ए' प्रमाणे श्री. कैलास भट्ट यांचे सही शिक्कयाचे पत्र देवुन 15 दिवसांत दि.व्ही सेटची रक्कम परत करित आहोत असे सांगितले, हमी दिली व विश्वास संपादन केले तथापी अशी परत देय लागणारी रक्कम प्रथम पासुन अखेरपर्यंत दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांने रु. 5,300/- टि.व्ही करिता मोबद्दला देवुनही टि.व्ही समाधानकारकरित्या वेळीच टि.व्ही वापरण्यास व लाभ घेण्यास मिळाला नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांचे नुकसान होवुन शाररिरीक व मानसीक त्रास व नुकसान झाले आहे व सोबत पुराव्याकरिता कागदपत्रे दाखल केली आहेत त्याची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी योग्य त्या वस्तु करिता सर्व रक्कम देवूनही विरुध्दपक्षकार यांनी रक्कम स्विकारुनही तक्रारकर्ता यांना उत्म प्रतिचा गॉरंन्टी वॉरंन्टी सह टि.व्ही दिला नाही. त्यानंतर रक्कम परत करतो असे लिहून देवुनही रक्कम परत न दिल्याने अणखीनच त्रास व नुकसान झालेले आहे. म्हणुन विरुध्दपक्षकार हे तक्रारकर्ता यांना मुळ रक्कम, खर्च व नुकसान भरपाईची रक्कम व्याजासह परत देण्यास पात्र व जबाबदार आहेत.
2. विरुध्दपक्षकार यांनी मंचामार्फत नोटिस पाठविण्यात आली होती त्यांची पोहच दाखल असुन रेकॉर्डमध्ये आहे. नेमल्या तारखेस व
.. 3 .. प्रथम पासुन अखेरपर्यंत विरुध्दपक्षकार हे मंचात हजर राहून दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाही दखल न घेतलेल्याने दिनांक 21/05/2008 रोजी नो डब्लु एस आदेश पारित होवुन एकतर्फी सुनावणी पुर्ण झालेने एकतर्फी आदेश पारित करणेत आला म्हणून त्याप्रमाणे पुर्तता करणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे म्हणुन आदेश. आदेश 1. तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करणेत आला आहे. 2. विरूध्दपक्षकार यांनी कलर टि.व्ही 'वरदान' कंपनी व फिलिप्स मॉडेलचा देण्याचा होता तो न दिल्याने तक्रारकर्ता यांनी टि.व्ही करिता दिलेले रु. 5,300/- (रुपये पाच हजार तिनशे फक्त) तक्रारकर्ता यांना त्वरित परत करावेत. 3. दिनांक 22 फेब्रुवारी 2008 रोजी मागणी व ऑर्डर प्रमाणे टि.व्ही न दिल्याने रक्कम रु. 5,300/- रूपयांवर 22/02/2008 पासून आदेशपारित तारखे पर्यंत द.सा.द.शे 9 % व्याजसह रक्कम दयावी. 4. सदर अर्जाचा खर्च व नुकसान भरपाई म्हणुन खर्च रु. 2,000/- (दोन हजार फक्त) तक्रारदार यांना विरूध्दपक्षकार यांनी दयावेत.
अशा आदेशांचे पालन विरुध्दपक्षकार यांनी आदेशांची सही शिक्कयाची प्रत पोहचने पासून 30 दिवसांचे आत सर्व रक्कम परस्पर (direct) देय करणेची आहे. तसे विहित मुदतीत न घडलेस वरिल सर्व एकुण रक्कमेवर संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द. सा. द. शे 11% व्याज दरांचे आकारणीत व्याजासह रक्कम देण्यास विरुध्दपक्षकर हे जबाबदार व बांधील आहेत.
5. रक्कम पोहच तक्रारदार यांना झाले नंतर व यदाकदाचित वादीत टि.व्हि तक्रारदार यांचे ताब्यात असल्यास तो आहे त्या स्थितीत परत विरूध्दपक्षकार यांना करणेचा आहे. .. 5 ..
6. उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी. 7. तक्रारकर्ता-यांनी मा. सदस्यां करिता दाखल केलेला सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.
दिनांक – 01/09 /2008 ठिकाण - ठाणे (श्री. पी. एन. शिरसाट ) ( सौ. शशिकला श. पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|