-ः अंतिम आदेश ः- द्वारा- मा.सदस्या, सौ.ज्योती अभय मांधळे, 1. तक्रारदाराची तक्रार खालीलप्रमाणे- तक्रारदारांनी सामनेवालेंकडून मेडिक्लेम पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसी क्र.130600/34/10/11/00006331 असा असून तिचा कालावधी 21-8-10 ते 20-8-11 असा होता. त्यांच्या वैदयकीय खर्चाच्या परतफेडीची रक्कम मागण्यासाठी त्यांनी सामनेवालेंकडे दावा दाखल केला होता. परंतु सामनेवालेंनी त्यांच्या दाव्याचे काहीच उत्तर न दिल्यामुळे त्यांना मंचाकडे तक्रार दाखल करावी लागली आहे. 2. मंचाने तक्रारीचे अवलोकन केले असता असे दिसते की, तक्रारदार हे जुईनगर, नवी मुंबई येथील रहिवासी असून त्यांनी फोर्ट, मुंबई येथील न्यू इंडिया अँश्योरन्स कंपनीविरुध्द तक्रार दाखल केली आहे. सदरची तक्रार पहाता सामनेवालेंचे कार्यालय सदर मंचाच्या कार्यकक्षेच्या बाहेर येत असल्यामुळे तक्रारदारांची तक्रार दाखल करुन घेता येणार नाही. 3. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहे- -ः आदेश ः- 1. तक्रारदारांची तक्रार या मंचाच्या कार्यकक्षेत येत नसल्यामुळे ती दाखल करुन घेता येत नसल्याने ती नामंजूर करुन निकाली काढण्यात येत आहे. 2. सदर आदेशाची सत्यप्रत तक्रारदाराना पाठविण्यात यावी. ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई. दि. 5-4-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |